विश्वासघात - भाग - 1

trust


 ....

लेखिका – सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
ही कथा - एक सत्य घटना आहे.
एका अशा मुलीचीं ही कथा आहे जिला कायम पैसा म्हणजे चं सर्व काही असं वाटत असे.
अस्मिता दिसायला सुंदर होती. तिचं लग्न ठरण्यात कोणतीही अडचण यायला नको होती. पण का कोण जाणे तिचं लग्न चं ठरत नव्हत, अस्मिता कधी कोणाला पसंद पडली तर पत्रिका जुळत नसे, कधी अस्मिता ला चं मुलगा पसंद नसे, अस्मिता ला श्रीमंत मुलगा हवा होता, हवा तसा मुलगा मिळत नव्हता, अशा अनेक अडचणी येत होत्या. बघता बघता अस्मिता चं लग्नाचं वय निघून जात होत. अस्मिता बत्तीस वर्षाची झाली होती.
अस्मिता एका बँकेत कॅशियर होती. तिथे एक पंजाबी मुलगा नेहमी पैसे भरायला वैगरे बँकेत येत असे. बघता बघता अस्मिता चं आणि त्याच जमलं. अरमान त्या मुलाचं नाव, त्याचा घरचा चांगला व्यवसाय होता. अस्मिता ला ही परिस्थिती ने श्रीमंत चं मुलगा हवा होता. आणि तसा मिळाला. सहा महिने दोघ फिरले वैगेरे इकडे तिकडे आणि त्यांनी मग घरी लग्नाचं सांगायचं ठरवलं. अरमान च्या घरी त्याने सांगितले होते आणि त्यांचा होकार होता.
अस्मिता चं ही वय वाढल्यामुळे तिच्या हि घरच्यांनी प्रेमविवाहाला परवानगी दिली. अस्मिता च्या वडिलांना पण कॅन्सर झाला होता, ते हि सध्या सतत आजारी असायचे. त्यामुळे वैदिक पद्धतीने लग्न करण्यात आले. अस्मिता च्या लग्नासाठी चं जणू वडिलांचे प्राण अडकले होते. तिचं लग्न झालं अन् एक महिन्यात चं तिचे वडील वारले.
अरमान चं अस्मिता वर खूप मनापासून प्रेम होत, पण अस्मिता ने त्याची श्रीमंती बघितली होती. अत्यंत सन्मानानं अस्मिता ला अरमान ने आपल्या घरी आणलं. दोन तीन महिने चांगलं चाललं होत सगळं, घरातलं वातावरण पंजाबी होत. घरचा चांगला व्यवसाय होता. आर्थिक बाजू भक्कम होती. पण मुळात चं फटकळ असलेल्या अस्मिता ला सासु चा स्वभाव आवडत नव्हता. अरमान चं खूप प्रेम मिळत असूनही तिची चिडचिड चालू असायची.
अस्मिता चे सासू - सासरे हे जोडपं अत्यंत सरळमार्गी होतं. सामान्यपणे पंजाबी कुटुंबात सुनेनं पंजाबी ड्रेस घालावा. तोकडे, कपडे घालू नयेत असे संकेत असतात. आपल्या सुनेनं ते पाळावेत अशी अस्मिता च्या सासू ची अपेक्षा असणं यात गैर काहीच नव्हतं.
अरमान नेहमी अस्मिता ला शांतपणे समजवायचा. थोडं धीरानं घे. आई बरोबर चांगली वाग, भांडू नकोस, हळूहळू सगळं चांगलं होईल म्हणून सांगायचा पण मुळातच हट्टी असलेल्या अस्मिता ला ते मान्य नव्हतं. एक दिवस चिडून, भांडण करून अस्मिता माहेरी निघून गेली. अस्मिता च्या आईनंही तिला समजूत घालून परत पाठवण्याऐवजी उलट अजूनच सासुबद्दल भडकवलं. माझ्या चांगल्या नोकरीला असलेल्या मुलीला हे लोक काही पण बोलतात. असं आता आई चं बोलू लागली. सासूला चांगली अद्दल घडवूया असं ती अस्मिता ला सांगायची.
मूर्ख अस्मिता ने आई च्या सांगण्याप्रमाणे अरमान चं प्रेम ठोकरलं. बिचारा अरमान किती वेळ अस्मिता च्या आइकडे जायचा. घरी चल, प्रेमानं संसार करू म्हणून विनवायचा पण अस्मिता ऐकत नव्हती. अरमान चं प्रेम तिला कळतंच नव्हतं. तिच्या आईलाही विवाहित मुलगी माहेरी येऊन राहते याचं काही वाटत नव्हतं.
लेखिका – सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
( राहणार- देवरुख – रत्नागीरी )

🎭 Series Post

View all