आणि लगेच त्यांनी आपला मेल चेक केला.
"ओह माय गॉड, हे काय मला ही मेल आलाय पण नेमका प्रॉब्लेम काय झालाय मला सरांशी याबद्दल बोलाव लागेल विचारपूस तर करतो." मेल चेक करत रघुनाथ जी मनाशीच बोलले.
काही क्षणा नंतर...
एक निर्णय घेऊन रघुनाथजींनी अनिरुद्ध जींना कॉल लावला.
एक सुंदर रिंगटोन वाजली...
"हॅलो, कोण बोलतय?" अनिरुद्ध जींनी विचारलं.
"सर आवाज नाही ओळखलात का? मी बोलतोय रघुनाथ" रघुनाथ जींनी सांगितलं.
"बाळा आता कुठे इतक लक्षात राहात माझ्या माझ वय झालय आता." अनिरुद्ध जी म्हणाले
"सर कोणे एके काळी मी तुमचा मॅनेजर होतो रघुनाथ" रघुनाथ जी म्हणाले
"अच्छा अच्छा आता ओळखलं बोल बोल" अनिरुद्ध जी म्हणाले
"सर अहो आम्हाला आपल्या गुरुकुल बद्दल का असे विचित्र मेल्स येत आहेत काही घडलय का?" काळजीच्या स्वरात रघुनाथ जींनी विचारलं
"काय? (मनात विचार करत "याला कस काय कळल") अस काही नाही का रे. आणि इतक्या वर्षांनी तुला या म्हाताऱ्याची आठवण आली का?" अनिरुद्ध जींनी विचारलं
"अहो सर, तुम्ही गुरु आहात आमचे मला तर तुम्ही संगीताचे धडे दिलेच आहेत त्याच बरोबर जेव्हा मला खूप नोकरीची गरज होती तेव्हा तर तुम्ही मला तुमचा पर्सनल मॅनेजर करून घेतलत त्यावेळेस तुम्ही मला मदत नसती केलीत तर मी माझ्या घराचा भार कधीच पेलू शकलो नसतो. तुमची तर आठवण माझ्या हृदयात कायम अशीच राहणार आहे" रघुनाथ जी म्हणाले
"आभारी आहे, पण काळजी करू नको काही घडल नाहीये हं" अनिरुद्ध जी समाजावत म्हणाले
"खरच न काही काळजी करण्यासारखं नाहीये न" रघुनाथ जींनी काळजीने विचारलं
"नाही रे खरच नाही" परत एकदा अनिरुद्ध म्हणाले
"ठिक आहे काळजी घ्या आता मी फोन ठेवतो बाय" रघुनाथ जींनी समजावत सांगितलं
"ठीक आहे तुही काळजी घे आणि वरचे वर फोन करत जा रे म्हातारा झालोय मी आता बर वाटत आपल्या माणसाचा फोन आला की." अनिरुद्ध जी म्हणाले.
"हो नक्कीच ठेवतो आता फोन" रघुनाथ जी म्हणाले
आणि लगेच दोघांनी फोन ठेऊन दिला.
"हे कस शक्य आहे? आणि गुरुकुलात सगळ ठीक आहे तर आम्हाला असा मेल का आला असेल आणि कुणी पाठवला असेल छे काहीच कळत नाहीये." रघुनाथ जी विचार करू लागले.
तोच पारत वसुंधरा चा कॉल आला.
एक सुंदर म्युझिक वाजलं...
आणि रघुनाथ जींनी कॉल उचलला...
"हॅलो ह बोल अग मी आत्ता तुला कॉल करणारच होतो." रघुनाथ जी म्हणाले.
"काय झाल सर? काही समजल का तुमचं काही बोलण झाल का सरांशी?" वसुंधरा ने विचारल.
"हो, झाल बोलण माझ मी जस्ट कॉल केला होता सरांना तस म्हणलं तर सगळ ओके आहे आणि म्हणलं तर नाही. म्हणजे मला जरा शंका वाटत आहे अग पहिल्यांदा मला सरांच्या बोलण्यावर विश्वास बसत नाहीये काय कराव तेच कळत नाही." रघुनाथ जी म्हणाले
"हो का ठीक आहे बघुयात आपण काय करता येईल ते ह काळजी करू नका" वसुंधरा म्हणाली.
"ठीक आहे तु ही काळजी घे आणि काही वाटलं तर फोन कर मला" रघुनाथ जी म्हणाले.
व दोघांनी आपापले फोन ठेऊन दिले.
"गुरुकुलात काही प्रॉब्लेम नाही तर आम्हाला असा मेल कुणी पाठवला असेल." वसुंधरा विचारात पडली.
"असा मेल आम्हाला आलाय म्हणजे तिला ही आला असेल म्हणजे कदाचित आमची भेट परत एकदा होईल का? खूप काळ लोटला आहे मध्ये ती ओळखेल का मला?" स्वराज ही मनात विचार करू लागला
15 मिनिटा नंतर...
वसुंधरा भानावर आली तोच तिने स्वराजला विचारात पडलेलं बघितल आणि त्याला भानावर आणू लागली.
"स्वराज.. ए स्वराज काय झालय ठीक आहेस ना तु?" स्वराजला हलवत वसुंधरा भानावर आणू लागली.
"अं.. काय झाल?" भानावर येत स्वराजने विचारलं
"तेच मी विचारलं तुला काय झाल एकदम असा कुठे गुंगून गेला होतास?" वसुंधरा ने काळजीने विचारलं.
"काही नाही ग असच बर ते जाऊ दे तु रघुनाथ सरांना फोन केला होतास न काय झाल त्याच." स्वराजने विचारलं
"हो अरे मी फोन तर केला होता पण काही खास हाती नाही लागलं त्यांनी आपल्या सरांना ही फोन केला होता पण ते म्हणाले सगळ ठीक आहे." वसुंधरा म्हणाली
"काय? मग तो मेल कुणी पाठवलाय आपल्याला नाही वसू मला वाटतय काही तरी नक्कीच भानगड आहे कुठ तरी नक्कीच पाणी मुरतय आपण तपास लावायला हवा याचा." स्वराज म्हणाला
"हे तु म्हणतोएस? स्वराज तुला माहिती आहे न इथे बसून तु तपास लावू शकणार नाहीस यासाठी तुला बाहेर पडावं लागेल. इतक्या वर्षानंतर तु हे करू शकणार आहेस?" वसुंधरा ने काळजीने विचारलं
"हो मी करू शकेन आणि किती दिवस मी अस कुढत बसणार आहे मला वाटतय आता वेळ आली आहे स्वतःतल्या खऱ्या स्वराजला जाग करण्याची मी नक्कीच शोधून काढेन ही काय भानगड आहे आणि ह्या हॅशटॅगच काय रहस्य आहे हे ही शोधेन तु बघच." निश्चयाच्या स्वरात स्वराज म्हणाला
"ठीक आहे मग मी पण तुझ्या बरोबर आहे आपण मिळून याचा शोध घेवूत तु या निमित्ताने बाहेर पडतोएस हेच काय कमी आहे का यातच मला आनंद आहे तु पुन्हा सुरवात करत आहेस आणि यात मी तुझ्या बरोबर आहे." आनंदाने वसुंधरा म्हणाली
पण रागिणी च काय? तिला ही मेल आलेला असतो. पण रागिणी कुठे असते काय करत असते इतक्या वर्षात रागिणीची ही तशीच अवस्था असते का? नेमक दोघांचं वेगळ होण्याचं काय कारण असत.
भूतकाळात...
"तु नुसतच शब्दाला शब्द वाढवत आहेस रागिणी. मी तुला सांगितलं न आपण आता एकत्र नाही राहू शकत तुला संधी मिळाली आहे तर तु तुझ संगीताच करिअर सुरु ठेव आणि खूप पुढे जा पण आता आपण एकत्र नाही राहू शकत आणि याच कारण ही मला नको विचारूस प्लिज." स्वराज अगदी अगतिक होऊन सांगतो.
"स्वराज? हे तु बोलतोएस अरे माझ्या वाचून तुझ एक पान हलत न्हवत कधी काळी प्रत्येक क्षणी तुला मी लागायचे आणि आता म्हणत आहेस आपण एकत्र राहू शकत नाही? प्रेम केल होत न रे आपण एकमेकांवर आयुष्यभर साथ देण्याच एकमेकांना वचन दिली होती न काय झाल त्याच? विसरलास एका क्षणात तु? मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती स्वराज" रागिणी रडवेली होऊन म्हणाली
"हे बघ रागिणी आता जे आहे ते अस आहे तुला जो विचार करायचा आहे तो तु करू शकतेस पण माझा निर्णय पक्का आहे आपण एकत्र राहू शकत नाही." ठामपणे स्वराज म्हणाला
"ठीक आहे मग तुझी हीच इच्छा असेल तर मी आता काहीच बोलणार नाही आता तु मला आवाज जरी दिलास तरी मी तुझ्या कडे परत येणार नाही येते मी." आपले डोळे पुसत रागिणी म्हणाली.
आणि तिथून निघून गेली परत कधी ही न येण्या साठी..
क्रमशः...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा