राधा ग्रॅज्युएट होती.ती स्वतःच्या पायावर उभी होती. चांगल्या कंपनीमध्ये कामाला होती. आईवडिलांनी तिच्या लग्नासाठी मुलगा बघायला सुरू केला .तिच्या ओळखीच्या मदतीने एक मुलगा तिला सांगून आला. त्याचे मनोहर नाव होतं .चांगला सुशिक्षित होता आणि चांगल्या कंपनीतही कामाला होता .घरात आई-वडील मनोहरची बहीण (लग्न झाले होते) आणि मनोहर असा परिवार होता. मनोहरला राधा खूप आवडली राधा दिसायला सामान्य होती. तिचे डोळे हे फार बोलके होते. मनोहरला तिचे बोलके डोळे फार आवडले आणि तिची बोलण्याची पद्धतसुद्धा .त्या क्षणाला त्याला राधा आवडली. अगदी तिच्या प्रेमात पडला फर्स्ट साईड लव.
राधालाही मनोहर आवडला . मनोहरचे बोलणे खूप छान होते. मनोहर तिच्या आवडीनिवडी विचारत होता. लग्नानंतरही माझ्या बायकोने काम केलेलं मला आवडेल असा तो म्हणत होता .राधाला हे फार आवडलं की लग्नानंतर ती अशा घरात जाणार जिथे तिचे स्वतःचं अस्तित्व जपता येणार होतं. राधा अशाच सासरच्या शोधात होती जिथे तिला स्वतःचे अस्तित्व जपता येणार होतो. तिला लग्नानंतर घरात बसायचं नव्हतं. तिला तिच्या शिक्षणाचा उपयोग करायचा होता आणि तिला स्वावलंबी म्हणूनच आयुष्य जगायचं होतं .ती ह्या मतावर ठाम होती.
राधाच्या घरच्यांनाही मनोहरचा स्वभाव आवडला होता. त्या लोकांनाही मनोहरचे बोलणं वागणं आणि मनोहरच्या घरच्यांचे बोलणं वागणं आवडलं होतं. त्याच्यामुळे जास्त आढेवेढे न करता त्यांनी मनोहरला होकार कळवला.
राधा प्रचंड खुश होती. आपल्याला हवा तसा जोडीदार मिळाला आहे आणि आपल्याला हवं तसे सासर मिळाले आहे म्हणून ती सुद्धा अनेक स्वप्नांमध्ये गुंग झाली होती . आपल्या लग्नानंतर आयुष्य किती छान असेल, सुंदर असेल या विचारामध्ये ती असायची आणि मनोहर सुद्धा राधाच्या विचारात असायचा. एक चांगली मुलगी आपल्या आयुष्यात येणार ह्या विचाराने तो सुखावला होता .तो सुद्धा अनेक स्वप्न रंगवत होता.
लग्नाला दोन महिने बाकी होते .मनोहर, राधा दर आठवड्याला भेटायचे.लग्न ठरल्यापासून ते लग्न होईपर्यंत हा सुवर्णकाळ असतो. मनोहर राधासाठी वेगवेगळे गिफ्ट आणत असे. अनेक गप्पा दोघांमध्ये रंगत असे .तासनतास एकमेकांमध्ये हरवून जात. या फक्त गप्पा नव्हत्या तर हा काळ हा एकमेकांना ओळखण्याचा काळ होता. कारण की पूर्ण आयुष्य ज्या व्यक्तीसोबत घालवणार त्याच्याबरोबर सुसंवाद साधणे हे महत्त्वाचं होतं .रोज फोनवर गप्पा चालूच असायच्या .रात्री दोन तीन वाजले तरी काही त्यांच्या गप्पा संपत नव्हत्या.
राधाला अजून एक मनोहरचा स्वभाव आवडायचा तो म्हणजे तिची काळजी घेणे.तो तिची फार काळजी घेत असे. कोणत्याही मुलीचे स्वप्नच असतं की, आपल्या जोडीदाराने आपली काळजी घ्यावी.. मनोहरही असाच होता. काळजी घेणारा ,तिची विचारपूस करणारा ,तिला काय हवं नको ते बघणारा, तिची आवड जपणारा, तिला खुश ठेवणारा.
मनोहर एक दिवस राधाला म्हणाला "राधा मी खूप दिवस झाले विचार करतो आहे तुला एक गोष्ट सांगण्याचा.जर तु मला चुकीचे समजणार नसेल तर विचारू का?
राधा समजूतदार होती.
राधा त्याला म्हणाली " मनोहर आपण आता एकमेकांसोबत अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत आणि तुला जे बोलायचं असेल ते तू बोलू शकतो. असेही आपले लग्न होणार आहे त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट न लपवलेली बरी,आता जर गोष्टी लपवल्या तर लग्नानंतर आपण एकमेकांवर विश्वास ठेवू शकणार नाही.तू जे आहे ते मनमोकळेपणाने बोलू शकतो"
राधा त्याला म्हणाली " मनोहर आपण आता एकमेकांसोबत अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत आणि तुला जे बोलायचं असेल ते तू बोलू शकतो. असेही आपले लग्न होणार आहे त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट न लपवलेली बरी,आता जर गोष्टी लपवल्या तर लग्नानंतर आपण एकमेकांवर विश्वास ठेवू शकणार नाही.तू जे आहे ते मनमोकळेपणाने बोलू शकतो"
राधाचे बोलणे ऐकून त्याच्या मनावरचा भार नाहीसा झाला.
मनोहर राधाला म्हणाला" राधा मी कधी तरी ड्रिंक करतो रोज रोज नाही पण कधीतरी काही फंक्शन असेल तर करतो"
राधा त्याला म्हणाली मनोहर हे तू स्वतःहून सांगितले, हे मला आवडलं. खरंतर आपल्या नात्यात पारदर्शकता असणे हे खूप महत्त्वाचे आहे.
राधा पुढे बोलू लागली "मनोहर ,मलाही तुला काही तरी सांगायचे आहे. हे बघ मनोहर कधीतरी ड्रिंक करणं वगैरे ओके आहे पण मी असे अनेक संसार उद्ध्वस्त होताना पाहिले आहेत ज्याच्या मध्ये नवरा हा दारूच्या आहारी जातो, बायकांना मारझोड करतो आणि पूर्ण घर हे उद्ध्वस्त होतं. तर तू मला वचन दे की तू ड्रिंक करणं सोडशील.
मनोहरने राधाला वचन दिले."मी ड्रिंक करणे सोडून देईल"
मनोहरने स्वतःहून पारदर्शकपणे सांगितले त्यामुळे राधाला मनोहरवर विश्वास बसला.
राधा आणि मनोहरचे नाते आता अजून घट्ट झाले होते; कारण की त्या दोघांनी एकमेकांचा विश्वास जिंकला होता.
राधा आणि मनोहरचे लग्न झाले . सासू-सासरे नव्हतेच मुळी ते तर होते तिचे आई-बाबा तिची काळजी घेणारे. त्यामुळे राधा लवकरच संसारामध्ये रुळली.
लग्नानंतर महिनाभर नवीन लग्न झालेली ही जोडी सर्वत्र फिरतच होती . अनेक अशा गोड आठवणी ते दोघेही घेऊन आले होते. संसाराची सुरुवात सुंदर झाली होती .एकमेकांना समजून घेण्याचा दोघेही प्रयत्न करत होते. एकमेकांची मन जपण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते.
राधा कामाला जाऊ लागली. राधाला वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ घालायची वेगळीच हौस. तशी तिच्या हाताला चवही भारी होती.ती सर्वाना हौसेने खाऊ घालत.घरातल्या सर्वांची काळजीही घेत असे. एकंदरीत सर्व काही सुरळीत चालू होते.
वर्षभराने राधाला गुड न्यूज मिळाली. राधाला आई होणार ह्याची चाहूल लागली.. मनोहर
ही खुश झाला तो सुद्धा वडील होणार होता. घरातील सर्वजण तिची काळजी घेऊ लागले. तिची सासू तिचे डोहाळे पुरवू लागली. तिची नणंद प्रियाही वहिनीच्या ह्या काळात तिला हवे नको बघत होती.पाहिलं डोहाळजेवण,बाळंतपणसुद्धा माहेरी न करता सासरीच केले. मनोहरला ते सर्व क्षण अनुभवायचे होते.त्याला राधा त्याच्या डोळयांसमोर हवी होती.राधाच्या आई बाबांना तर मुलीचे इतके लाड होत आहे हे पाहून समाधान होत होते.रोज मनोहर राधाच्या पोटावर हात ठेवून येणाऱ्या बाळाशी मनसोक्त गप्पा मारत असे.
ही खुश झाला तो सुद्धा वडील होणार होता. घरातील सर्वजण तिची काळजी घेऊ लागले. तिची सासू तिचे डोहाळे पुरवू लागली. तिची नणंद प्रियाही वहिनीच्या ह्या काळात तिला हवे नको बघत होती.पाहिलं डोहाळजेवण,बाळंतपणसुद्धा माहेरी न करता सासरीच केले. मनोहरला ते सर्व क्षण अनुभवायचे होते.त्याला राधा त्याच्या डोळयांसमोर हवी होती.राधाच्या आई बाबांना तर मुलीचे इतके लाड होत आहे हे पाहून समाधान होत होते.रोज मनोहर राधाच्या पोटावर हात ठेवून येणाऱ्या बाळाशी मनसोक्त गप्पा मारत असे.
बघता बघता नऊ महिने सरले ,एका गोंडस बाळाला तिने जन्म दिला होता. घरात पाहिलं बाळ ,खूप कौतुक होत होते.त्याचे स्वागत थाटामाटात केले गेले.राधा तर आनंदाने नाहून निघाली. स्वप्न असल्यासारखे वाटत होते सर्व.
काही महिन्याने राधाने कामाला जाण्याचा निर्णय घेतला.सासूच्या भरवश्यावर मुलाला ठेवून कामाला जाऊ लागली . बाळापासून तिला दूर जाताना त्रास होत होता पण ,सासू तर बाळाची डोळ्यात तेल घालून काळजी घेत होती त्यामुळे ती निर्धास्त होती.
राधा आणि तिच्या नणंदेचे नातेही मुरत चालले होते. दोघीही एकाच वयाच्या होत्या. कधी कधी दोघीही सहलीला जात असत. त्याच्यामुळे त्यांच्यामधील ऋणानुबंध जुळत चालले होते. राधा आणि प्रिया दोघीही नणंद भावजया कमी आणि मैत्रिणी जास्त होत्या. त्यांच्याही आवडीनिवडी सारख्याच होत्या, अगदी त्यांचे विचारही बहुतांश प्रमाणात जुळत होते. राधाच्या घरी प्रियाचे येणे-जाणे होते आणि प्रिया ही तितक्याच आवडीने भावाला आणि भाऊजयीला बोलवत असे त्याच्यामुळे त्यांच्या नात्यांमध्ये एक सलोखा आणि एक बळकटी आली होती.
राधा कधीच कोणाशी दुजाभाव करत नसे, त्याच्यामुळे ती सर्वांची लाडकी झाली होती. सासू-सासरे तर कौतुक करताना थकत नसायचे.
राधाची सासू नातवाची खूप काळजी घेत असे. त्याच्यामुळे ती बिनधास्तपणे कामाला जाऊ शकत होती. राधा संसारात रमली होती.
पाची बोटं तुपात असताना कुठेतरी एक गोष्ट आता ठसठसु लागली. ती म्हणजे मनोहर आता कधीतरी नव्हे तर रोज दारू पिऊन घरी येत असे .सर्व काही व्यवस्थित असताना एकच गोष्ट होती ती तिला नेहमीच सतावत असे .त्याचा स्वभावही बदलला होता.तो तिला जास्त वेळ देत नसे.
एक दिवस राधा मनोहरला म्हणाली "मनोहर तु दारू पिणे कधी सोडणार आहेस? मनोहर तू मला सांगितले होते की, मी कधी तरी काही फंक्शन असेल तर दारू पितो आणि तू मला वचनही दिले होते की मी दारू सोडण्याचा प्रयत्न करेल; पण आता मी पाहते आहे तू रोज दारू पितो आणि तुझं वागणं हळूहळू बदलत चाललं आहे . मनोहर तू आलास की अगदी तुझ्यातच रमून असतो. अगदी मला पाच मिनिट सुद्धा वेळ देत नाहीस. खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या मला तुझ्याशी बोलायच्या असतात आणि मला तुझ्यासोबत वेळ हवा असतो. तू वेळच देतच नाहीस. आपल्या लग्नाला साधे दोन वर्ष सुद्धा झाले नाही तरी तू असा वागतो आहेस . सुरुवातीला ओढ होती, माझ्यासाठी तुझ्या डोळ्यांमध्ये भाव बघायची ते कुठेतरी हरवत चालले आहेत. मला असं वाटतं की, मी कोणीतरी अनोळखी व्यक्तीच्या सहवासात राहते. माझं आयुष्य जणू काही एखाद्या मशीन प्रमाणे झाले आहे. सकाळी ऑफिसला जावा. दिवसभर काम करा. संध्याकाळी येऊन जेवण बनवा आणि झोपुन जावा .किती दिवस झालं तू मला बाहेर सुद्धा नेहलं नाहीस किंवा तू माझ्याशी पाच मिनिटे सुद्धा बसून बोलला नाहीस. रविवारी सुट्टी असली तरीसुद्धा तू सरळ बाहेर मित्रांसोबत निघून जातोस. तुला माझ्या बरोबर वेळ घालवायला आवडत नाही असेच मला वाटत आहे आता. मनोहर मी लग्न तुझ्याशी केलं आहे , त्याच्यामुळे मला तुझ्याकडून अपेक्षा असणं साहजिकच आहे .एक दिवस जर असं वागणं असतं तर मला काहीच प्रॉब्लेम नव्हता; पण आता तू अगदी वेगळा झाला आहेस. तू जसा होता तसा नाहीच राहिलास.मला ह्या सर्व गोष्टींचा मानसीक त्रास होतो आहे. म्हणून मी सविस्तरपणे तुझ्याशी बोलते आहे.
मनोहर आता तुला ठरवायचे आहे तुला तुझ्या आयुष्यात दारू हवी आहे का तुझी बायको आणि मुलगा.
मनोहर :" राधा तुला तर माहित आहे ना की तू माझ्यासाठी किती प्रिय आहेस ते ,तुझ्याशिवाय मी कसा जगू शकेल? मी खूप प्रयत्न करतो आहे माझी दारू सोडवण्याचा पण काय करु? कधीतरी माणूस पितोच ना ?
राधा रागातच म्हणाली " काय बोलतोस मनोहर ? कधीतरी? कधीतरी नाही हे आता तुझं रोजचं झालं आहे.कधीतरी ठीक आहे. पण एकही दिवस असा जात नाही की तू दारू पिऊन घेत नाहीस. दारू पिल्यावर तुझा स्वतावर कंट्रोल राहतो का ?काही बडबड करतोस. तुला कळतं का मनोहर? तुझ्यामुळे मला आणि आपल्या घरातल्या सर्वांनाच किती त्रास होत आहे. तुला जरा पण कल्पना नाही, की तू काय करतो आहेस. तुला माहित आहे ना आईना बीपी ,डायबिटिसचा त्रास आहे .बाबांची सुद्धा तब्येत नरम गरम असते. मग तुला हे सर्व माहीत असताना तू असा का वागतो आहेस मला हेच कळत नाही. त्यांच्याही डोळ्यांमध्ये मी अपराधीपणा चे भाव बघते तेव्हा मलाच वाईट वाटतं.
मनोहर तिला म्हणाला "राधा खरच सॉरी यासाठी ;पण मी आता याच्यापुढे कधीच दारू पिणार नाही. मी तुझी शपथ घेऊन सांगतो. मनोहरने राधाच्या डोक्यावर हात ठेवला आणि शपथ घेतली.
राधा त्याला म्हणाली " हे बघ मनोहर मी आता तुला पुन्हा पुन्हा चान्स देणार नाही ; कारण की मी थकले आहे आणि तुझे असं रोज दारू पिऊन येणे. आपल्या नात्यावर किती परिणाम करते हे तुला कळत नाही ; पण मला समजते की नक्की काय होत आहे.
मनोहर पोटतिडकीने बोलत होता "खरंच राधा आता मी नाही पिणार दारू, . कोणी कितीही फोर्स केला तरीसुद्धा मी पिणार नाही .
दुसऱ्या दिवशी मनोहर कामाला गेला
राधा सुद्धा कामाला गेली .रात्री कामावरून राधा घरी आली. सर्व कामं आटोपून तिने तिच्या मुलाला अर्णवला रूममध्ये झोपवले.
राधा सुद्धा कामाला गेली .रात्री कामावरून राधा घरी आली. सर्व कामं आटोपून तिने तिच्या मुलाला अर्णवला रूममध्ये झोपवले.
तोच बाजूला मनोहर आला आणि झोपी गेला.आज तर जास्तच प्यायला होता.त्याने ऑफिसवरून आल्यावर कपडे बदलली नव्हती. पायात शूज होते.. तिला प्रचंड राग आला.
त्याने डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली होती आणि आज हा पुन्हा दारू पिऊन आला याचा अर्थ फक्त दारूच महत्वाची आहे.
आल्या आल्या तो झोपी गेला. तिने मनोमन विचार केला उद्या काही झालं तरी आता मी मनोहरशी बोलून राहणारच आहे.ही रोजची नाटकं मी काही सहन करणार नाही. सकाळ झाली मनोहर डोळे चोळत उठला. राधा त्याच्या बाजूलाच बसली होती. मनोहरने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला "गुड मॉर्निंग राधा"
राधा:" काय गुड मॉर्निंग मनोहर? मनोहर खरंच गुड मॉर्निंग आहे का ही.?
राधा:" काय गुड मॉर्निंग मनोहर? मनोहर खरंच गुड मॉर्निंग आहे का ही.?
मनोहर बोलू लागला "आय ॲम रियली सॉरी राधा, मी खरच घेणार नव्हतो पण काल मित्रांनी मुद्दामून माझ्या ग्लासामध्ये दारू ओतली"
राधा म्हणाली " काल माझी शपथ घेतलेली, आज पुन्हा तसेच . मी महत्त्वाची नाहीच आहे का तुझ्यासाठी? तुझ्यासाठी फक्त दारू आणि दारू महत्त्वाची आहे मनोहर "
मनोहर म्हणाला "सॉरी राधा , खरंच मी पिणार नव्हतो पण माझ्या माझ्या मित्रांनी ग्लासात दारू मिक्स केली होती. सॉरी राधा माझी चूक नाही आहे.
राधा म्हणाली " तू खरं बोलतो आहेस का ?
"हो राधा " मनोहर म्हणाला
"आता तर मी तुझ्यावर विश्वास ठेवते आहे ,पण ह्यापुढे बिलकुल चालणार नाही"
दुसऱ्या दिवशी मनोहर पुन्हा ऑफिसला गेला .
त्या दिवशी राधा देवाकडे मनोमन प्रार्थना करत होती की आता मनोहरने हे व्यसन सोडावे. तिचे कामात अजिबात लक्ष लागत नव्हते.
क्रमशः
अश्विनी ओगले.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा