एका ट्रिप ची गोष्ट.. डॉ.अनिल कुलकर्णी

Trip Of Senior Citizens




एका ट्रिपची गोष्ट
आपल्या अवतीभवती पाहण्याच्या, समजून घेण्याच्या अनेक गोष्टी असतात पण आपण त्यासाठीठ वेळच देत नाही.आपल्या व्यक्तिमत्त्वाची उंची मोजायची असेल तर समाजात मिसळायला हवं. समाजातील दुःखं टिपता यायला हवीत.
विरंगुळा म्हणून आम्ही बाहेर पडलो आणि माणसांचा गोतावळा आम्हाला मिळाला.
मंगलम वृद्धाश्रम नव्हें आनंदाश्रमच"
कोथरूड येथील आम्ही बारा सीनियर सिटिझन्स नी ठरविले की सहलीला जायचे आणि वृद्धाश्रमातच जायचे ठरले. कारण तसेच होते, लोकांच्या समस्या जाणण्याच्या. काही भांडी अश्रमास दिली. काही प्रमाणात आर्थिक मदतही केली.करावोके,भजन यांचे गायन तसेच तेथील राहणाऱ्यांच्या बरोबर गप्पागोष्टी केल्या.पुण्यापासून २२ किलोमीटर अंतरावर पौड जवळचा वृद्धाश्रम निवडला. व्यथा जाणून घेण्यासाठी गेलो आणि आनंद घेऊन परत आलो.समाजसेवेचा पॅटर्न नसतो ही एक प्रोसेस असते.
सुखासीन आयुष्य सोडून मुलांमध्ये आणि नातवंडामध्ये, चांगल्या घरांमध्ये, शहरात राहण्याची संधी असतांना केवळ वॄद्धांच्या सोयीसाठी, निसर्गरम्य परिसरात दोन एकर जागेत सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मंगलम वृद्धाश्रम येथील राघवेंद्र तळवळकर व अमृता तळवळकर यांना भेटायलाच हवं. दोन्ही मुली परदेशी स्थायिक त्यांनी येण्यासाठी आग्रह केला.पण कुणीही काहीही सांगितलं नसताना किंवा समाधानासाठी दुसऱ्याच्या चेहर्‍यावर हास्य फुलवण्यासाठी अजूनही काही लोकआहेत. अनेक वृद्धाश्रमात व्यवस्थापक नेमून वृद्धाश्रमाचे काम चालवलं जातं. पण आपल्याच उपस्थितीत वृद्धांना घरच्या सारखी वागणूक देऊन त्यांच्याशी हसत-खेळत वेळ व्यतीत करणं हे संवादाचं उत्तम उदाहरण आहे. सगळ आहे पण संवाद नाही ही आजची शोकांतिका आहे. सुखासीनआयुष्यापेक्षाही समाधानाचं आयुष्य प्रत्येकाला हवं असतं.
सगळ आहे पण काहीच नाही ही आजची अवस्थाआहे. समाजसेवेसाठी आपल्या अवतीभवती काय चाललं आहे याचं निरीक्षण करूनच ती आपल्याला सापडते. समाजसेवा पुस्तकात वाचायला मिळेल पण जोपर्यंत ती मस्तकात आपल्या जात नाही तोपर्यंत आपण त्यासंदर्भात काही विचार करत नाही. अजून तरी समाज सेवेचे ऑनलाइन वर्ग सुरू झाले नाहीत. दुःख टिपणारे टिपकागादा प्रमाणे मन असेल तर समाजसेवा घडते.
पुण्यापासून २२ किलोमीटर अंतरावर पौड गावाजवळ हा आश्रम आहे. साठ वर्षाच्या वरील वृद्ध १५ हजार रुपये देऊन राहू शकतात, पण जे काहीच देऊ शकत नाहीत, तेही इथे आहेत, पण त्याबद्दल एकमेकांना त्याची कल्पना दिली जात नाही. राघवेंद्र व अमृता तळवळकर यांनी आपापले छंद जोपासून ,जे आर्थिक उत्पन्न होईल तें आश्रयासाठी देण्याचे ठरविले आहे. राघवेंद्र यांचे जे.जे.आर्ट्स मध्ये शिक्षण झाले. ॲडव्हर्टायझिंग क्षेत्रातून ते निवृत्त झाले व त्यांच्या पेंटिंगस विक्रीला आश्रमात आहेत, अमृताच्या सुद्धा अनेक वस्तू विक्रीला उदा. सुंदर पर्स, गोधडी ई.वस्तू इथे आहेत ,ज्या घेतल्याशिवाय आपण परत येऊ शकत नाही.
दोन एकर जागेमध्ये मंगलम वृद्धाश्रम आहे. ट्रष्ट तर्फे हा आश्रम चालवला जातो . पूर्वी ची ५० आंब्याची झाडे आता तळवळकरांनी वाढवलीआहेत, भाजीपालाही लावला जातो. प्रशस्त जागेत व निसर्गाच्या सान्निध्यात हा आश्रम आहे. सहा महिला व एक आजी-आजोबा असे सध्या येथे राहत आहेत. बाहेरच्या लोकांसाठी राहण्याची व जेवण्याची उत्तम सोय आहे. तसेच इतरही लोकांसाठी नामात्र रुपये दिवसाला आकारणी करण्यात येते त्याच्या मध्ये राहणे, जेवण याचा समावेश आहे त्यामुळे एक-दोन दिवस राहयला ही इथे अनेक जण येतात. वाढदिवस किंवा इतर अनेक प्रकारच्या कार्यक्रमासाठी इथे लोक येतात.
प्रत्येकाची दुःखं वेगळी आहेत. घरच्यांनी काही दिवस बदल म्हणून इथे त्यांना आणले, पण आता इथून ते जायला तयार नाहीत, खरंतर आश्रमच त्यांचे घर झाले आहे. दोन दिवसाची सहल, वाढदिवस पार्टी कार्यक्रमाचे आयोजन ईथे करता येते ,राहण्याची चांगली सोय जेवणाची चांगली सोय आहे. संस्था असल्यामुळे नफा कमावणे हे उद्दिष्ट नाही.८८५७०२६९१७ हा नंबर आश्रमाचाआहे आश्रमाची वेबसाईटही आहे.
सगळ्यांसाठी ट्रीप करायला हे ठिकाण खूप छान आहे.
डॉ.अनिल कुलकर्णी पुणे ९४०३८०५१५३