Login

अज्ञात जागेचे प्रवासी. भाग - २

दोन वैमानिक ज्यांनी अनेक वेळा विमानातून सर्व प्रवाशांना सुखरूपपणे पोहचविले. एक दिवस अचानक त्याच्या समोर एक अशा अज्ञात जगाच्या दुनियेत त्यांचा प्रवेश झाला तो ही अपघाताने ज्यात फक्त ते आणि त्यांचे सहकारी पोहचले. कोणती असेल ती दुनिया आणि कसे सुटतील त्यातून? यासाठी कथा नक्की वाचा.
शार्दूल ने सर्व इंजिन पॅरामीटिर्स सामान्य स्थितीत ऑपरेटिंग रेंज मध्ये असल्याचे चेक केले. एपीयू त्याने बंद केले. हायड्रॉलिक्स, न्यूमेटिक्स आणि एव्हियोनिक्स या विमान प्रणालीचे ऑपरेशन सत्यापित करून सिस्टीम तपासणी केली. विमान आकाशात स्थिरावले. काहीसे रिलॅक्स दोघे झाले.

शार्दूल ने सोबत आणलेली दोन सॅण्डविच ची पाकीटे काढली. ऑटो पायलट मोड वर टाकून त्या दोघांनी सॅण्डविच संपवली.

"हे बघ तुमचा असा नजरानजर चा खेळ मला तर कंटाळवाणा वाटतो आहे आणि खतरनाक ही. या नादात एक दिवस लॅण्डिग करताना अथवा टेक ऑफ च्यावेळी अपघात घडवून आणायचा तु" मिश्कीलपणे शार्दूल म्हणाला.

यावर अभय ने त्याला रागात पाहिले.

"अरे भावा, मी तिला विचारले तरी तिचे उत्तर मला माहित आहे. पण तिला पाहण्यापासून मी थांबवू शकत नाही."

यावर काही न बोलता शार्दूल ने ऑटो पायलट मोड ऑफ केला.

एकाएकी त्यांना जाणवल की विमानाला कसला तरी धक्का बसला आणि विमानांची बाजू कलंडली.‌ हा धक्का कसला बसला बाहेर तर वातावरण स्वच्छ आणि ठीकठाक होते.

"विमानाला जास्त नुकसान नाही ना पोहचले?" शार्दूल म्हणाला.

अभयने लगेच सर्व सिस्टीम ची तपासणी केली आणि म्हणाला, "नाही सर्व काही व्यवस्थित आहे."

अचानक परत धक्का बसला आणि रेड अलर्ट चा बीम बीम असा धोक्याची सूचना देणारा आवाज ऐकू येऊ लागला. ते ऐकून दोघेही चकित झाले.‌ अचानक विमानातील दोघाचे सीट पुढे ढकलले गेल्याने ते जोराने काचेवर आपटले. काच मजबूत असल्याने दैव बलवत्तर म्हणून दोघे विमानाच्या खिडकीच्या बाहेर फेकले गेले नाही. इतका वेळ सर्व काही सुरळीत असताना हे काय घडत आहे दोघांना कळेना. विमानातील स्पीडचे दाखवणारे काटे उलट्या दिशेने फिरू लागले. विमानांची गती कमी होऊ लागली आणि विमानाची खालची बाजू वर उचलली गेली आणि विमान सरळ खाली खाली गतीने जाऊ लागले. त्याचा वेग मंद होता पण ते समान दिशेने खाली खाली जात होते. अभय आणि शार्दूल ने विमान कंट्रोल करण्याचे खूप प्रयत्न केले पण सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. अभयने ऑटो पायलट मोड ऑन केला आणि सर्व सिस्टीम तपासायला सुरुवात केली कुठे काही फॉल्ट झाला आहे का किंवा काही यंत्रणेत बिघाड झाला आहे का हे बघायला सुरुवात केली पण त्याला कुठे च काही गडबड किंवा यंत्रणेत बिघाड झाला आहे हे कळत नव्हते. सर्व काही सुरळीत असताना विमानात हा बिघाड झाला कुठून?

शार्दूल ची नजर अचानक स्पीड च्या काट्यावर गेली शून्य गतीने जमिनीच्या दिशेने जाणारे विमानाच्या स्पीडची वेग अचानक वाढला. भरभर सरकरणारे काटे पाहून त्यांच्या कपाळावर घाम फुटला. घसा कोरडा पडला.

"अ...भ...य तो कसाबसा म्हणाला."

हे सर्व काय चाललंय हे न कळल्याने वैतागलेला, संभ्रमित झालेला अभयचे लक्ष शार्दूल च्या बोलण्याकडे गेलेच नाही.

शार्दूल ने थरथरत्या हाताने अभयने चा शर्ट खेचला.

"काय आहे शार्दूल?" तो जोरात खेकसत म्हणाला.

शार्दूल ने बोट दाखवले स्पीड मीटर कडे. अभयचे लक्ष त्याकडे जाताच त्यांचे डोळे विस्फारले. चेहऱ्यावर भयाचे भाव निर्माण झाले. अचानक वेगाने वाढणाऱ्या विमानाच्या वेगाने तो भयचकित झाला. त्या गतीने विमानाचे तापमान लक्षणीय रित्या अचानक वाढले. खालच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या विमानांचे तापमान वाढताच धोक्याचे सायरन वाजू लागले. त्या सायरनच्या आवाजाने गाढ झोपेत असलेले आणि जागे असणारे लोक तो धोक्याची सूचना देणारा सायरन ऐकून सर्व घाबरले. प्रत्येकाची झोप उडाली. हा सायरन अचानक कसा वाजू लागला? काय झाले? ही कसली धोक्याची सूचना? विमानातील सर्व सामान खाली पडून अस्ताव्यस्त झाले होते. बेल्ट बांधले नसले तरी ते पुढे झुकले गेले होते. त्यांना पाठीमागे सरकता येत नव्हते.
अचानक पणे विमानातील लाईट बंद झाले आणि विमानात काळा घुप्प अंधार पसरला त्यामुळे एकच हल्ला कल्लोळ माजला.

क्रमशः

🎭 Series Post

View all