Login

स्पर्श हा प्रेमाचा!

प्रेमाचा स्पर्श!
शीर्षक :- स्पर्श हा प्रेमाचा

बंधन प्रीतीचे
वेड मना लावी
तिची हीच नशा
मनावर हावी

स्पर्श हा प्रेमाचा
हरपतो भान
दिले तिने मला
हे स्नेहाचे वाण

चाहूल ती लागे
तिच्या पैंजणाने
हृदयाचे ठोके
वाढे काळजीने

विरह हा आता
ना होई सहन
मिळेल का साथ?
प्रश्न हा गहन

© विद्या कुंभार

सदर कवितेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all