ट्रीप....5

Horror Story... To Be Continued....
   विषय गंभीर होता पण जोपर्यंत प्रियाला शुद्ध येत नाही तोपर्यंत काही कळायला मार्ग नव्हता.

आता पुढे.....

" प्रिया...अजुन किती वेळ झोपणार आहेस. आपल्याकडे वेळ नाही....उठ बाळ. चल अजुन भरपूर कामं करायची आहेत...उठ."

प्रिया दचकून जागी झाली. तिने आजुबाजुला पाहिले ती एका रूममध्ये होती. त्या रूममध्ये बऱ्यापैकी प्रकाश होता. तिच्या जखामावर पट्या बांधल्या होत्या. ती सध्या कुठे आहे हे तिला समजत नव्हतं. तिने आठवण्याच प्रयत्न केला. तेवढ्यात कुणीतरी रूममध्ये येण्याची चाहूल लागली. तिने बाजूच्या टेबलावर चा फ्लॉवरपोट हातात घेतला आणि ती समोर पाहू लागली.

अर्णव दरवाजा उघडून आत येतो तो प्रिया त्याच्याकडे संशयित नजरेने बघत होती.

" कोण आहेस तू ? आणि तू अर्णव च रूप कस आणि का घेतलंस ?" प्रिया.

" अग मी आहे ...अर्णव " अर्णव प्रियाचि समजूत काढत तिच्या जवळ जात होता. 

" बघ हवं तर..." म्हणत अर्णव ने आपला हात पुढे केला. प्रियाने एका हातात फ्लोवरपोट घट्ट पकडून दुसऱ्या हाताने त्याच्या हातावर हळूच हात लावला. तिला आता थोडा धीर आला तिने पुन्हा त्याला अगदी नखशिखांत न्याहाळलं आणि त्याला घट्ट मिठी मारली. अर्णवला थोडं वेगळं वाटलं पण प्रियाने आपल्याला ओळखलं हेच त्याच्यासाठी महत्वाचं होतं.

प्रियाच्या डोळ्यातून पाणी थांबण्याचे नाव घेत नव्हते. अर्णव ने ही तिला रोखल नाही. ती थोडी शांत झाली. तेव्हा तिला लक्षात आलं की तिने अर्नवला मिठी मारली आहे. ती पटकन बाजूला झाली.

" अर्णव तू इथे कसा ?" प्रिया

" ते जाऊदे...आधी तुझ्याबरोबर काय झालं ते सांग आणि तुझ्याबरोबर चे सगळे कुठे आहेत ? " अर्णव

प्रिया काही बोलणार इतक्यात तिला चक्कर आल्यासारखं वाटलं ती पटकन खाली बसली. तिला कुणाचा तरी अस्पष्ट आवाज येत होता. जणू तिला कुणीतरी हाक मारत असावं. ती कान देऊन ऐकायचा प्रयत्न करत होती..." प्रिया...माझ्याकडे ये...प्रिया....."

अचानक तिला कुणीतरी जोरजोरात हलवतय असं वाटू लागलं. तिला गरगरत होतं.

" प्रिया...प्रिया....तू ठीक आहेस ना ? " अर्णव प्रियाला हलवत शुध्दीवर आणत होता. 

त्याने तिला गपकन खाली बसताना पाहिलंहोत. " कदाचित अजूनही तुला अशक्तता असावी. तू....तू आराम कर आपण सकाळी बोलू.चालेल..." म्हणत अर्णव ने तिला काही गोळ्या दिल्या आणि तो बाहेर जाऊ लागला.

" अर्णव...मला तुझा मोबाईल हवा होता." प्रिया काहीसा विचार करून बोलली."मिळेल का...?"

अर्णव ने मोबाईल बाहेर काढला." कशास......"
त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत प्रियाने त्याचा फोन घेतला आणि नंबर डायल करून ती वाट पाहू लागली.
रिंग वाजली....तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली...पण लगेच चेहरा उतरला. कदाचित कॉल कट झाला असावा. तिने पुन्हा ट्राय केला. अपेक्षेनुसार कॉल लागला....पण कुणी उचलत का नाही. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा निराशा आली. अर्णव तिला पाहत होता...क्षणात चेहऱ्यावर होणारा बदल त्याला हे नवीन होत. गेली वर्षभर ती दोघं एकमेकांशी फोनवर बोलत होते पण पहिली वेळ त्याने तिला अस पाहिलं होतं. ह्या क्षणी सुध्दा त्याला ती एकदम क्यूट वाटली.

शेवटी न राहवून अर्णव ने तीच्यावरची नजर बाजूला केली. पण काही केल्या तिला बघत राहावं असं त्याला वाटत होतं.

" प्रिया...कोणाला कॉल करतेस..?" अर्णव

" अनं sss..." तिच्या चेहऱ्यावर पुन्हा निराशा आली.

" प्रिया...मला सांगशील का...काय झालंय ते..?" अर्णव.

" प्रियाsssss....." कुणीतरी प्रियाला हाक मारत होतं पण हा आवाज तिला एकदम विचित्र वाटला. ह्यापूर्वी तिने हा आवाज ऐकला होता पण कुठे????? 

प्रिया पुन्हा विचारात गढून गेली. की पुन्हा तोच आवाज. त्या आवाजाबरोबर थंड हवेची झुळूक आली. प्रियाला अस वाटल की कुणीतरी तिला बोलावते आहे. हळू हळू प्रियाच्या डोळ्यासमोर काळोख आला.


प्रिया अर्णव कडे पाठ करून उभी होती. अर्णव ने तिला पुन्हा हाक मारली पण तिने काही उत्तर दिलं नाही. तसा अर्णव तिच्या समोर जाऊन उभा राहिला. प्रीयाचि मान खाली होती. चेहऱ्यावर केस आले होते त्यामुळे तिचा चेहरा दिसत नव्हता. अर्णव ने तिची मान आपल्या हाताने वर केली. तिला पाहताच अर्नवच्या काळजात चर्र.... झालं. तो दोन पावले मागे गेला. 

प्रियाचे दोन्ही डोळे पूर्ण काळे झाले होते. दात पूर्ण सडून काळे झाले होते. तिच्या तोंडातून लाळ गळत होती आणि घाण वासही येत होता. ती त्याच्याकडे बघून विद्रूप हसली. काही क्षण त्याला आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना.










माया केस मोकळे सोडून बसली होती. तिच्या समोर असलेल्या हवनकुंडातून आगीच्या ज्वाळा बाहेर येत आणि पुन्हा शांत होत. ती बाजूला असलेल्या भांड्यातून  भस्म घेई तोंडाजवळ नेऊन मंत्र म्हणून त्या शांत झालेल्या हवनकुंडात टाकी की पुन्हा आगीचा भडका उडे.

प्रिया तिथून पळून गेल्यापासून माया हवन करत होती. कारणही तसंच होतं. मायाच्या शक्ती पुढे कोणाचा निभाव लागणं अशक्य....! अस असताना प्रियाला कोणीतरी मदत केली....पण कोणी....???

माया आता शांत झाली होती. तिने डोळे मिटले. कदाचित तिने केलेल्या हवनमुळे तिला तिचा शत्रू दिसणार होता.


ती डोळे बंद करून त्याला शोधत होती की समोर एक प्रकाश दिसला. त्या प्रकशात कुणीतरी उभा असावा. त्याचा चेहरा दिसत नव्हता. फक्त त्याच्या शरीराची बाह्याकृती दिसत होती. त्याच्या बाजूला चार प्राणी होते. ते ..ते श्वान असावेत. त्या आकृती भोवती ते श्वान आरामात बसले होते तर एक श्वान माया कडे रोखून पाहत होता. जणू त्या आकृतीच्या एका इशाऱ्यावर तो श्वान मायावर तुटून पडणार होता. माया ला त्या प्रकाशाची तीव्रता आता सहन होईना. तिने पटकन डोळे उघडले. तिने एकवार त्या शैतानी मूर्तीकडे पाहिलं आणि पुन्हा तिने काही मंत्र पुटपुटले आणि हातात घेतलेला भस्म त्या हवन मध्ये टाकला त्या बरोबर एक स्पोट झाला. माया त्या हवन कडे बघत हसली. " हा हा हा... कितीदा वाचवशिल तिला....? बघू किती हिम्मत आहे तुझ्यात....शेवटीbती माझ्याकडेच येईल. तिला यावंच लागेल. तू तिला नाही वाचवू शकत. ही वेळ माझी आहे आणि मी तिला घेऊन जाईन." माया पुन्हा अक्राविक्राळ हसली....तिच्या हसण्याने पूर्ण जंगल हादरून गेलं. 




इकडे अर्णव प्रियाला पाहून पुरता घाबरला होता. त्याच्या तोंडातून आवाजही बाहेर निघेना. त्याच्या पूर्ण आयुष्यात त्याला पहीलि वेळ भूत या गोष्टीवर विश्वास ठेवावा लागला होता. प्रिया एक एक पाऊल पुढे टाकत होती तर जसजशी  ती जवळ जवळ येत होती. अर्नवची धडधड वाढत होती.

" प्रिया....प्रिया...काय झालं....?" अर्णव तिला हाक मारत होता. तो एक एक पाऊल मागे जात होता. अर्णव कशालातरी आपटला आणि त्याच्या हातून काहीतरी खाली पडलं. त्या आवाजाने बाहेर असलेले सर्व रूममध्ये आले. 

" काय झालं सर....? कशाचा आवाज आला....?" वाघमारे.

अर्णव चा चेहरा बघून सर्वांना कळून चुकलं की काहीतरी गडबड आहे. आता सर्वजण प्रियाकडे पाहू लागले. प्रियाच लक्ष अजुन अर्णव वर होतं. ती त्याच्याकडे बघून घुरघुरत होती. हळूहळू तिची घुरघुर वाढू लागली. आता तर ती मोठमोठ्याने हसू लागली. तिचं हसणं पाहून सर्वजण दचकले. सगळे तिलाच पाहत होते. ती हळूहळू हवेत तरंगू लागली.

" बघ....बघ....एका झटक्यात मी हिला तिचं खर रूप दिलं. तू तिला याच रुपापासून दूर ठेवत होतास ना ? बघ हा.हा.हा ही वेळ माझी आहे आणि मला कोणीही रोकु शकत नाही. तुही नाही." प्रिया घोगऱ्या आवाजात मोठमोठ्याने बोलत होती. सगळे तिला पाहून अक्षरशः जागीच थिजले होते. कोणाला काय करावे काही समजत नव्हतं. जस प्रियाच बोलणं थांबलं तश्या त्या रूम मध्ये असणाऱ्या वस्तू खाली पडू लागल्या. प्रिया पुन्हा हसू लागली. जसजसं तिचं हसणं वाढत होतं तसतसं वस्तूंच्या हालचाली वेगाने वाढत होत्या. हळूहळू त्या वस्तू हवेत तरंगू लागल्या आणि अचानक....प्रत्येकावर त्या वस्तू जोराने फेकल्या जाऊ लागल्या. जणू त्या वस्तू कुणीतरी त्यांच्यावर मारत असावं. सर्वजण वस्तुंच्या होणाऱ्या माऱ्यापासून वाचण्यासाठी पळू लागले.

तेवढ्यात एका बाजूला उभा असलेला इन्स्पे. वाघमारे तडक प्रीयाकडे आला. त्याने तिच्या एका पायाला हवेत घट्ट पकडले आणि डोळे बंद करून काही मंत्र म्हणू लागला. तस प्रियाला जणू हजार व्हॉल्टचा शॉक बसला ती मोठ्याने किंचाळली त्या बरोबर हवेत उडणाऱ्या सगळ्या वस्तू खाली पडू लागल्या. क्षणात प्रियही खाली पडली. ती खाली पडताच वाघमारे ने अर्णव ला हाक मारली. अर्णव अजुन थिजल्यासारख काय चाललंय हे पाहत होता. एकदोन वस्तू त्याला जोरात बसल्या पण तरीही त्याला काही समजलं नाही. प्रियामध्ये झालेला तो बदल पाहून अर्णव कोड्यात पडला.

" sir...." वाघमारे थोडा मोठ्यानेच ओरडला. त्याच्या आवाजाने अर्णव ताळ्यावर आला.

प्रिया निपचित पडली होती. तिला पाहून अर्णव च्या डोळ्यात टचकन पाणी आल. ते त्याने कुणालाही न दाखवता हातानेच पुसल. हा ही वेगळी गोष्ट की ते कुणाच्या नजरेतून नाही सुटू शकलं.

" सर...मला वाटतं आपण यांना एखाद्या मांत्रिकाकडे घेऊन जाऊया."

" ..." अर्णव

" सर...ही वेळ विचार करायची नाही आहे. मी एका मांत्रिकाला ओळखतो. आपण तिथे जाऊ." वाघमारे.

अर्णव ने एक दीर्घ उसासा टाकत प्रियाला अलगत उचलले. वाघमारे एव्हाना रूम मधून निघून गाडी काढण्यासाठी बाहेर गेला होता. अर्णव प्रियाला घेऊन बाहेर आला. काही क्षणापूर्वी त्याचा या गोष्टीवर अजिबात विश्र्वास नव्हता पण आता जे काही त्याने पाहिलं होतं त्यानंतर वाघमारेचं ऐकणं त्याला भाग होत. 

वाघमारे स्वतः ड्रायव्हरच्या सीटवर बसला होता तर अर्णव प्रियाला घेऊन मागे बसला होता. वाघमारे ने समोरच्या आरश्यातून मागे बसलेल्या अर्णव कडे पाहिलं. अर्णव ने प्रीयाचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं होतं. त्याला समजत नव्हतं की अचानक प्रियाला काय झालं ?

" सर चिंता नका करू. मी ज्या माणसाकडे नेत आहे ते तुम्हाला आणि यांना या सर्वातून बाहेर काढतील." वाघमारे.

अर्णव यावर काही बोलला नाही. त्याला फक्त प्रिया ठीक व्हायला हवी होती आणि त्यासाठी तो काहीही करू शकत होता.


क्रमशः....


🎭 Series Post

View all