तेरा साथ हो तो भाग२

कथामालिका


भाग/२

दिनकरराव अचानक काय बोलणार पाहुया....

दिनकररावांचा हा पवित्रा बघून समीर शांत झाला. समीर मी जी चूक केली ती चूक तू करू नकोस.‌

"म्हणजे बाबा."
अहो, तुम्ही आता या विषयावर ...

"नको सरला आज मला बोलू दे. माझ्या मनातील खंत व्यक्त करू दे मला. नाही तर स्फोट होईल एखादं दिवशी."

"समीर, तुझी आई साॅफ्टवेअर इंजिनिअर.‌ तिच्या आयुष्य घडण्याआधीच मी बिघडवले. तिने मोठ्या आशेने माझ्या घरात पाऊल ठेवले. घरात आई , बाबा आजी. सगळ्यांच्या मनात ती एक चांगली सून म्हणून झाली. पण, तिला काय पाहिजे, तिला काय हवं, तिच्या काही अपेक्षा आहेत. याचा मला विसर पडला.
लग्नानंतर लगेचच तिला नोकरी मिळाली. मला तिने ही गोष्ट खूपदा सांगण्याचा प्रयत्न केला. पण, प्रत्येक वेळी मी तिला सध्या नको‌. सहा महिने तरी होऊ दे. तू या घरात रुळ. तुझ्या सवय होऊ दे सगळ्यांना.पुढे बघू."

"अगं, अख्खं आयुष्य पडलं आहे ना त्यासाठी. मग थोडा वेळ घे."

मग संसार आणि नात्यांचा रंगलेला खेळ यात ती इतकी दंग झाली. की तिला नोकरीसाठी वेळच मिळाला नाही."

"असं करता करता एक दीड वर्ष निघून गेले. तिला नोकरी करायला नाही मिळाली. नंतर तुझ्या येण्याची वर्दी मिळाली. मग तिला उसंतच नाही. ती नोकरी करू शकली नाही. तुझ्या आगमनानंतर तुझ्यासाठी तिला वेळ अपुरा पडत गेला. मग तू तीन वर्षांचा होता. तेवहा परत तिला नोकरीची एक संधी मिळाली. पण, घरच्या जबाबदाऱ्या पार पाडत असतांना आपल्या घरात सोनपरीचे आगमन झाले. मग परत फिरली."

"समोर खूप रस्ते होते. पण, निर्णय मात्र आमचा होता.
अपेक्षा तिच्याही होत्या. पण, आमच्या अवास्तव अपेक्षा होत्या. जबाबदाऱ्या आम्हांलाही होत्या. पण, प्रत्येक जबाबदारीचे ओझे तिच्यावर टाकून आम्ही मोकळे झालो. तिला काय हवं हे मात्र आम्हांला कळले नाही. पण, आम्हांला मात्र काय हवं नको ते बघायची.
संसाराचा हा विळखा इतका घट्ट झाला. की तिला कोणी विचारलेच नाही. की तुला काय करायचं का?"

नोकरी नाही तर तू इतर काही काम करू शकते. याची कधी कोणाला गरजच वाटली नाही.

"अरे, आम्ही सात आठ जण घरात. सहज तुला आणि आपल्या परीला सांभाळू शकलो असतो. पण, तिला आईचे प्रेम मिळणार नाही. पोरं आईच्या प्रेमाच्या छायेत ,संस्कारांत वाढतात, मोठे होतात. ही गोष्ट तिच्या मनाला पटतच नव्हती. पण, कोणी कधी असा विचारच केला नाही."

"शेवटी तुम्ही दोघे मोठे होत गेलात. तुमच्या बालवाडीपासून ते तुमचं शिक्षण होईपर्यंत प्रत्येक लहानसहान गोष्टीत तिने लक्ष घातले. मग नोकरी करायची राहूनच गेली. मुलं नोकरीला लागले . लग्न झालीत. तरीसुद्धा नोकरी करायची राहूनच गेली. तोपर्यंत ती अशा जगातच वावरली की ती त्या कोषातून बाहेर पडलीच नाही. "

"अहो, बस करा आता. नका बोलू. मी खरोखरच ओळखले नाही तुम्हांला. मला माफ करा. "

नाही, माफी तर मी मागायला हवी. मी फक्त तुला गृहीत धरत गेलो गं. त्यामुळे कधी कळलेच नाही."

"ठीक आहे बाबा. पण, तरीही मला सुद्धा आत्ता कविताने ही परीक्षा द्यावी हे मान्य नाही."

हे ऐकताच कविता खोलीत निघून गेली.

समीर त्याच्या निर्णयावर ठाम होता की नाही. पाहुया पुढच्या भागात...

©® आश्विनी मिश्रीकोटकर





🎭 Series Post

View all