तु भेट ना रे नव्याने माझ्यासाठी...

This poem written by me.

खूप सार मनातलं बोलण्यासाठी,
आपल्यातल्या त्या अबोलकेपणासाठी,
होईल सगळ नीट अशी एकमेकांची समजूत घालण्यासाठी,
तू भेट ना रे नव्याने माझ्यासाठी...

आपण पाहिलेल्या त्या गोड स्वप्नांसाठी,
कधीच न मिटणाऱ्या आपल्या छोट्या छोट्या भांडणांसाठी,
उगाचच एकमेकांकडे बघून हसण्यासाठी,
तू भेट ना रे नव्याने माझ्यासाठी...

आपण सोबत बघितलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी,
तुझ्या मिठीतुन sky diving करण्यासाठी,
भीती वाटताना सुद्धा तुझ्यासोबत आकाश पाळण्यात बसण्यासाठी,
तू भेट ना रे नव्याने माझ्यासाठी...

सिग्नल वर बेधुंद होऊन वेड्यासारखं माझ्यासोबत डान्स करण्यासाठी,
ऑफिस नंतर सोबत घरी जाण्यासाठी,
तुझ्या हातची कॉफी पिण्यासाठी,
तू भेट ना रे नव्याने माझ्यासाठी...

एक दिवस एकमेकांनसोबत बिअर पिण्यासाठी,
मनातलं सगळ एकमेकांजवळ मोकळं करण्यासाठी,
तुझी song list मला ऐकवण्यासाठी,
तू भेट ना रे नव्याने माझ्यासाठी...

राहून गेलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी,
आठवणींच गाठोड बांधण्यासाठी,
माझ्यावर वेड्यासारखं प्रेम करण्यासाठी,
तू भेट ना रे नव्याने माझ्यासाठी...

रोज मला एका नवीन नावाने हाक मारण्यासाठी,
मला न आवडणाऱ्या गोष्टी मुद्दामून करण्यासाठी,
नेहमीच माझ्या सोबत असण्यासाठी,
तू भेट ना रे नव्याने माझ्यासाठी...

एक नंबरची हट्टी आहेस अस म्हणून माझे सगळे हट्ट पुरवण्यासाठी,
मी फक्त आणि फक्त तुझाच आहे ग अस रोज एकदा तरी म्हणण्यासाठी,
आकाशातील तुटता तारा बघून त्याच्याकडे मी मिळावी अशी wish मागण्यासाठी,
तू भेट ना रे नव्याने माझ्यासाठी...

शक्य असेल तर दोन पावलं सोबत चालण्यासाठी,
शक्य नसेल तर जुन्या पाऊल खुणा मनात जपून ठेवण्यासाठी,
एक दिवस मन भरून जगण्यासाठी,
तू भेट ना रे नव्याने माझ्यासाठी...

तू भेट ना रे नव्याने माझ्यासाठी .....

                                                                             Ashu.