तू चाल पुढे ज्ञानरूपी वसा घेऊनी....

तू चाल पुढे...

विषय:- तु चाल पुढे ज्ञानरूपी वसा घेऊनी......                                                                        आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शाळेत आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.कारण ही तसेच होते सगळ्याच्या लाडक्या दामले बाई सेवानिवृत्त होणार होत्या आणि त्याचा वारसा पुढे चालवणारे विनु मास्तरांना त्याच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार मिळणार होता.                                                           सगळे खूप आनंदी होते. थोड्याच वेळात कार्यक्रमाची सुरुवात झाली.. दामले बाई आणि इतर पाहुणे मंचावर आल्यावर सगळीकडे शांतता पसरली... कार्यक्रम सुरू झाला सगळे जण ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आला... विनू मास्तरांना दामले बाईच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला... मास्तराच्या डोळ्यात आनंदआश्रु आले....गेली कित्येक वर्षे ते ह्या क्षणाची वाट पाहत होते...आज अखेर ते पूर्ण झाले...                                                        जेव्हा दामले बाईंनी बोलायला सुरुवात केली तेव्हा सगळे शांततेत त्याचे बोलणे ऐकत होते ...बोलणे होतेच इतके प्रेरणादायी की ते संपू नये असे वाटे...त्या आपल्या भाषणात बोलल्या की ध्येय प्राप्त करायचे असेल तर आत्मविश्वास आणि संयम बाळगावा लागेल प्रत्येक कामात घाई नको... शांत आणि विचारपुर्वक निर्णय घ्या.... कारण हीच तर तुमची परीक्षा आहे ... ज्ञान हे दिल्याने वाढते त्यामुळे पुस्तके जास्तीत जास्त वाचा त्यातुन प्रेरणा घ्या. तुमच्या वागण्या बोलण्यातून तुमचे विचार कळतील .... एखाद्याला सल्ला द्यायचा असेल तर त्याला सकारात्मक द्या. उगच एखाद्याबद्दल त्याचा मनात विष पसरविण्याचे काम करू नका.... आयुष्याचा प्रत्येकाचा पेपर हा वेगळं असणार ईथे कॉपी करता येणार नाही...तुमचा पेपर तुम्हाला सोडवायचा आहे ..कितीही कठीण परिस्थतीतून मार्ग हा निघतो फक्त थोडे थांबण्याची तयारी दाखवा... कोणतेही काम अडथळा आल्याशिवाय पूर्ण होत नाही त्यातून तुम्ही शिका ...एकतर जिंकाल किंवा हराल...                                आज माझ्या गुरूची खूप आठवण येते.... ते म्हणायचे तू चाल पुढे..... तुझ्या आयुष्यात कितीही अडथळे आले तरी तुझा पाठीचा कणा ताठ राहील कारण माझा विश्वास आहे की तू ते मोठ्या प्रयत्नाने पार करशील... आणि जिंकशील....असा विश्वास गुरूंनी दाखवला तर मला प्रत्येक लढाई ही लढावी लागेल....कारण त्या विश्वाला पात्र व्ह्याचे आहे.... ते नेहमी सांगायचे "कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजुन संपलेली नाही मी अजून जिंकलेले नाही" .स्वतः ला इतके परिपूर्ण बनवा की दुसऱ्याना नावे ठेवायला जागा उरली नाही पाहिजे.... देवाने प्रत्येकाला काहीना काही गिफ्ट दिले असते फक्त ते ओळखा आणि ते काम करा ज्यात तुम्हाला आनंद मिळेल बघा द्या चालना तुमच्या कल्पना शक्तीला बघ मिळेल यश तुझ्या हातात... फक्त पुस्तकी किडे होऊ नका पुस्तकी ज्ञान आत्मसात करून ते प्रॅक्टिकली जिवनात आणण्याचा प्रयत्न करा....                                                 जगाशी संपर्क ठेवा... परिवर्तन काळाची गरज आहे त्यानुसार जीवनात आवश्यकतेनुसार बदल करा आणि यशस्वी व्हा .... "तू चाल पुढे वाट आहे यशाची".... "ओळख तुझ्या अस्तित्वाची"..... असे बोलून त्यांनी त्याचे भाषण संपवले.... टाळ्याच्या खूप कडकडाट झाला..जेव्हा विनू मास्तर भाषण करायला उठले तेव्हा ते बोलले की आज बाई नसत्या तर हा विनू मास्तर तुम्हाला दिसला नसता. बाईंनी त्याचा बोलण्यातून आणि समजासेवेतून खूप मुलांना घडवले... आज ते यशाचा शिखरावर आहे...आज मला खूप आनंद वाटतो की आदर्श शिक्षक पुरस्कार मला माझ्या आवडत्या बाईच्या हातून मिळतो ह्या सारखी आनंदाची बाब नाही...कारण प्रत्येक जण हा आपल्या आवडत्या व्यक्ती कडून पुरस्कार घेण्यास आतुरलेला असतो... आज खूप आनंदाची बाब आहे माझ्यासाठी ... एवढे बोलून त्यांनी आपले भाषण संपवले... आणि बाईच्या पायी नतमस्तक झाले...बाई आशीर्वाद देताना बोलल्या "तू चाल पुढे वाट आहे तुझ्या यशाची"....