Feb 24, 2024
राज्यस्तरीय करंडक कविता

तू आणि मी..

Read Later
तू आणि मी..


दोन ध्रुवांवर दोघे आपण..


तू आणि मी..

तुला आवडतो वाफाळणारा चहा, मला आवडते गरमागरम कॉफी..
तू जेवणारा बेतास बेत, खाणार जास्तीत जास्त बटाट्याची भाजी..
मी मात्र वेडी सर्व प्रकारच्या शाकाहाराची..
तू म्हणजे अबोल, सर्व मनात ठेवणारा, मनातल्या भावनाही ओठांवर न आणणारा..
मी?? मी मात्र सतत बोलणारी, भांडून मोकळी होणारी..
तू रमणारा जगाच्या राजकारणात,
मी स्वयंपाकघराच्या कोशात..

तुला आवडतो एकांत, मी मात्र रमणारी गलक्यात..

सुट्टीची तुझी व्याख्या म्हणजे चार भिंतींच्या आत बसावे जमवून दोस्त यार,
माझ्यासाठी मात्र चार भिंती ठरतात तुरूंग..

दोन ध्रुवांवर दोघे आपण , जुळती कशा या तारा?
की म्हणतात जसे विज्ञानात तसे हे विजातीय आकर्षतात एकमेकांस..
असले जरी काहिही हे तरी एक गोष्ट आहे खास,
असलो कितीही विजातीय तरी जपतो एकमेकास..


सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//