Login

विश्वासघात - भाग 3 ( अंतिम भाग )

trust


भाग - ३
एकुलत्या एक मुलाच्या सुखासाठी आईवडिल त्याचं वेगळं घर मांडून द्यायलाही तयार झाले होते. पण निदान अस्मिता ने येऊन नवऱ्याला भेटावं. त्याच्याजवळ बसावं एवढी त्यांची इच्छाही त्या स्वार्थी अस्मिता ला पूर्ण करावी असं वाटलं नाही.
दीड महिना इस्पितळात काढून अरमान घरी आला. या काळात अस्मिता फक्त आपल्या नव्या फ्लॅटबद्दल चौकशी करत होती. जखमी, दुर्बळ झालेल्या नवऱ्याला, तिच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या अरमान ला भेटावं असं तिला एकदा देखील वाटलं नाही.
अरमान ला घरी आणल्यावर त्याचे वडिल त्यांच्या वेगळ्या फ्लॅटच्या व्यवस्थेला लागले. वेगळं घर करून का होईना मुलाचा संसार सुखाचा होऊ दे, तो आनंदात राहू दे एवढंच त्यांना वाटत होतं.
पण अरमान ला जेव्हा हे कळलं, तेव्हा त्याचं मन फारच दुखावलं. ज्या अस्मिता वर आपण वेड्यासारखं प्रेम केलं, ती अस्मिता इतकी आत्ममग्न अन् स्वार्थी असावी हे त्याला सहनच होईना. तो अगदी मिटून गेला. त्याचं हसणं, बोलणं कमी झालंच होतं, ते आता पूर्णपणे बंद झालं. इतक्या महिन्यांत त्यानं अस्मिता ला फोन केला नव्हता.
तिनंही फोन केला नाही, बघायला येणं तर दूरच!
यापुढे तरी नव्या फ्लॅटमध्ये येऊन अस्मिता सुखानं नांदेल याची त्याला शाश्वती वाटेना. अस्मिता वरच्या त्याच्या निस्सीम प्रेमामुळेच तो एवढे दिवस जिवंत होता, पण आता त्याच्या मनांत फक्त निराशा होती.
आयष्यातून अस्मिता गेली तरी त्याच्या मनांतली प्रेम भावना जिवंत होती. आता मात्र ते प्रेमपार आटलं, नाहीसं झालं.
आता अरमान च्या हातापायाच्या जखमा बऱ्यापैकी भरून झाल्या होत्या. डोक्यावरचं बँडेज मात्र अजूनही होतंच. विचार करून त्याचं डोकं भणभणत होतं. रात्री झोप लागेना. म्हणून अरमान तिरीमिरीत उठला अन् खोलीतून बाहेर पडून टेरेस वर निघाला, अंधारात पायरी दिसली नाही त्यात डोकं दुखत होत, त्याचा पाय घसरला. अन् तो जिन्यावरून गडगडत थेट खाली पोहोचला. क्षणार्धांत अरमान चीं जीवनज्योत मालवली.
अत्यंत गंभीररित्या जखमी अवस्थेत असलेल्या अरमान ला भेटायला हॉस्पिटल ला अस्मिता गेली नव्हती, मात्र त्याच्या मृत्युची बातमी कळताच ती आपली आई, भाऊ, ह्यांना घेवून नवऱ्याच्या संपत्तीतला वाटा मागायला आली. कारण अस्मिता ला चांगलेच माहिती होते कि अरमान त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे आणि त्याच्या कडे गडगंज संपत्ती आहे.
अस्मिता अरमान च्या बारा व्या दिवशी त्याच्या घरी जाऊन संपत्ती मधला तिचा वाटा मागू लागली. अरमान च्या घरी जमलेले सगळे पाहुणे तिच्या या वागण्यामुळे चकित झाले होते.
एका चांगल्या स्वभावाच्या सज्जन मुलाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवणाऱ्या त्या स्वार्थी अस्मिता ला बघून सगळ्यांच्याच मनांत येत होतं की त्या निरागस मुलाच्या आयुष्याचा सत्यानाश करून ही बाई सासू सासऱ्यांकड संपत्तीतला वाटा कशी मागू शकते?
पण अस्मिता चीं सासू म्हणाली कि घे तुला काय पाहिजे ते प्रॉपर्टी मधलं आता मेल्यावर तरी आमच्या मुलाच्या आत्म्याला शांती मिळूदे.
अस्मिता मनातून खूप खुश झाली आणि प्रॉपर्टी मधला अर्धा हिस्सा तिने घेतला. आणि निघून गेली.अरमान चे आई वडील तिचे हे वागणे बघून पुरते कोसळून गेले.
अस्मिता आता त्या मिळालेल्या पैशातून नवीन फ्लॅट घेऊन आई सोबत राहू लागली. अस्मिता आणि आई अगदी मजेत राहू लागल्या.
पण अचानक कोरोनाची लाट आली आणि त्यात अस्मिता ला बँकेत जातं असल्यामुळे कोरोना चीं लागणं झाली, आणि त्या नंतर आठ दिवसात चं तिच्या आई ला हि कोरोना झाला. आणि त्यात त्या दोघींचा ही मृत्यू झाला.
काय मिळवले अस्मिता ने - ज्या पैशासाठी तिने एका सज्जन मुलाला - अरमान ला त्रास दिला आज तोच सर्व पैसा ती असाच सोडून हे जग सोडून गेली.... कधी कधी पैसा चं सगळं काही नसतं..
. सौ. सोनल गुरुनाथ शिंदे. ( देवरुख - रत्नागिरी )

🎭 Series Post

View all