तू हवीशी मला भाग ४

राधा "अजिबात नाही,चल तू तयार हो. राधा आज खूप सुखावून गेली होती. किती दिवसानंतर मनोहरचा खरा अंदाज तिला पाहायला मिळाला होता. बस आज त्याला प्रेमाने मी विचारणारच "का तू रोज रोज दारू पितोस "तिने तयारी केली आणि आरशात पाहून टिकली लावू लागली.. तोच पाठून मनोहर आला ..


राधाने पाठी वळून पाहिले, ती मनोहरला पाहून खुश झाली. मनोहर अनपेक्षितपणे समोर उभा राहिलेला पाहून राधा खूपच खूश झाली होती. तिच्या चेहर्‍यावरून आनंद ओसंडून वाहत होता.

मनोहरला आई बोलू लागली, बरं झालं तू आलास .तुझीच वाट पहात होते.चल लवकर ये आणि बाजूला बस , मला तुझ्या सपोर्टची गरज आहे.


मनोहर शूज काढतच म्हणाला."आलोच आई"


आईच्या बाजूला बसला आणि म्हणाला " सांग आई तुला काय सपोर्ट हवा?"


आई म्हणाली
"तुझी बायको आणि तुझे वडील दोघेही मिळून माझी थट्टामस्करी करत आहेत"


मनोहर चेहऱ्यावरती खोटा खोटा राग आणून ,बाबा आणि राधाला म्हणाला " काय चालू आहे तुम्हा दोघांचे ? तुम्ही दोघे मिळून माझ्या आईला सतावत आहात?बघतोच तुमच्या दोघांनाही"


आई म्हणाली " तुझी बायको म्हणते आहे की आई तुम्ही फोटो शूट करा बाबांसोबत आणि तुझे बाबाही त्याला दुजोरा देत आहेत, बरं झालं तु वेळेवर आलास .आता तूच काय ह्या दोघांना बघ"मनोहरने राधा आणि त्याच्या वडिलांवर खोटा खोटा रागाने कटाक्ष टाकला आणि रागातच म्हणाला काय तुम्ही दोघे माझ्या आईला असं म्हणालात ? फोटोशूट कर म्हणून? आणि बाबा तुम्ही तुम्हीसुद्धा तसेच. हे काही मला आवडलं नाही .


राधा आणि बाबा दोघेही मिश्किललपणे हसत होते, त्यावर राधाची आई म्हणाली "आता कशी तुमच्या दोघांची बोलती बंद झाली, बघितलं माझा वाघ त्याच्या समोर आता तुमचं तोंड उघडते का?


मनोहर थोडा वेळ शांत बसला आणि आई कडे पाहून म्हणाला
" आई मी काय म्हणतो आहे ,तू ह्या लोकांकडे अजिबात लक्ष नको देऊ, काहीही बोलतात. अशी पण तुझी हौस राहिलीच आहे ; तर मग बाबांसोबत होऊन जाऊ दे फोटोशूट आणि विडिओ शूट सुद्धा . "


हे ऐकून राधा आणि बाबा दोघेही पुन्हा जोर जोरात हसायला लागले. आईने मनोहरच्या पाठीत हलकासा धपाटा मारला आणि म्हणाली " लबाड , तू सुद्धा सामील झाला, या दोघांमध्ये. तुम्ही सगळे एका माळेतले मणी. नुसते मला सतावत राहतात .जाऊदे . माझ्या नातवाला मोठा होऊ द्या मग तुमच्या लोकांना मी चांगलंच बघते. माझ्या नातवा सोबत कशी मी टीम बनवते ते पाहतच राहा सगळे."


यावर बाबा हसतच म्हणाले "अगं तू नातवा सोबत टीम नको तयार करू, तुझ्या नातवाला आम्ही खरच घाबरतो . त्याचा आवाज आला तरी ,आम्ही घाबरतो . नको नको तू असं करू नकोस. राधाही बाबांच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाली

"हो आई तुम्ही असं काही करु नका, आम्ही भयंकर घाबरतो त्याला . छोटा पॅकेज बडा धमाका आहे तो,तर असं काही करु नका. पाहिजे तर तुम्ही फोटोशूट नका करू ; पण अर्णव सोबत टिम बनवण्याचा विचार चुकूनसुद्धा करू नका.

आई सुद्धा खळखळून हसू लागली.
बाबा म्हणाले आता टीम बनली असेल तर आपण जेवून घेऊया का? मला खूप भूक लागली आहे .पोटात कावळे ओरडायला लागले आहेत आणि आता ते पोटातले कावळे चक्कर येऊन पडण्याच्या स्थितीत आहेत बघ.

राधा आणि आई किचनमध्ये गेल्या. राधाने ताट वाढायला घेतले , बघते तर चपात्या फारच कमी होत्या आणि भाजी सुद्धा थोडीशी होती दोन जणांना पुरेल अशी होती. ती सासूला "म्हणाली अहो आई तुम्ही इतकं कमी जेवण केलं. थांबा मी लगेच पीठ मळते आणि चपात्या करून घेते आणि थोडीफार भाजीही करून घेते कारण आपल्या चौघांना काही पुरणार नाही .

राधाच्या सासूने मुद्दामून कमी जेवण केले होते कारण ,मनोहरने आधीच फोन करून सांगितले होते की तो आणि राधा बाहेर जाणार आहे. राधाची सासू म्हणाली हो गं फारच कमी केले आहे. पुरणार नाही आपल्या चौघांना. तेवढ्यात मागून मनोहर आला .


तो आईला डोळे मिचकावत म्हणाला " आई खूपच कमी जेवण आहे ,खरंच की ते काही आपल्या चौघांना पुरणार नाही .

मनोहर " तू आणि बाबा दोघेही जेवून घ्या मी आणि राधा बाहेर जाऊन जेवतो.

राधा म्हणाली " कशाला बाहेर ?असू द्या मी पटकन करते जेवण"

राधाची सासू लगेच म्हणाली" किती दिवस झाले, तुम्ही दोघे बाहेर गेला नाही आणि अर्णव सुद्धा झोपला आहे. आम्ही जेवतो घरीच.तुम्ही जाऊन या"


राधा म्हणाली " आई ,आपण असे करूयात सगळेच बाहेर जेवायला जाऊ. हे जेवण राहू दया. आपण उद्या खाऊयात."

सासू म्हणाली "अगं नको नको, तुला तर माहित आहे ना मला आणि बाबांना बाहेरचं जेवण जमत नाही, लगेच ॲसिडिटीचा त्रास सुरू होतो. त्यापेक्षा तुम्ही दोघं जाऊन या.


राधाचा सासरा किचनमध्ये आला म्हणाला " काय चालू आहे तुम्हा तिघांचे? आज रात्री या गरिबाला जेवण मिळणार आहे की नाही ?" माझ्या पोटातले कावळे आता काही शांत बसू शकत नाही. लवकर जेवायला वाढा".

राधाची सासू म्हणाली "अहो बघाना माझ्याकडून जेवण कमीच झाले आहे तर, मनोहर राधाला म्हणाला ,बाहेर जेवायला जाऊया पण ती काही तयार होईना..


राधाचा सासरा म्हणाला "अरे वा बाहेर जायचा प्लॅनिंग चालले आहे ,ठीक आहे. मी लवकर तयार होतो . जाऊया आपण सर्वच बाहेर.

राधाची सासू म्हणाली " अहो काय तुमचं मध्येच? लहान मुलागत करता? आपल्या दोघांसाठी जेवन पुरेल इतकं आहे . ह्या दोघांना बाहेर जाऊ द्या . बाहेरची खायची सवय काय तुमची काही सुटणार नाही. घरात बसा .या दोघांना जाऊ द्या.


राधाचा सासरा राधाला म्हणाला "बघितलं राधा ? कशी तुझी सासू मला त्रास देते. तिचाच रुबाब. मी कुठे जेवायचं? मी काय करायचं? सर्वच ती ठरवते. किती त्रास देते बघितलं तू तुझ्या डोळ्याने"


राधाची सासू बोलू लागली " जरा तुम्ही शांत बसा,उगाचच ड्रामा करू नका. जेवण बनवलं आहे ,गप्प खा आणि मला माहित आहे तुम्ही कुठे जाता ?काय खाता? रोज बाहेर काही ना काही तुमचं खाणं चालूच असते. त्यामुळे हा जो गरीबा सारखा चेहरा आता केला आहे ना त्या गरीब चेहऱ्यापाठी किती मोठा खवय्या दडला आहे हे मला चांगलंच माहीत आहे. तुम्हाला काय वाटलं? मला काय माहित नाही पडणार? तुमची प्रत्येक गोष्ट मला माहित पडतेच .बरं का माझेही भरपूर जासूस आहेत बाहेर.


राधाचा सासरा यावर हसला आणि म्हणाला "मी फक्त मस्करी करत होतो, माझी बायको किती चांगली आहे, मला माहित आहे आणि तुझ्या हातचं जेवण म्हणजे अगदी अमृत. तू साधं भाकरी आणि पिठलं केलं ,तरी सुद्धा ते अगदी पंचपक्वान्न वाटतं बघ मला. त्यामुळे बाहेर जायचा प्लॅन कॅन्सल .

राधाची सासू म्हणाली आता पुरे झाले .माझी मस्का पॉलिश . मी किती चांगली आहे ,माझं जेवण अमृत आणि आता तुमची चोरी पकडली गेली, त्याच्यामुळे तुम्ही आता असंच गोड गोड बोलणार माझ्याशी.


राधाची सासू जरा आता फिल्मी डायलॉग बोलू लागली "मनोहर के बाबा तुम्हारे रगरग से वाकिफ हू मे ,ज्यादा शातीर मत बनो.अब तुम पकडे गये हो।".

राधाचा सासरा म्हणाला "मोहतरमा,आप मुझे गलत समझ रही हो । आप जैसे सोच रही हो, ऐसा बिल्कुल भी नही है। शायद आपको गलतफेमी हो गई है।मनोहर आणि राधा दोघेही हसू लागले. आई-बाबांची केमिस्ट्री वेगळीच होती. एकदम भन्नाट .दोघांची जुगलबंदी सुरूच असायची.

राधाचा सासरा म्हणाला " अगर आप चाहती हो कि हम आपके साथ खाना खाये तो जरूर हम दोनो साथ मिलकर खाना खायेंगे। ऐसे भी कबाब मे हड्डी नकोच.


हिंदीमध्ये डायलॉग बोलत असतानाच सासर्‍याने कबाब मध्ये हड्डी नकोच हे म्हणताच, सगळे जण खळखळून हसू लागलेराधा म्हणाली "असं काही नाही बाबा, आमच्यासाठी तुम्ही काही हड्डी नाही. उलट तुम्ही आलेलं आवडेल आम्हाला"

राधाचा सासरा म्हणाला " सुनबाई आमच्या दोघांमध्ये हड्डी नको असं मला म्हणायचं होतं. आम्हा दोघा नवरा बायकोला जरा एकांत द्याल का ?तुम्ही दोघेही जावा पटकन .आज मे और मेरी बेगम कँडल लाईट डिनर करेंगे"

राधाची सासू म्हणाली
"तुम्हाला आता मी बघतेच . थांबा जरा या दोघांना जाऊद्या बाहेर आणि मग तुमची शाळा घेते"


मनोहर म्हणाला " बाबा आज आई प्रचंड तापली आहे. आज काही तुमचं खरं नाही. आम्ही तर दोघेही बाहेर चाललो आहोत. त्याच्यामुळे तुम्ही तुमची काळजी घ्या. निघतो आता आम्ही दोघे."


मनोहरचे बाबा म्हणाले "मनोहर , हम डरने वालो मे से नही है बेटा, हम तो लढने वालो मे से है।

हे ऐकताच मनोहरच्या आईने कमरेवर हात ठेवला आणि म्हणाली " खरंच"


मनोहरच्या बाबांनी ते पाहिले आणि लगेच बाहेर हॉलमध्ये धूम ठोकली.


राधा ,मनोहर आणि राधाची सासु तिघेही हसू लागले. राधाची सासू म्हणाली "चला चला, आता तुम्ही लवकर तयारी करा आणि जाऊन या"


राधा आणि मनोहर रूममध्ये गेले . राधा मनोहरला म्हणाली "खरंच मला फार कौतुक वाटतं आई आणि बाबांचे .किती भारी राहतात ना दोघं? अगदी नवीनच लग्न झालेल्या जोडप्यांसारखं . किती छान मस्करी करतात एकमेकांची आणि तितकाच आदरही करतात एकेमकांच्या भावनांचा . किती मस्त . मनोहर मी खूप लकी आहे की मी अशा फॅमिलीमध्ये आहे जीथे मला सासू सासरे हे सासू-सासरे वाटतच नाही असं वाटतं ते माझेच आई बाबा आहेत".

मनोहर म्हणाला " हो राधा, आई-बाबा असेच आहे आणि यांना हसत-खेळत पाहिलं की मूड खूप फ्रेश होऊन जातो.त्यांचं नातं खूपच घट्ट. ते दोघे एकमेकांमध्ये अशा पद्धतीने मिसळून गेले की प्रत्येक गोष्ट एकमेकांची त्यांना न बोलताही सहजच कळते बघ"


" मनोहर तुलापण न बोलताही माझ्या मनातील भावना कळतात का ? ती पुटपुटली.

मनोहरने ते ऐकले.

मनोहरने राधाचा हात घट्ट पकडला, डोळ्यात डोळे घालून म्हणाला "काय म्हणालीस?"

राधा
" काही नाही ते असंच विचार करत होते, कोणता ड्रेस घालू .माझा हात सोड ,मला तयारी करू दे"


मनोहर:"ये हात छोडने के लिये नही थामे है बायको"

राधा:"तुला पण फिल्मी डायलोगचा फिवर चढला वाटतं, चल ना सोड ना हात .आता तयारी करू दे मला"

मनोहर:"ठीक आहे ,आता तुला मी सोडतो पण बाहेरून आल्यावर नाही"

मनोहरने तिचा हात सोडला.

राधाने त्याचा जोरात गालगुच्चा घेतला.

आणि कपाटाच्या दिशेने पळाली.

मनोहर:"तुला आल्यावर बघतो मी"

राधा गालातल्या गालात हसली.


ती कपाटातून कपडे बाहेर काढू लागली.


मनोहरने आज येतानाच राधासाठी छान ड्रेस आणला होता.त्याने ड्रेसची केरी बॅग राधाच्या हातात दिली आणि म्हणाला आज तू हा ड्रेस घाल . राधाने पाहिले तर त्याने छान लाल रंगाचा ड्रेस आणला होता.


राधा म्हणाली "हे असं आज अचानक गिफ्ट? आज काय आहे?


मनोहर
" माझ्या बायकोला गिफ्ट देण्यासाठी मी स्पेशल डे ची वाट पाहणाऱ्या मधला नाही"


राधा म्हणाली
" थँक्स मनोहर, खूप छान ड्रेस आहे"

मनोहर म्हणाला

" वेलकम बायको"

मनोहर पुढे म्हणाला
"राधा मी तर तुला गिफ्ट दिलं आणि तू"

राधा म्हणाली
"हो पण मी काही आणलं नाही आणि मला कल्पना नव्हती की तू माझ्यासाठी गिफ्ट घेणार आहेस ते"

मनोहर रोमँटिक मूडमध्ये आला आणि म्हणाला
"तुला हवं असेल तर तू आताही गिफ्ट देऊ शकतेस"

राधा "अजिबात नाही,चल तू तयार हो.

राधा आज खूप सुखावून गेली होती. किती दिवसानंतर मनोहरचा खरा अंदाज तिला पाहायला मिळाला होता. बस आज त्याला प्रेमाने मी विचारणारच "का तू रोज रोज दारू पितोस "


तिने तयारी केली आणि आरशात पाहून टिकली लावू लागली.. तोच पाठून मनोहर आला ..


क्रमशः

अश्विनी ओगले..

कथा आवडत असेल तर नक्की लाईक, कंमेंट, शेअर करा.धन्यवाद.

🎭 Series Post

View all