तू आई… माझ्या बाळाची..!
( कौटुंबिक स्पर्धात्मक लघुकथा. )
…. आँ sss…
तिनं दिलेली शेवटची कळ..
जोरात लागलेले श्वास..
जोरात लागलेले श्वास..
एक जीवघेण्या प्रवासातुन झालेला पुनर्जन्म..
आणि शेवटी नाळ तुटल्याबरोबर कानात घुमणारा चिमण्या जीवाचा रडण्याचा आवाज.
.. त्याचवेळी तिच्याही डोळ्यातून बरसतोय श्रावण… आनंदाच्या सरींनी..
त्या चिमण्या बाळाला तिनं कवटाळलंय छातीशी.. आणि मग तिच्या डोळ्यात डोळे घालून ते बाळही ओढू लागलं तिच्या स्तनाग्राला…
...डोळे मिटून एक समाधानाचं सुख अनुभवत होती ती..!
तेवढ्यात…
सासूच्या आवाजाने तंद्री भंगली तिची.
सासूच्या आवाजाने तंद्री भंगली तिची.
" स्वाती s.. बसल्या बसल्या काय झोपतेस गं..?? भांडी पडलीत सिंक मध्ये , झाडू मारायचाय घराला.. आणि कपडेही आहेतच…
ते काय आपोआप होईल का..?? "
स्वातीनं डोळे उघडले.. चिमणं बाळ वगैरे काही नव्हतंच तिथे.
होता फक्त कामाचा पसारा..
पदर कमरेला खोचून ती कामाला लागली… नेहमीप्रमाणे.
… नेहमीच पडायचं हे स्वप्न तिला..!
सुरवातीला पहाटे..
नी आताशा तर कधीही.. अगदी उभ्या उभ्या डोळे मिटले तरी ते चिमणं बाळ तिच्या हाताच्या पाळण्यात दिसायचं .
भांडी धुता धुता त्याच पाण्यात डोळ्यातील थेंब मिसळले.
" आईपणाचं सुख नसेलच पदरात माझ्या..
पण देव तरी का माझं बोट पकडून तिथपर्यंत नेतो आणि अगदी शेवटच्या क्षणाला त्या सुखापासून स्वतःच मागे खेचतो..? "
तिला पडणाऱ्या प्रश्नांची उकल अजूनही गुंततच होती..
दिवसेंदिवस.
दिवसेंदिवस.
भांडी विसळताना अचानक ओकारी यायला लागली.
उलटयांच्या आवाजाने रेखाताई बाहेर आल्या..
" का गं? काय झालं?
तरी म्हणते वेळीअवेळी खात नको जावू पचत नाही.
पण आजकालच्या पोरी कुठे ऐकतात??
सासू म्हणजे वैरीण वाटते त्यांना. "
सासूच्या तोंडाचा पट्टा पुन्हा अविरत सुरु झाला..
" आत्याबाई… "
ती दम टाकत म्हणाली.
" पाळी चुकून दोन महिने झालेत. बहुधा दिवस गेलेत मला.. "
घामानं डबडबलेल्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर होती एक.
" पुन्हा...?? "
सासूनं त्रासिक मुद्रेनं तिच्याकडे पाहिलं.
" घरात एकदाचा पाळणा हलू दे म्हणजे मिळवलं..!"
हातातील जपमाळ जपत त्या आपल्या खोलीत गेल्या…
रात्री जेवणात खिरीचा बेत होता.
" अरे वा!
गोडाचा बेत दिसतोय.. काही गोड बातमी वगैरे आहे का काय घरात..? "
गोडाचा बेत दिसतोय.. काही गोड बातमी वगैरे आहे का काय घरात..? "
सासऱ्यांनी हसून स्वातीकडे पाहिलं.
तशी तिनं लाजून नवऱ्याकडे नजर वळवली.
" हो बातमी तर आहे गोडाची.. फक्त शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहिली तर..
नाहीतर पुन्हा तेच.
नेहमीप्रमाणे…
ये रे माझ्या मागल्या..! "
ये रे माझ्या मागल्या..! "
गोड खिरीत मिठाचा खडा पडावा आणि त्या खारटपणाने तोंडाची चव जावी तसं वाटलं स्वातीला.
ती गपचूप उठून बेडरूम मध्ये गेली.
सासऱ्यांनी बायकोकडे रागानं पाहिलं.
" असं बोलायला नको होतं रेखा..
दुखावली ना ती. "
दुखावली ना ती. "
ते म्हणाले.
" हो..! तुम्हीही मलाच ओरडा."
खिरीची वाटी समोर ढकलत सासूबाई म्हणाल्या.
" मी हिला काही बोलले तर लगेच माझं तोंड दिसते..
पण आजूबाजूच्या बायका मला काय म्हणतात ते कोणालाच ऐकू येत नसेल ना?
पण आजूबाजूच्या बायका मला काय म्हणतात ते कोणालाच ऐकू येत नसेल ना?
काय माहित नातवंडाचं सुख कधी माझ्या पदरात पडणार आहे ते… "
त्याही मुसमूसत आत गेल्या.
विलासराव आणि प्रकाश…
त्या बापलेकांनी एकमेकांकडं पाहिलं. दोघांच्याही नजरेतील दुःख ते समजू शकत होते..
" होईल रे सगळं नीट. तू स्वातीला सांभाळ मी तूझ्या आईला सांभाळतो.. "
प्रकाशच्या खांद्यावर हात ठेवत विलासराव म्हणाले.
त्यांच्या आश्वासक स्पर्शाने खुप बरं वाटलं त्याला.
" आत जा आता…
आपापल्या बायकांना गरज आहे आपली. "
आपापल्या बायकांना गरज आहे आपली. "
ते म्हणाले.
" थँक यू बाबा..! "
म्हणून तो आत गेला.
म्हणून तो आत गेला.
" ह्या खेपेला होईल गं सगळं नीट.. "
प्रकाश स्वातीला थोपाटत होता …
दिवसभराच्या थकव्याने त्याचा डोळा केव्हा लागला , कळलेच नाही.
स्वाती मात्र रात्रभर तळमळत होती. निद्रादेवी रुसून तिच्या डोळयांवर स्वार होण्यापूर्वीच पसार झाली होती.
स्वाती मात्र रात्रभर तळमळत होती. निद्रादेवी रुसून तिच्या डोळयांवर स्वार होण्यापूर्वीच पसार झाली होती.
पाळी चुकल्याचा आनंद एका विवाहितेलाच माहित.. आणि आई होणं..?? ते तर स्त्रित्वाच्या पूर्णतेची परिभाषाच.
स्वातीच्या डोळ्यसमोर उभे राहिले तिच्या लग्नाच्या सुरुवातीचे दिवस..
विलासराव , रेखा , ती आणि प्रकाश असं त्यांचं चौकोनी कुटुंब.
लग्नाच्या दुसऱ्याच महिन्यात स्वातीची पाळी चुकली आणि घरात कोण आनंद झाला.
नवरा तिला फुलासारखा जपत होता. सासरे तिच्यासाठी बाजारातील असतील नसतील तेवढी फळं घेऊन येत होते.
आणि रेखाताई..? त्या तर तिच्या सतत मागेपुढे करत असायच्या.
तिला कुठे ठेवू नी कुठे नको असं त्यांना झालं होतं.
सगळ्यांच्या प्रेमानं स्वाती भारावली होती. कधीकधी स्वतःच्याच सुखाचा हेवा वाटायचा तिला.
गरोदरपणानं चेहऱ्यावर आलेलं तेज.. शरीरात झालेला बदल..
तासंतास आरशात स्वतःलाच न्याहाळत असायची ती.
हे सुख तिला हवंहवंस वाटत होतं…

… तोच नजर लागली तिच्या सुखाला.
नववा महिना संपत आला नी एकाएकी बाळाची हालचाल तिला जाणवेना.
डॉक्टरांनी सोनोग्राफी सुचवली..
डॉक्टरांनी सोनोग्राफी सुचवली..
बाळ पोटातच गेले होते..!
.
.
.
घरातील आनंदी वातावरण अचानक सुतकी झाले...
रडून रडून ती बेहाल होतीच पण सोबतीला सर्वच त्या दुःख सागरात बुडाले.
रडून रडून ती बेहाल होतीच पण सोबतीला सर्वच त्या दुःख सागरात बुडाले.
…. आणि मग पुढल्या सहा महिन्यांनी परत तिला दिवस गेले.
ह्यावेळी रेखाताईंनी जास्तच काळजी घेतली. चेकअप ला जाण्याव्यतिरिक्त तिला घराच्या बाहेर पायही ठेवू देत नव्हत्या त्या. सगळं अगदी हातातल्या हातात मिळत होतं स्वातीला…
ह्यावेळी रेखाताईंनी जास्तच काळजी घेतली. चेकअप ला जाण्याव्यतिरिक्त तिला घराच्या बाहेर पायही ठेवू देत नव्हत्या त्या. सगळं अगदी हातातल्या हातात मिळत होतं स्वातीला…
… तरीही नवव्या महिन्यात तेच अघटित घडलं…
घरातील सगळ्यांनी एकमेकांना सांभाळलं याही वेळी.
.
.
.
… पण तिसऱ्यांदाही तेच घडलं तेव्हा मात्र हळूहळू रेखाताईच्या वागण्यात फरक जाणवयला लागला.
घरातील सगळ्यांनी एकमेकांना सांभाळलं याही वेळी.
.
.
.
… पण तिसऱ्यांदाही तेच घडलं तेव्हा मात्र हळूहळू रेखाताईच्या वागण्यात फरक जाणवयला लागला.
आधी अगदी मुलीसारखं जपणाऱ्या स्वातीला आता त्या सासूच्या चष्म्यातून बघायला लागल्या.
हीच पांढऱ्या पायाची असेल म्हणून घराच्या वंशाला गर्भातच गिळते असं आधी तिच्या मागे आणि आता तर अगदी तोंडावर बोलू लागल्या.
हीच पांढऱ्या पायाची असेल म्हणून घराच्या वंशाला गर्भातच गिळते असं आधी तिच्या मागे आणि आता तर अगदी तोंडावर बोलू लागल्या.
सासूसुनेपेक्षा मायलेकी म्हणून मिरवणाऱ्या त्या आता उठसुठ टोमणे मारायला लागल्या.
घरकामतूनही हळूहळू त्यांनी काढता पाय घेतला..
स्वातीनं स्वतःला घरकामात गुंतवून घेतलं आणि रेखाताईंनी देवपूजेत…
नेहमी हसतखेळत राहणारी स्वाती आता कोमेजून गेली होती.. कारण नसतानाही एक अपराधीपणाची भावना मनात घर करून बसली..
उठता- बसता.. झोपेत आणि आता तर जागेपणीही एकच स्वप्न डोळ्यात दिसत राहायचं..
..
त्या जीवघेण्या कळा.. बाळाचा रडण्याचा आवाज..
तिच्या भरलेल्या छातीवर अधीरतेनं भूक भागवणाऱ्या तान्हूल्याच्या चिमण्या हातांचा तो कोवळा स्पर्श…
त्या स्वप्नात ती हरवून जायची रात्रंदिवस..

… आणि आता पुन्हा तिची परत पाळी चुकली होती …
सहा वर्षांतलं हे चवथं गर्भार्पण..!
डॉक्टरांनी तिला सक्त ताकीदच दिली..
" स्वाती.. ही शेवटची प्रेग्नसी. तुझं गर्भाशय अशी वारंवार होणारी गर्भधारणा आता नाही सहन करू शकणार..
तेव्हा जरा जपून.. "
स्वातीही हट्टाला पेटली. सासूबाईच्या पदरात एकतरी नातवंड टाकायचंच हे मनानं पक्कं केलं..
घरातील कामं, स्वतःची काळजी… ह्यातच दिवस जावू लागला..
आणि सरतेशेवटी नववा महिना लागला तिला..
आणि सरतेशेवटी नववा महिना लागला तिला..
डॉक्टरांनी ठरवलं पंधरा दिवस उलटले की बाळाला काढून टाकायचं…
सगळं सुरळीत होईल ही वेडी आशा मनात होती. रेखाताई नीट बोलत नसल्या तरी त्याही देवाला साकडं घालत होत्याच…
आणि..
नववा लागून दहा दिवसांनीच परत तेच.. हालचाल मंदावल्याची जाणीव.
नववा लागून दहा दिवसांनीच परत तेच.. हालचाल मंदावल्याची जाणीव.
रेखाताईंनी नाक मुरडलं..
"अशी सुन असण्यापेक्षा नसलेली बरी.. ही काय मला नातवाचं सुख देणार..? "
त्यांची बडबड सुरु झाली.
प्रकाश स्वातीला सोनोग्राफी करायला घेवून गेला.
… सायंकाळी पाचच्या दरम्यान ती नर्सिंग होम मध्ये आली. हातात सोनोग्राफीची फाईल.. आणि डोळ्यात साचलेलं पाणी..!
पुन्हा तेच…
गोळया इंजेक्शनाने आर्टिफिशियल कळा आणून झालेली डिलिव्हरी… डॉक्टरांच्या हातात तिचं मृत अर्भक..
जन्मल्या बरोबर रडणाऱ्या बाळाचा आवाज ती आजवर कधी ऐकूच शकली नव्हती..
गोळया इंजेक्शनाने आर्टिफिशियल कळा आणून झालेली डिलिव्हरी… डॉक्टरांच्या हातात तिचं मृत अर्भक..
जन्मल्या बरोबर रडणाऱ्या बाळाचा आवाज ती आजवर कधी ऐकूच शकली नव्हती..
डॉक्टरांनी तिला रूममध्ये शिफ्ट केलं.
संवेदनाहीन झालेलं तिचं शरीर.. आणि डोळ्यातून गळणारे सततचे पाणी…
बाजूच्या बेडवर डोक्याला हात लावून बसलेला नवरा..
स्वातीच्या प्राक्तनात केवळ हेच होतं का..?? कसली शिक्षा भोगत होती ती..??
हा तिचा शेवटचा चान्स …
तोही देवाने हिरावून घेतला..!
रात्री थकल्या शरीराला केव्हातरी झोप लागली..
आणि अचानक जाग आली ती कानात गुंजणाऱ्या एका नवजात बालकाच्या रडण्याच्या आवाजाने..
आणि अचानक जाग आली ती कानात गुंजणाऱ्या एका नवजात बालकाच्या रडण्याच्या आवाजाने..
स्वाती बेडवरून खाली उतरली… आणि मोठ्या हिमतीने रूमच्या बाहेर पाय टाकला..
बाजूच्याच रूममधून तो आवाज येत होता..
तिनं हळूच दार लोटलं…
आतल्या बेडवर एक तरुणी होती.. आणि तिच्या बाजूलाच ते टाहो फोडणारं तान्हूलं.
.
ती तरुणी नुसतीच बसली होती.. शून्यात बघत..!
.
ती तरुणी नुसतीच बसली होती.. शून्यात बघत..!
बाजूला तिची आई तिला समजावत होती..
" अगं घे गं तिला.. केव्हाची रडतेय.. भुकेली आहे बिचारी.."
त्या तरुणीचे काळीज काही धजेना..
तिच्या भावनाच गोठल्या होत्या त्या बाळाप्रती.
तिच्या भावनाच गोठल्या होत्या त्या बाळाप्रती.
स्वातीची छाती भरून येत होती बाळाच्या आवाजाने..
कुणाशी काहीही न बोलता त्या चिमणीला उचलले तिने आणि आपल्या पान्हयाला लावलं.
भुकेला जीव पाचच मिनिटांत पोट भरून तिच्या छातीशी झोपी गेलं..
जणू काही ती तिचंच स्वप्न जगत होती..
इवल्या बाळाचा रडण्याचा आवाज..
तिच्या भरलेल्या छातीवर अधीरतेनं भूक भागवणाऱ्या तान्हूल्याच्या चिमण्या हातांचा तो कोवळा स्पर्श…
अनं छातीवरच झोपलेलं ते गोड पिल्लू…!
तिच्या भरलेल्या छातीवर अधीरतेनं भूक भागवणाऱ्या तान्हूल्याच्या चिमण्या हातांचा तो कोवळा स्पर्श…
अनं छातीवरच झोपलेलं ते गोड पिल्लू…!
एक तृप्ततेचं समाधान तिच्या चेहऱ्यावर झळकत होतं..
" ताई… या बाळाला सांभाळशील..?? "
ती तरुणी स्वातीच्या खांद्यावर हात ठेवून विचारत होती.
काय चाललंय स्वातीला काही कळेना.. दुसऱ्याचं बाळ आपल्या हातात..??
अपराधीपणानं ती बाळाला स्वतःपासून दूर करू लागली. तर ते लबाड आणखीनच तिला घट्ट पकडू लागलं.
अपराधीपणानं ती बाळाला स्वतःपासून दूर करू लागली. तर ते लबाड आणखीनच तिला घट्ट पकडू लागलं.
" अगं असू दे तुझ्याचजवळ.."
बाळाला दूर करण्याचा तिचा केविलवाना प्रयत्न बघून ती तरुणी म्हणाली.
" मी साधना..!
कोण? कुठली? नको विचारूस.
मी प्रेग्नन्ट राहिले जबरदस्तीने...
एका अत्याचाराला बळी पडून.
कोण? कुठली? नको विचारूस.
मी प्रेग्नन्ट राहिले जबरदस्तीने...
एका अत्याचाराला बळी पडून.
कळलं तेव्हा खुप उशीर झाला होता.. बाळाला जन्म देण्याखेरीज दुसरा पर्यायचं उरला नव्हता माझ्याकडे.
ह्या बाळाशी माझी नाळ जोडल्या गेली पण इमोशनली कधी जुळलेच नाही मी. जन्मानंतर एखाद्या अनाथाश्रमात ठेवणार होते मी.
पण हिला जन्म देतानाच बाजूच्या टेबलावर तू दिसलीस.. एका मृत अर्भकाची रडणारी आई..!
ह्या बाळाशी माझी नाळ जोडल्या गेली पण इमोशनली कधी जुळलेच नाही मी. जन्मानंतर एखाद्या अनाथाश्रमात ठेवणार होते मी.
पण हिला जन्म देतानाच बाजूच्या टेबलावर तू दिसलीस.. एका मृत अर्भकाची रडणारी आई..!
वाटलं देव तरी किती निष्ठुर.. ज्याला हवं त्याला देत नाही.. आणि ज्याला नको त्याला असं जबरदस्तीनं लादतो.
त्याचं क्षणी तूझ्या पदरात टाकणार होते हिला.. पण
तुझाही होकार तेवढाच महत्वाचा होता..
तुझाही होकार तेवढाच महत्वाचा होता..
हिच्या रडण्यानं हितवर आलीस तू.. जवळ असूनही माझा पान्हा नाही फुटला गं.. आणि तू नं मागताच तिची भुकही मिटवलीस.
ताई.. केवळ जन्म दिल्यानं आई होता येत नाही.. ते निभावावं लागतं..!
ते तू केलंस..
आता हेच बघ ना नऊ महिने माझ्या पोटात वाढलेलं हे लेकरू दहा मिनिटातच तुझ्यापासून दूर व्हायलाही तयार नाही.. "
तिनं आवंढा गिळला.
".. ताई.. तुझ्यापुढे पदर पसरते.. अशीच नेहमी शमवशील भूक या चिमणीची..??
आई होशील तू माझ्या बाळाची..? "
आर्त स्वरात भरल्या डोळ्यांनी साधनाने तिला विचारलं.
.
.
.
डॉक्टरांना स्वातीची केस आधीपासूनच ठाऊक होती.. आणि ती आता परत कधीच आई होणार नाही हेसुद्धा…!
.
.
.
डॉक्टरांना स्वातीची केस आधीपासूनच ठाऊक होती.. आणि ती आता परत कधीच आई होणार नाही हेसुद्धा…!
ह्यावेळी डॉक्टर न होता एक संवेदनशील व्यक्ती बनून त्यांनी केसपेपर बदलले.
स्वातीच्या समोर एका मुलीला जन्म दिल्याचं लिहिलं तर साधनाच्या पुढे मृत बाळाला..
" आई… अगं तू आजी झालीस..! "
प्रकाश आनंदाने फोनवर सांगत होता.
" वाटलंच मला..
ह्या वेळेला माझा श्रीरंग अन्याय करणार नाही हे ठाऊक होतं मला..!"
ह्या वेळेला माझा श्रीरंग अन्याय करणार नाही हे ठाऊक होतं मला..!"
भरल्या डोळ्यांनी जपमाळ बाजूला ठेवून रेखाताई हॉस्पिटलमध्ये पोहचल्या.
" स्वाती.. हिचं नाक अगदी माझ्यासारखं आहे बघ.. ओठ तुझ्यासारखे.. डोळे प्रकाशसारखे आणि चेहऱ्याची ठेवण अगदी यांच्यासारखी आहे गं..
आमच्या सगळ्यांना एकाच रूपात समावून घ्यायचं होतं म्हणून येवढया उशिराने आलीस होय…
लबाड..!! "
आमच्या सगळ्यांना एकाच रूपात समावून घ्यायचं होतं म्हणून येवढया उशिराने आलीस होय…
लबाड..!! "
त्या भरभरून कौतुक करत होत्या.
स्वाती आणि त्यांच्यातली दरी कधीचीच मिटली होती..
तिच्या डोळ्यात डोळे घालून पान्हा ओढतांना ती चिमणी हलकेच हसतेय असं स्वातीला वाटलं..
बाळाचं स्वप्न अखेर पुरं झालं होतं…!
***** समाप्त *****
ही एक सत्य कथेवर आधारित काल्पनिक कथा आहे. कुणाच्या भावना दुखवायचा कुठलाच हेतू नाही. आई न होवू शकणाऱ्या स्त्रियांच्या वेदना एक डॉक्टर म्हणून खूपदा जवळून अनुभवल्यात मी. आई होणं ही स्त्रित्वाची परिभाषा समजतात. पण ज्या स्त्रिया आई होऊ शकत म्हणून त्यांच्यातलं स्त्रीत्व नष्ट होतं का..?? केवळ जन्म देवून आई होता येत नाही.. ते निभावावं लागतं.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा