अस्तित्वाचा शोध भाग 6

मावशी येईल का मिरासोबत तिच्या घरी रहायला? कसं असेल त्यांच पुढचं आयुष्य?


पूर्वसूत्र: मिराला लेफ्टनंट जनरल मालती म्हणजेच तिच्या मावशीबद्दल आणि तिच्या मृत्यूबद्दल सगळं कळतं. ते ऐकून तिला खूप मोठा धक्का बसला. तिच्या जायच्या आदल्या रात्री ती आणि मावशी बसले होते. दोघीही शांतच होत्या. तेव्हाच मीरा मावशीला म्हणाली की तिला काहीतरी विचारायचं आहे.

भाग 6

"काय विचारायचं आहे तुला?" मावशीने विचारलं. मीरा थोड्यावेळ शांत बसली. कसं बोलावं ते तिला कळत नव्हतं. अखेर सगळा धीर गोळा करून तिने विचारलंच,"मावशी, तू माझ्याबरोबर पुण्याला येशील?" ह्या प्रश्नांची मावशीला पण अपेक्षा नव्हती. ती गोंधळून गेली. तेव्हा मिराच बोलायला लागली. "मावशी, मला कधी आईचं प्रेम नाही मिळालं. तिथे पुण्याला मी एकटीच राहतीये. इथे आल्यानन्तर तुझं वागणं बघितल्यावर पहिल्यांदा आईचं प्रेम कसं असतं ते जाणवलं मला. खरतर आपण एकमेकींच्या कोणीच नाहीयोत. पण तरीही तू मुलीसारखा  माझा पाहुणचार केलास. मला खरंच तुझी गरज आहे मावशी. प्लिज येशील माझी आई बनून?" तिच्या ह्या बोलण्याने मावशीला गहिवरून आलं. तिला कोणीच मुलगी नव्हती. पण मिराला बघितल्यापासून तिला खूप छान वाटलं होतं. "मीरा मला खरंच आवडेल यायला तुझ्याबरोबर, तुझी आई बनून रहायला; आयुष्यभर".

मावशीचा होकार मिळाल्यावर मिराला खूपच हुरूप आला. त्या दोघींनी मिळून मावशीचं सगळं सामान आवरलं. मिराने त्या दोघींचीही तिकिटं बुक केली होती.

त्या दोघी पुण्याला आल्या. मावशीने तिची ट्रान्सफर पुण्याला करून घेतली होती. मिराचा व्यवसाय दिवसेंदिवस आकार घेत होता. आताशा तिला त्यांच्या अपघाताचं स्वप्न पडणं देखील बंद झालं होतं.

एक दिवस मीरा आणि मावशी सकाळी फिरायला बाहेर पडले. फटाफटलं असलं तरी उजेड नव्हता. आकाशात गुलाबी रंगाची हलकी उधळण व्हायला लागली होती. अचानक रस्त्यावर एका ठिकाणी लहान बाळाचा रडण्याचा आवाज येत होता. मिराने आणि मावशीने शोधल्यावर आडोशाला एका दुपट्यात गुंडाळलेलं तान्ह बाळ ठेवून कोणीतरी निघून गेलं होतं. मिराने पटकन त्या बाळाला उचलून घेतलं. त्याला शांत केलं. त्या बाळाला घेऊन दोघीही जवळच्या पोलीस ठाण्यात गेल्या.

तिथे ते बाळ सापडल्याची नोंद करून त्या त्याला घेऊन परत आल्या. पण दोनतीन दिवसांनी सुद्धा त्या बाळाचे आईवडील नाही सापडले. काय होईल आता त्या बाळाचं?
…….
                                क्रमशः

🎭 Series Post

View all