संध्याकाळचे सात वाजलेले असतात. तो दिवस कस्सा गेला कळलच नाही. पण प्रिया मात्र अजूनही त्याच मुलीच्या विचारात होती. माहित नाही का पण तिला आता फार भीती वाटतं होती. अस वाटत होत की काहीतरी घडणार आहे. खूप भयानक...अचानक प्रियाचा फोन वाजतो ती जवळजवळ घाबरतेच. बघते तो बाबांचा कॉल...." हा हॅलो बाबा बोला..." तिच्या आवाजातील बदल बाबांच्या लगेच लक्षात येतो.
" बाबी काय झालं...?? सगळं ठीक आहे ना...?"
" हो बाबा. आम्ही जेवायला थांबलो आहोत. आता जेऊन लगेच घरी यायला निघू. रात्री दहा अकराच्या सुमारास पोहचू पण तुम्ही आहात कुठे...?"
"अग तुला कॉल करायचं म्हणून देवळाच्या जरा पुढे आलोय. म्हटलं कॉल करून बघावं कुठपर्यंत पोचलाय ते एकदा घरी गेलो की तुला कॉल करता येणार नाही म्हणून. "
" हा ठीक आहे. तुम्ही जेवलात का ?"
"हो जेवलो. चल ठेऊ का फोन ?"
" हो चला बाय...निघताना msg करेन " प्रियाने त्यांना काही न सांगायचं ठरवलं.
सर्वजण हॉटेल मध्ये गेले होते. प्रियाही जाऊन त्यांच्यात बसली. सर्वांनी नॉनव्हेज ऑर्डर केलं होत. पण प्रियाने मात्र व्हेज ऑर्डर दिली.
पुन्हा प्रीयाचा फोन वाजला. अर्णव चा कॉल होता. सकाळपासून तिने अर्णव ला कॉलच काय तर एक मेसेज सुध्दा केला नव्हता." हेल..."ती बोलणारच होती की...
" ये तू कोण समजते ग स्वतःला ?? निदान सांग तरी की मी बिझी आहे म्हणून. नाही कॉल उचलत, नाही मेसेज चा रिप्लाय देत काय झालं ते तरी सांग ना. माझ काही चुकलं का ? की तुझा अजुन राग नाही गेला." अर्णव ने तिला बोलूच दिलं नाही.
तीही शांत होती आजूबाजूला सगळे बसले होते. ती उठली. जेवण यायला अजुन वेळ होता. " सोना मी आलेच..." अस म्हणून प्रिया बाहेर आली..
" सॉरी...." तिचा आवाज कमालीचा शांत झाला होता. एवढी बडबड करणारी प्रिया आज अचानक शांत. काही तरी गडबड आहे नक्की.
" Priyu...what happened? आर यू ऑल राईट ?" अर्णव ने तिला जरा काळजी च्या स्वरात विचारलं.
आता मात्र प्रिया च्या मनाचा बांध तुटला तिने अर्णवला सगळं सांगितल.
.
.
.
" मी जर हे बाबांना सांगितलं तर ते उगाच चिंता करतील म्हणून मी त्यांना काही नाही सांगितल." प्रियाला माहीत होत अर्णवचा या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही.
.
.
.
" मी जर हे बाबांना सांगितलं तर ते उगाच चिंता करतील म्हणून मी त्यांना काही नाही सांगितल." प्रियाला माहीत होत अर्णवचा या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही.
भूत प्रेत देव दानव या गोष्टी माणसाच्या मनाचे खेळ असतात. अर्णवला त्याच्या कर्मावर विश्वास होता.
पण जे प्रत्यक्षात घडलं त्याचा साक्षीदार प्रियाच होती.
आणि प्रियाचा या गोष्टी वर विश्वास होता. ती फार घाबरली होती.
पण जे प्रत्यक्षात घडलं त्याचा साक्षीदार प्रियाच होती.
आणि प्रियाचा या गोष्टी वर विश्वास होता. ती फार घाबरली होती.
अर्णव तिला शांत करतो ." हे बघ प्रिया तु गोळ्या घेतल्यास ना ? कदाचित त्याचा परिणाम आहे हा आणि ती मूलगी तुलाच का दिसली ? सांग ना ती तर सोना बरोबर बोलत होती ना ? मग ती तीला का नाही दिसली ?"
तीला काय कराव ते सूचन नव्हतं." हा .. आले " असं खोट खोट बोलून कॉल कट केला आणि ति आपल्या जाग्यावर जाऊन बसली.
.
.
सर्वांनी जेवणे उरकली. आता परतीचा प्रवास होता. सर्वजण फार थकले होते. गाडीत बसल्या बसल्या सर्व निद्राधीन झाले. फक्त प्रिया एकटी जागी होती. तिला अर्णव चे शब्द आठवत होते.
.
.
सर्वांनी जेवणे उरकली. आता परतीचा प्रवास होता. सर्वजण फार थकले होते. गाडीत बसल्या बसल्या सर्व निद्राधीन झाले. फक्त प्रिया एकटी जागी होती. तिला अर्णव चे शब्द आठवत होते.
तस पहायला गेलं तर दोघांचेही स्वभाव अगदी विरुद्ध होते अस नाही पण दोघांमध्ये एका गोष्टीवरून नेहमी भांडणं होत. हेच की देव आणि दानव अॅण्ड ऑल.
अचानक जोराचा ब्रेक लागला आणि प्रियाची तंद्री तुटली. काय झाल ? गाडी का थांबली ? म्हणून रवि आणि मालक ड्रायव्हर कडे गेले.
" काय झालं ..." पल्लू वहिने ने मागूनच विचारल.
" काय माहित .... ? " कुणीतरी पुढून उत्तर दिलं.
थोड्या वेळाने रवि तिथे आला.
" काय झालं रवि ... गाडी का थांबली ? " सोना
" गाडी पंक्चर झाली आहे. " रवि
"काय ??? " प्रिया जवळजवळ ओरडली.
तिच्या मनान असणाऱ्या शंकेने आता खात्रीची जागा घेतली. तिला जाम भिती वाटत होती.
" ऐवढ घाबरायला काय झालं ? स्टेपनी आहे होईल एक अर्ध्या तासात. तोपर्यंत बाहेर पाय मोकळे करा." म्हणत रवि बाहेर गेला.
सर्वजण गाडीबाहेर उतरले. प्रियाही उतरली. आजूबाजूला घनदाट जंगल उजेडाच्या नावावर रस्त्याच्या बाजूचे दोन लाईट्स चे पोल होते पण त्यांचा प्रकाश त्यांच्यापुरताच.
प्रिया खाली उतरताच तिला शहारून आलं. भयंकर थंडी होती.
" आज ऐवढा काळोख कसा ? अजिबात चांदणं नाही." प्रिया
प्रिया खाली उतरताच तिला शहारून आलं. भयंकर थंडी होती.
" आज ऐवढा काळोख कसा ? अजिबात चांदणं नाही." प्रिया
" अग... आज अमावस्या आहे. " सोना
" ये तिकडे काय करतात ? इकडे या..आम्ही अंताक्षरी खेळतोय. " पल्लू वहिनी.
सर्वजन गोल बसून अंताक्षरी खेळेत होते. आठ वाजले होते. प्रियाचं चित्त स्थिर नव्हतं. तेवढ्यात अर्णवचा कॉल आला " आलेच हा मी म्हणत." प्रिया उठली आणि कॉल रिसिव्ह करत जरा बाजूला झाली. ती फोनवर बोलत होती की तिचा लक्ष समोर गेला. सोना तिच्या समोर पाठमोरी उभी होती. \" ही इथं काय करतेय ?\" म्हणत प्रियाने तिच्या खांद्यावर हात ठेवला. क्षणभर प्रिया दचकली.
सोना एकदम थंडगार झाली होती. प्रियाचा स्पर्श होताच सोना मोठ्याने किंचाळली. प्रियाने पटकन हात बाजूला केला व ति तिच्या समोर उभी राहिली. आता मात्र प्रियाची दातखिळीच बसली.
सोना चा चेहरा पांढराफटक झाला होता. डोळे पूर्ण काळे, दात एखाद्याच रक्त पिऊन आल्यागत एकदम लालभडक. सोना ने प्रिया कडे एक अमानवीय क्रूर हास्य केलं तशी प्रिया पाठच्यापाठी पडली. आता मात्र तिने मोठी किंकाळी फोडली.
तिच्या आवाजाने सर्वजण धावत तिथे आले " काय ग...काय झालं ? " सर्वजण प्रियकडे पाहत बोलले. प्रिया मात्र सोनाली पाहत होती.
" ते...ते.. स..सोना....तिचे डोळे..." प्रियाला काय सांगावे ते सुचत नाही. आता सर्वजण सोनाकडे बघतात.
" ये...मी काय केलं...? अचानक तू माझ्या खांद्यावर हात ठेवला म्हणून मी दचकले. पण तू मला पाहून अशी किंचाळलीस जणू ( थोडीशी खाली झुकत. ..पुन्हा अक्राळविक्राळ रूप घेऊन ) मी भूत आहे....हा..हा..हा " सर्वजण हसत होते. सोना मात्र प्रीयाकडे पाहत पुन्हा बोलली. " पण मी काही भूत नाही .....मी तर....हडळ आहे हडळ." सोना च्या तोंडातून घाणेरडा वास येत होता. ती दुरून बोलत होती पण प्रियाला तो वास सहन होईना.
" ए सोना... नको तिला घबरवू. चला गाडी झाली असेल. म्हणत सगळे आपल्या जागेवर आले. तोच तिथे ड्रायव्हर आला.
" ते स्टेप नी तर लावली पण ... मागचे दोन्ही टायर पंक्चर झालेत ..." ड्रायव्हर.
" काय ??? .. " सर्वजण
" आता काय करावं ? किती वेळ लागेल काय माहिती. आणि नेमकं आजूबाजूल पूर्ण जंगल आहे. " पल्लू वहिनी.
" मी काय म्हणते मी मघाशी एक होटेल बघितलं. या जंगलात पण जरा आत आहे. तेच बघत होते मघाशी." सोना.
" नाही....तू सोना नाहीस. तू \" ती \" आहेस. सांग सोना कुठे आहे ती." प्रिया
आता मात्र रवी तावातावाने आला तो काही बोलणार इतक्यात " थांब रवी... प्रियाची तब्येत बरी नाही. तिला आराम करू दे. कदाचित तिला भास झाल्यामुळे घाबरली आहे." मालक शांततेने म्हणाले.
" पल्लवी वहिनी....प्रिया बरोबर रहा." मालक
प्रिया काही बोलणार इतक्यात पल्लवी वहिनी ने तिला बाजूला नेऊन बसवलं. प्रियाला काही समजत नव्हतं. तिने सोनाकडे पाहिले ती तिच्याकडे बघत हसत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच हसू होतं. जणू ती सांगत होती की ती जिंकली आहे. आता काही खरं नाही तुमचं. ? सर्वजण सोनाबरोबर तिने सांगितलेल्या हॉटेल मध्ये आले.
तीन मंजीला त्या हॉटेलमध्ये फक्त "ती" आणि "ती" च्या हाताखाली दोन माणसं. बाकी तिथे चिटपाखरूही नव्हतं.
प्रियाने सगळ्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण कुणीही काही ऐकून घ्यायला तयार नव्हते. जणू सर्वजण "ति"च्या संमोहनात अडकले असावेत. " त्या मायाची माया सर्वांवर झाली होती. पण मग तिचा असर माझ्यावर का नाही झाला. तिने आम्हाला इथे का आणलं ? काय असेल तिच्या मनात ? कारण मारायचं असतं तर "ती"ने तिथेच मारलं असतं...पण नाही मारलं." प्रिया विचार करून थकते. अचानक तिला कुणाचा तरी आवाज आला. तिने आजुबाजुला पाहिले, प्रिया शिवाय तिथे कुणीच नव्हते. प्रिया तिथून उठली आणि रूमच्या बाहेर आली.
प्रियाने सगळ्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण कुणीही काही ऐकून घ्यायला तयार नव्हते. जणू सर्वजण "ति"च्या संमोहनात अडकले असावेत. " त्या मायाची माया सर्वांवर झाली होती. पण मग तिचा असर माझ्यावर का नाही झाला. तिने आम्हाला इथे का आणलं ? काय असेल तिच्या मनात ? कारण मारायचं असतं तर "ती"ने तिथेच मारलं असतं...पण नाही मारलं." प्रिया विचार करून थकते. अचानक तिला कुणाचा तरी आवाज आला. तिने आजुबाजुला पाहिले, प्रिया शिवाय तिथे कुणीच नव्हते. प्रिया तिथून उठली आणि रूमच्या बाहेर आली.
प्रिया तळमजल्यावर होती. बाकीचे सर्व सोना बरोबर गेले होते. प्रियाला कुणीतरी कुजबुजत असलेल्या चा आवाज आला. ती दुसऱ्या मजल्यावर आली.
लांबच लांब व्हरांडा आणि दोन्ही बाजूला बंद रूम. छताला छोटे छोटे बल्प होते. पण त्यांचाही पुरेसा प्रकाश नव्हता त्या व्हरांड्यात. जीवघेणी शांतता. प्रिया हळूहळू पायऱ्या चढून वर आली. तिला दोन रूम सोडून तिसऱ्या रूममध्ये कुणीतरी हस्तयं, बोलतंय असं वाटत होतं. ती हळु हळु त्या रूमकडे जात होती. जसजशी ती जवळ जात होती तसतशी तिची धडधड वाढत होती. तिने हळूच रूमचा दरवाजा उघडला.
" करररर..." करत दरवाजा उघडला. आत दोन तीन मुल मुली बसली होती. त्यांचं आपापसात बोलणं चालू होत. प्रियाने त्यांना निरखून पाहिलं अन् तिला धक्काच बसला. ती मुलं तिच्या प्राथमिक शाळेतील होती.
" पण अस कसं शक्य आहे ?? कारण....आता ती माझ्या एवढी मोठी झाली असतील." प्रिया मनातल्या मनात म्हणाली. प्रिया त्या मुलांकडे पाहत होती तोच त्यातील एकाचा लक्ष प्रियाकडे गेलं. तस त्याने बाकीच्यांना इशारा केला आता सगळे तिच्याकडेच बघत होते.
" पण अस कसं शक्य आहे ?? कारण....आता ती माझ्या एवढी मोठी झाली असतील." प्रिया मनातल्या मनात म्हणाली. प्रिया त्या मुलांकडे पाहत होती तोच त्यातील एकाचा लक्ष प्रियाकडे गेलं. तस त्याने बाकीच्यांना इशारा केला आता सगळे तिच्याकडेच बघत होते.
त्यांचे डोळे पूर्ण काळे आणि अचकट विचकट हसत ते तिच्याकडे येऊ लागले. जसजसे ते प्रियाच्या जवळ येत होते तशीतशी ती मागेमागे जात होती. मागे जाताजाता ती कशाला तरी अडकली आणि मागे पडली. ती दरवाज्याला आपटली होती. प्रियाने झटकन दरवाजा लावून घेतला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती घामाने चिंब भिजली होती. प्रिया उठून खाली जाण्यासाठी वळली. तो काय.....व्हरांडा लांबच लांब होत होता. त्याची लांबी क्षणाक्षणाला वाढत होती आणि अचानक " ती" प्रियाच्या समोर उभी राहिली. दूर उभी असली तरी तिचे क्रूर हास्य, तो घाणेरडा जीवघेणा दर्प, तिची ती स्थिर नजर प्रिया थिजल्यासारखी एका जाग्यावर खिळून राहिली. प्रियाला वाटत होतं की पळून जावं. कुठेतरी लपून बसावं पण कुणीतरी तिच्या पायांना धरून ठेवल्यागत प्रिया स्तब्ध झाली होती. ती हवेत तरंगत तरंगत प्रियाजवळ येत होती.
प्रीयाचा लक्ष तिच्या केसांवर गेला. लांबसडक तिचे केस एखाद्या नागिनि सारखे वळवळत होते. आता मात्र प्रियाला तिथून पळण गरजेचं होते. तिने होती नव्हती ती सगळी शक्ती एकवटून मागे वळली आणि धाड दिशी भिंतीवर आपटली.
प्रीयाचा लक्ष तिच्या केसांवर गेला. लांबसडक तिचे केस एखाद्या नागिनि सारखे वळवळत होते. आता मात्र प्रियाला तिथून पळण गरजेचं होते. तिने होती नव्हती ती सगळी शक्ती एकवटून मागे वळली आणि धाड दिशी भिंतीवर आपटली.
"अरे इथे भिंत कशी...." प्रिया गोंधळात पडली. तिने मागे वळून पाहिलं तर ती अजूनही तिथेच होती. डोक्यातून रक्त वाहत प्रियाच्या गालावर आलं. " ती " प्रिया च्या वाहणाऱ्या रक्ताकडे अधाश्यासारखी पाहत होती " ति " प्रियापासून चार हात लांब होती. तिने आपली जीभ बाहेर काढली. तिची जीभ येव्हाना प्रियाच्या अगदी समोर पोहचली. " ति " ने हळूच प्रियाच्या गालावरचा रक्ताचा थेंब चाटायला जीभ तिच्या गालावर लावली तोच.... तिच्या स्पर्शाने आगीच्या ठिणग्या उडाल्या. " ति " जोरात किंचाळत गायब झाली. प्रियाने दोन्ही हात कानावर ठेवले तरीही तिच्या किंचाळीचा आवाज तिच्या कानात बसलाच.
थोड्यावेळाने प्रियाने डोळे उघडले सर्व पूर्ववत झाले होते.
प्रिया धावत खाली आली. रवि आणि मालक तिथे बोलत उभे होते. प्रिया त्यांच्याकडे गेली.
प्रिया धावत खाली आली. रवि आणि मालक तिथे बोलत उभे होते. प्रिया त्यांच्याकडे गेली.
" भाई ... रवि ... इथे थांबण फार धोक्याचं आहे. आपल्याला इथून निघायला हवं. ती माया आपल्याला मारून टाकेल " प्रिया बोलत होती. तिने त्यांच्याकडे पाहिलं अन् दोन पावलं मागे झाली.
त्या दोघांनी दोन्ही बाजूंनी प्रियाला पकडलं आणि " ति "च्या समोर उभ केलं.
हो तिच माया... प्रियाने दोघांकडे पाहिलं आणि आजूबाजूला पाहिल. सर्व बायका एका बाजूला बेशुद्ध पडल्या होत्या. चार मूली एका बाजूला पडल्या होत्या त्यात सोनाही होती.
माया केस सोडून बसली होती. तिच्या समोर हवनकुंड होता. त्याच्या समोर एक विचित्र आक्राळ विक्राळ पण भयानक मूर्ती उभी होती. त्या मूर्ती च्या आजूबाजूला हाडं , कवठ्या , लिंबू, रक्ताने भरलेलं भांड, मांस आणि बरच काही ठेवलं होतं. मायाच्या डाव्या बाजूला एक भलामोठ्ठा दगड आणि तलवार ठेवली होती.
मायाने चुटकी वाजवली तसे रवि व मालक जागच्या जागी बेशुद्ध पडले. माया अजूनही बसलेली होती. हळूहळू ती जमिनीपासून वर वर उचलली गेली. प्रिया तिला पाहून मागे मागे गेली पण मागे भिंत असल्यामूळे ती भिंतीला आपटली. प्रियाची नजर मात्र मायावरच होती.
माया ऐव्हाना चांगली चार - पाच फूट उंच तरंगत होती. तिचे केस मात्र अजूनही जमिनीवर लोळत होते. ती प्रियाला अगदी पायापासून डोक्यापर्यंत न्याहाळत होती.
" असं काय आहे ग तुझ्यात ? तू माझ्या कामात व्यत्यय आणतेस." म्हणत ती पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसली. थोडा वेळ डोळे बंद करून काही मंत्र पुटपुटले. हातात बाजूची भुकटी घेतली तोंडाजवळ नेली त्यावर फुंकर घातली आणि त्या मूर्तीकडे पाहून हवनमध्ये घातली. त्या क्षणी एक मोठ्ठा आवाज झाला. प्रियाने आपले डोळे गच्च मिटून घेतले आणि दोन्ही हात कानावर ठेवले.
प्रियाला विचित्र हसण्याचा आवाज आला. तिने डोळे उघडले. ती माया मोठमोठ्याने हसत होती....?
क्रमशः
( ती का हसत होती ? तिला अस काय कळलं की ती एवढी खुश झाली ? हे जाणून घेण्यासाठी लवकरच पुढील पार्ट पोस्ट करेन. तुमचं मत मला फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे कृपया कथा फक्त वाचू नका. त्यावर तुमचे विचार काय आहेत हे कळवा. त्यामुळे मला लिहायला प्रोत्साहन मिळते. धन्यवाद??.)
( ती का हसत होती ? तिला अस काय कळलं की ती एवढी खुश झाली ? हे जाणून घेण्यासाठी लवकरच पुढील पार्ट पोस्ट करेन. तुमचं मत मला फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे कृपया कथा फक्त वाचू नका. त्यावर तुमचे विचार काय आहेत हे कळवा. त्यामुळे मला लिहायला प्रोत्साहन मिळते. धन्यवाद??.)
ज्योती पिरणकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा