तु असा जवळी रहा

Lovely

जेव्हा गरज तुझी भासते, जवळ  नसतो तु

जेव्हा सहवास हवा असतो, दुर असतो तु

प्रेम करतो खूप माझ्यावर, पण नेहमीच अव्यक्त तु

काळजी करतो खूप पण कधीच दाखवत नाही तु

बरं नाही मला, पण त्रासात तु

कंटाळले रे या आजारपणाला पण                    जगण्याची नवी उमेद तु

प्रित तुझी ही जगावेगळी, जीवन जगण्याचा आधार तु,

श्वास तु, ध्यास तु, माझ्या प्रत्येक श्वासात तु

असाच नेहमी जवळी रहा तु

दुराव्यातुनही प्रेम देत रहा तु