शो संपतो आणि एका हॉटेलच्या रूम मधून 'तो' तो म्हणजे स्वराज कुलकर्णी शो बघत असतो तोच त्याच्या मेल आई डी वर एक अननोन मेल येतो ज्यात लिहिलेलं असत.
"गुरुकुल धोक्यात आहे तुला जर नव्याने सुरवात करायची असेल तर गुरुकुलात परत ये."
आणि दुसरीकडे रागिणीला ही असाच एक मेल येतो.
"जर स्वराज ला भेटायचं असेल तर गुरुकुलात परत ये."
दोघ ही आपापले मेल चेक करतात आणि अवाक होऊन जातात.
हॉटेल ब्लूशाईन..
रूम नं 4...
स्वराज रूम मध्ये एकटाच असतो. विचारमग्न खिडकीत उभा राहून जुन्या आठवणींना उजाळा देत.
भूतकाळात...
स्वरसाक्षी संगीत विद्यालय...
ते दोघ 'स्वरसाक्षी' चे पहिले विद्यार्थी होते.
"आई मी नाही जाणार मला नाही शिकायचं आहे तुझ्या बरोबरच राहायचं आहे. प्लिज बोल नं ग बाबाला." रडवेला चेहरा करून रागिणी म्हणाली.
"अस नसतं बोलायचं बेटा हे तुझ्या चांगल्यासाठी सुरु आहे ना एकदा तु मोठी गायिका झालीस की तुला लोक ओळखतील मग आम्हाला किती छान वाटेल बर." सुप्रिया म्हणाली.
तोच स्वराज थोड दूर उभ राहून हसू लागला.
"ए, वेड्या हसतोस काय मला?" रागिणी चिडून बोलली.
"हॅट, मी तुला थोडी हसलो आणि तुला एवढी कशी भीती वाटते? मला तर भीती नाही वाटत." लगेच स्वराज म्हणाला
आणि पाच सात वर्षाचे दोघ त्यांची तिथेच भांडण सुरु झाली आणि ती त्यांची पहिली भेट सुद्धा ठरली.
"अरे अरे अस भांडू नका रे का भांडताय इतकं." संगीताचार्य अनिरुद्ध जींनी विचारलं.
"हा वेडा मला हसला." रागिणी ने तक्रारी च्या स्वरात सांगितलं
"ए मी तुला कुठे हसलो? खोटं नको बोलू हं." लगेच चिडून स्वराज म्हणाला
तोच अनिरुद्ध जी हसू लागले त्यांच ते वागण त्यांना खूप आवडलं. आणि त्यांना लगेच समजलं ही जोडी हिट होणार.
"पोरांनो, तुम्ही दोघ इथे का आला आहात हे तुम्हाला माहित आहे का?" अनिरुद्ध जींनी विचारलं
"हो, मला माहित आहे गाणं शिकायला. पण मला नाही आवडत गाणं मला डान्स आवडतो करायला." रागिणीने सांगितलं.
"अरेच्चा, हो का पण तुला हे माहित आहे का नाचण्यासाठी आपल्याला संगीताची माहिती असावी लागते." अनिरुद्ध जी म्हणाले
"हो, मग मी नक्की शिकणार आवडेल मला शिकायला." रागिणी म्हणाली
"व्हेरी गुड, मला तुझ्याकडून हेच उत्तर हवं होत." आनंदून अनिरुद्ध जी म्हणाले.
आणि अशा पद्धतीने त्यांचा क्लास सुरु झाला.
संगीताचार्य अनिरुद्ध बेलसरे यांची संगीत जगतात खूप ख्याती होती. त्यांनी आज पर्यंत अनेक मैफिली गाजवल्या होत्या ते जेव्हा रियाज करत तेव्हा तास न तास आपल्या रियाजाला वाहून घेत. त्यांच एक स्वप्न होत संगीत क्षेत्रात आपल्या सारखेच दिग्गज गायक घडवायचे आपलं सर्व ज्ञान त्यांना द्यायचं आणि याच स्वप्नासाठी त्यांनी स्वरसाक्षी संगीत विद्यालयाची सुरवात केली होती आणि त्यांचे पहिले विद्यार्थी बनले स्वराज आणि रागिणी.
स्वराज आणि रागिणीचा संगीत प्रवास सुरु झाला. आणि हळू हळू त्या प्रवासाला एका अतूट मैत्रीची साथ मिळू लागली.
एक दिवस स्वराज जरा उदास होता तोच रागिणीच त्याच्याकडे लक्ष गेलं.
"तु रडतोएस? फ्रेंड्स?" मैत्रीचा हाथ पुढे करत रागिणी म्हणाली
"पण तु तर भांडतेस न माझ्याशी फ्रेंड्स कधी भांडत नसतात. मला नाही करायची तुझ्याशी मैत्री." मान दुसरीकडे वळवून स्वराज बोलला.
"ठिक आहे आता मी तुझ्याशी नाही भांडणार मग तर मैत्री करशील माझ्याशी." कान पकडत रागिणी म्हणाली
अशीच होती ती कुणाला ही लळा लावणारी रागिणी.
रागिणीला डान्स च बाळकडू घरातूनच मिळालं होत आईचा डान्स चा वारसा ती लहानगी रागिणी अगदी उत्तम रित्या सांभाळत होती वेळेवर उठून नृत्यचा सराव करणे मग जरा आईला घरात मदत करणे आणि नंतर अभ्यास करणे हाच तिचा दिनक्रम होता तर स्वराजला बाळकडू मिळालं होत संगीताच उत्तम आवाज थोडा मस्तीखोर सुद्धा असलेला स्वराज जेव्हा गायचा तेव्हा लोक त्याच्या आवाजाने मंत्र मुग्ध होऊन जातं. आणि म्हणून स्वराजला स्वरसाक्षी संगीत विद्यालयात दाखल केल होत.
दोघांचा प्रवास सुरु झाला. आणि दोघ ही एकाच छता खाली संगीताचे धडे गिरवू लागले.
20 वर्षा नंतर...
स्वरसाक्षी संगीत विद्यालयाचा संगीत समारोह...
तब्बल वीस वर्ष उलटून गेली होती दोघांच्या कोवळ्या मैत्रीला आणि आता दोघांनी आपल्या तरुण वयात पदार्पण केले होते. इतक्या वर्षात जेजे शिकले होते आज त्याला आजमावून बघण्याचा दिवस होता.
आणि आता दोघ ही पट्टीचे गायक आपला सुरु लावायला तयार होती.
काही वेळातच समारोह सुरु झाला.
"नमस्कार, आजच्या स्वरसाक्षी संगीत विद्यालया तर्फे घेण्यात येणाऱ्या संगीत समारोहात सर्वांचे हार्दिक स्वागत. रसिक हो संगीत हे मनाला प्रफुल्लित करणार शस्त्र असत. संगीत मनाला आनंद देत संगीत प्रेरित करत हीच तर खरी गंम्मत आहे संगीताची मनाला स्पर्शून जाणार संगीत याच सांगितने उपचार देखील केले जातात अजून काय सांगावी महती या संगीत विश्वा ची आज याचा समारोह आणि आता याच समारोहाला आपण सुरवात करत आहोत पण तत्पूर्वी मी आपल्याला लाभलेले आजचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध संगीतकार विनयबुवा जोशी, पंडित योगेंद्र नाथ जी आणि सुप्रसिद्ध गायिका रत्नमाला यांचे परिचय करून देऊ इच्छिते.
संगीतकार विनयबुआ जोशी हे एक प्रसिद्ध सांगीतकार असून त्यांनी आजपर्यंत 300 हुन अधिक गीतांना संगीत दिलय आणि त्यांची सगळी गाणी आजही आजरामर झाली आहेत. पंडित योगेंद्र नाथ जीं बद्दल सांगायचं झाल तर योगेंद्र नाथ जीं ना संगीत कलेचा वारसा आपल्या वडिलांकडून मिळाला आहे. पंडीत जीं चे वडील हे सुप्रसिद्ध गायक गुरुनाथ जी असून गुरुनाथ जीच योगेंद्र नाथ जीं चे पहिले गुरु ही होत. आज योगेंद्र नाथ जी ज्या प्रसिद्धी ला बघत आहे ते आपल्या वडिलां मुळे आहे अस यांचं म्हणणं आहे. सुप्रसिद्ध गायिका रत्नमाला अपेगावकर या एक प्रसिद्ध गायक असून यांना ही संगीताच बाळकडू त्यांच्या घरातूनच मिळालं आहे रत्नमाला जींची आई एक प्रसिद्ध गायिका होत्या त्यांची गाणी आजही लहान मुलांच्या ही तोंडून आपण नेहमीच ऐकतो लहानपणापासूनच तीच संगीताची आवड रत्नमाला जींना ही लागली आणि त्यांचा संगीताचा प्रवास सुरु झाला. आज रत्नमाला जींची देखील 200 हुन अधिक गाणी आपल्याला ऐकायला मिळतात आपले भाग्य आहे आजच्या समारोहला आपल्याला असे दिग्गज पाहुणे लाभले आहेत. मी तिन्ही पाहुण्यांना स्थानापन्न होण्याची विनंती करते व आमचे सर संगीताचार्य अनिरुद्ध जींना विनंती करते त्यांनी पाहुण्यांच स्वागत कराव आणि दोन शब्द बोलावेत." प्रसिद्ध निवेदक गायत्री दातार

लगेच अनिरुद्ध जी स्टेजवर आले. तर विद्यार्थी पुष्पहार घेऊन आले स्वागतासाठी.
क्रमशः...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा