खरा आनंद (भाग 4,अंतिम भाग )

About Happiness In Life


खरा आनंद (भाग 4 )


आपल्या मुलीच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी त्यांचे एक जवळचे नातेवाईक त्यांच्याकडे आले होते.
"लग्नाला नक्की या पण श्रीकांतला नका आणू." असे त्यांनी स्पष्टचं सांगितले.
ते ऐकून आईवडिलांना वाईट वाटले पण त्यामागचे कारणही योग्यचं होते.

व्यक्ती चांगला असला की,सर्वांना आवडतो पण तोचं जर व्यसनी ,दुराचारी झाला तर नकोसा वाटतो.

श्रीकांतला बरे वाटत नसल्यामुळे तो त्या दिवशी घरातचं होता आणि त्या नातेवाईकांचे ते बोलणे त्याने ऐकले.ते ऐकून त्यालाही वाईट वाटले. ज्या नातेवाईकांना मी अगोदर आवडायचो, आता तेचं माझा तिरस्कार करत आहेत,मला टाळत आहेत..त्याला
आपले अगोदरचे दिवस आठवले आणि त्याने मनाशी ठरवले, ज्या गोष्टीमुळे आपले आयुष्य बदलून गेले ती गोष्ट चं आयुष्यातून काढून टाकू.

लोकांच्या बोलण्याचा आपल्याला राग येतो पण त्यामुळे जर आपल्या आयुष्यात चांगला परिणाम होणार असेल तर आपण निश्चितच लोकांचे बोलणे आपल्यासाठी वरदानच समजावे.

त्या व्यक्तिचे एक वाक्य श्रीकांतच्या मनावर परिणाम करून गेले आणि श्रीकांतने व्यसनमुक्त होण्याचा प्रयत्न सुरू केला.
श्रीकांतला या सर्व गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करावे लागले..

शरीराला व मनाला काही गोष्टींची सवय झाल्यानंतर ,त्या सवयीतून दूर होण्यासाठी संघर्ष करावा लागतो.

दारूचे व्यसन सोडताना श्रीकांतच्या मनाला व शरीराला सुरूवातीला त्रास होत होता. पण त्याने मनाचा पक्का निश्चय केल्याने होणारा त्रास तो सहन करत व्यसनमुक्त होण्याचा प्रयत्न करत होता.त्याने आपले जीवन बदलले आणि आपल्या मित्रांनाही बदलण्यास सांगितले. काहींना त्याचे म्हणणे पटले आणि त्यांनीही दारूचे व्यसन सोडून जीवन चांगले जगण्याचा प्रयत्न सुरू केला.तर काहींनी आपले आहे तेचं आयुष्य स्विकारले.

श्रीकांत घरात सर्वांशी प्रेमाने छान बोलू लागला. आईने बनविलेले जेवण आवडीने खाऊ लागला. व्यायाम, मेडीटेशन करून शरीर व मन सुदृढ करू लागला. आईवडील व बहीण यांना त्याच्या कडून ज्या बदलाची अपेक्षा होती,ती तो पूर्ण करत असलेले पाहून सर्वांना खूप आनंद झाला.
त्यांनी त्याला यासाठी वेळोवेळी सपोर्टही केला. आणि त्याची साथ त्यांनी कधीही सोडली नाही.
शारीरिक व मानसिकरित्या पूर्णपणे चांगला झाल्यावर त्याने बारावीची परिक्षा पुन्हा दिली व चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन मेडीकलला प्रवेशही घेतला.

आईवडिलांचे स्वप्न त्याने डॉक्टर होऊन पूर्ण केले.


प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार, यशअपयश येत असतात. पण त्यातून जो चांगले शिकतो व आयुष्यात त्याचा उपयोग करतो , तेव्हा आयुष्यात मिळणारा तो आनंद खूप काही वेगळाचं असतो.

श्रीकांतच्याही आयुष्यात असाच वाईट व त्यानंतर चांगला अनुभव आला त्यामुळे त्याला आयुष्याचा खरा आनंद कशात आहे, हे समजले आणि आपल्याला झालेला हा आनंद इतरांच्याही आयुष्यात द्यावे. या हेतूने त्याने \"नवी आशा व्यसनमुक्ती केंद्र\" सुरू केले.
व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीचे आयुष्य बदलून टाकण्यासाठी त्याने केलेला हा एक छोटा प्रयत्न होता.
त्याच्या या प्रयत्नाला यशही मिळत होते. अनेक व्यक्ती त्याच्या केंद्रातून व्यसनमुक्त होऊन जीवनाचा खरा आनंद घेण्यास बाहेर पडत होते.
त्यातीलच एक म्हणजे राजन शिंदे, जो आज त्याच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी आला होता.
अशा लोकांचे बदललेले आयुष्य पाहिले की, आपण केलेल्या प्रयत्नांचे सार्थक झाल्यासारखे वाटते.

श्रीकांतच्या मनात हे विचार सुरू असतानाच ,
"सर,उतरायचे ना? "
ड्रायव्हरच्या बोलण्याने श्रीकांत सर भूतकाळातून वर्तमानात आले व आपल्या कामाच्या ठिकाणी हसत हसत पोहोचले.


समाप्त
नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all