#पुरुषोत्तम शिवराम रेगे जन्म - २ आँगस्ट १९१० रत्नागिरी जिल्हा ,मिठबांव साहित्य क्षेत्र- कवी , नाटककर,समिक्षक ,संपादक
साहित्य संग्रह - फुलोरा ,दोला, गंधरेखा,दुसरा पक्षी, आणि प्रियाळ हे कविता संग्रह
रुप कथ्थक आणि मानवा ह्या फ्रेंच,स्विडीश,जर्मन,चिनी , गुजराथी या भाषांत रुपांतरीत ,भाषांतरीत कथा..
अवलोकिता ,रेणु ,सावित्री आणि मातृका या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत..
\"छांदसी \" हा समिक्षा लेखांचा संग्रह सुधारीत आवृत्तीत १९६८ साली पुनः प्रकाशित झाला.

पु .शि. रेगे यांच शिक्षण मुंबई आणि लंडन येथे झालं. बी. ए. ची पदवी लंडन मधून घेतली तद्पश्श्चात बी .एस्स .सी ची पदवी ही \"स्कूल ऑफ इकोनॉमिक्स\" लंडन मधुनच घेतली. अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून वेगवेगळ्या विद्यालयांत काम पाहीले. एलफिंस्टन कॉलेज मुंबई महाविद्यालयातूंन प्राचार्य म्हणून निवृत्ती..
सत्कर्माची बाधा होऊ शकते असं कोणी म्हणालं तर..? मान्य होईलही कदाचित विवेकशुन्यता ही त्यात नसावी पण आजुबाजुच्या घडणाऱ्या घटना व्यावहारीक आणि वास्तविकतेत न मापता न तोलता तो जो कुणी आहे विधाता तो पाहून घेईल ही तटस्थता येणं.. निर्मोही ,निःस्वार्थी होणं..
मोक्ष प्राप्ती ही व्यक्ती सापेक्ष संकल्पना माझं कर्म ,माझा धर्म ,माझे संस्कार ती मला मिळवून देण्याची सिद्धता करतात..
पण एखाद्याची भक्ती कालातीत,देहातीत,अमर्यादच असेल तर..? श्रुती आणि स्मृती यांच्या भेदा पलीकडे जाणं.. जिथे आदि अंताचा मागमूसही नसावा.. माझी भक्ती, माझी श्रद्धा ही अथांग असावी ..माझं प्रेम ही समर्पण ही..
राधा ,मीरा ,वृंदा या श्रीकृष्ण रुपी साक्षात्काराला समर्पित होत्या.. त्यांच्या भक्ती रुपातल्या साधनांची तुलना ही ऐहिक आणि दैहिक पातळींवर जोखत असाल तर ती मोठी चूक होईल.. युगानुयुगांची प्रतिक्षा त्या साठी केलेले खडतर प्रवास ,पराकाष्ठा या आपल्या समजुती पलीकडच्या आहेत.. द्वैताशी एकरुप होणं ते ही आत्मबंधातलं ..पंचतत्वातलं समारुप होणं ईतरांना साध्य होणं केवळ अशक्य आहे..
पु.शि.रेगे यांना स्त्री चं अनुपम सौंदर्य फक्त बाह्य रुपावरच मोहीत करत नाही तर सृजनाचं उत्कट रुप ते तीच्यात पहातात.. गर्भ रेशमी सळसळणारी तिची गौरांग काया निसर्गातला ऋतु गर्भातला साक्षी भाव होतो..नवचैतन्य नवसंजीवन देणारी अबोध ,काहीशी अनाघ्रात असणारी ती प्रेमाच्या उंबरठ्यावर अवगुंठून उभी आहे..
राधा.. या प्रतिकात्मक रुपात..
राधा कृष्ण .. भक्ती पेक्षा ही प्रीती या सज्ञेशी एकरुप झालेलं..
राधेचं प्रेम हे उत्कट ,अधीर,समर्पित असावं .. प्रेमभावना ,शृंगार , प्रतिक्षा,वियोग,विरह जे आहे ते या सावळ बाधेतल्या श्री कृष्णा पाशी .. राधा ही चिंरतन अभिसारीका,प्रणयिनी आहे..कृष्ण सखा ही आहे ,प्रियकर ही.. त्याच्या सहवासातला प्रत्येक क्षण गंधाळलेला असावा ,देहचंदनी असावा..दरवळत रहाणारा युगानुयुगं..इथे भावनांची पराकाष्ठा उद्भवतीतलीच.. त्याच्या आस्तित्वात विरघळून जाणं ही ..परमावधी..
काहीशी अल्लड,नवथरतेची पालवी घेऊन आलेली प्रियतमा..तीचं तेही रुप लोभसवाणं कृष्ण सख्याला भुलवणारं..

\"गंधरेखा\" या काव्य संग्रहातून घेतलेली \"त्रिधा राधा\"ही कविता .. राधा तीन वेगवेगळ्या रूपांत भेटते रेगेंना.. शब्द छंदांचे कवडसे भावनांच्या त्रिमितीत परावर्तित करतात ते..राधाकृष्ण ही सदेहात असतील की नाही ज्ञात नाही पण उद्वेगांचे ,त्यांच्या वियोग, मिलनाची फलश्रुती फक्त आत्मसंहीतेतलीच असावी..ती फक्त राधेलाच जाणवु शकते..तीथं इतरांचा वावर निषिद्ध..
पहील्या प्रतिमेत ती प्रिय सख्याला भेटते ती ही प्रेमानुभावाला काहीशी अनभिज्ञ असणारी..बावरलेली ,तरीही धीट..
रतिरंगाची बाधा झालेली तरीही संयमित तीचं हे बावरलेपण शोषून घेणारा तो सखा तिच्या सौंदर्यावर भाळलेला ..मंत्र मुग्ध झालेला.
युगानुयुगाची बावरी बाधा जिच्या रुपात तो अनुभवतोय..
तो सावळा घननीळ आभाळाच्या रुपांत आणि राधा ही चांदणीच्या रुपांत बावरलेली युगायुगांची..जाणवतीय त्यांना . इथे तीचं आणि कृष्णाच अस्तित्व काल मर्यादे पलीकडचच..त्यांची प्रेमातुरता ही निःसंशय कालाबाधित..

दुसऱ्या प्रतिमेत राधा ही संसिद्ध थोडी आणखी धीट झालेली अनभिज्ञ असण्याची पायरी ओलांडलेली..प्रेमातला रतीभाव सहजतेनं घेणारी तिथल्या साशंकता मागे ठेवून त्या प्रेम डोहात उतरणारी सच्छैल होणारी..
तू पण असली नवी नवेली
गात्रे गात्रे रक्त पालवी
फुलाफुलांवर तुझीच कांती
कोमल खुलली
तू पण असली नवी नवेली
गात्रे गात्रे रक्त पालवी
फुलाफुलांवर तुझीच कांती
कोमल खुलली
ती आपल्या भावउर्मींशी प्रामाणिक आहे..आरपार आहे..नितळ आणि निरागस ही आहे.. प्रेम ही झोकून करणारी आहे..स्वतःच्या मनाचा कौल हा तीनं दिलेला आहे..संसिद्ध (स्वच्छंद )असली तरी ठाम आहे..
तिसऱ्या प्रतिमेत तीचं विरघळून जाणं स्वतःचं अस्तित्वच विसरणं..विप्रश्न
युगानुयुगाची प्रतिक्षा संपणं ..चिर तंद्रा अभोगी पणातही भावसमाधी.. प्रेम साफल्याचा एक अमृतानुभव..मग मृगतृष्णाही नाही काहीच नाही.. द्वैताशी एकरुप होणं..तादात्म्य पावणं.. दोनाच एक होणं ती एकभानता ,एकरुपता अनुभवणं..
कृष्णरुप सानिध्यातल अनुभवलेपण. फक्त तो दुरावलेपणाही अंतराय निर्माण न करणारा भेटीची ग्वाही आश्वासन देणारा..तो कृष्णसखा निश्चल जलवाहीनी आहे ..नदीकाठावर असणाऱ्या राधेला फक्त जाणवतोय ती तृप्त आहे.... चिर तंद्रा आहे..

त्रिधा -राधा
आकाश निळे तो हरि
आणि एक चांदणी राधा
बावरी
युगानुयुगिची मन - बाधा
आणि एक चांदणी राधा
बावरी
युगानुयुगिची मन - बाधा
विस्तिर्ण भुई गोविंद
अन् क्षेत्र साळिचे राधा
स्वच्छन्द
युगानुयुगिची प्रियवंदा
जलवाहिनी निश्चल कृष्ण
बन झुकले काठी राधा
विप्रश्न
विप्रश्न
युगानुयुगिची-चिरतंद्रा
©लीना राजीव.
©लीना राजीव.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा