मराठीतील १०मराठीतील १० प्रेरणादायी पुस्तके (10 Motivational Book In Marathi)

मराठी पुस्तके
मराठीतील 10 प्रेरणादायी पुस्तके
(10 motivational book in Marathi)
पुस्तके माणसाचे पहिले आणि सर्वात उत्तम मित्र आहेत.
असा म्हणतात पुस्तकांनी माणूस घडू देखील शकतो . काही पुस्तके जीवनाची नवी दिशा दाखवतात तर काही पुस्तके आयुष्य घडवतात. तर मग आज अशाच प्रेरक पुस्तकांचा साठा मी घेऊन आली आहे. आशा करते आयुष्यात एकदा तरी ही पुस्तके तुम्ही वाचणार . शेवटी वाचाल तर वाचाल.

माझी जन्मठेप - वी .दा सावरकर यांचे लिखित हे पुस्तक आपल्याला त्यांच्या अंदमान येथील काळया पाण्याच्या शिक्षेविषयी आणि तेथील कठोर, असहणीय अनुभवांचा आढावा आपल्याला देते. या पुस्तकाविषयी एक मत असे सुद्धा आहे की आयुष्य संपवू पाहणाऱ्या व्यक्तीने एकदा तरी हे पुस्तक वाचलेच पाहिजे . तर मग असा जीवन संघर्ष एकदा तरी वाचवा .
प्रकाशवाटा - आयुष्यात कधी आदिवासींसोबत राहायची वेळ आली तर? असा म्हणतात भरकटलेल्याला प्रकाशाची वाट दाखवली तर त्याच्या आयुष्याचे नक्कीच सोने होऊ शकते पण विचार करा जिथे पूर्ण एक विभागाला वाळीत टाकले आहेत जिथे गेल्यावर सुद्धा माणसाला किळस येईल आणि जिथे बोलण्यापासूनच लोकांची अधोगती आहे अशा भागात प्रकाशाची वाट निर्माण करणे किती अशक्य आहे परंतु अशाच आदिवासींचा विभाग म्हणजे हेमलकसा आणि आनंदवन आणि या विभागांमधील दुर्गम , आव्हानात्मक प्रसंगांची चित्त थरारक वर्णन डॉ . प्रकाश आमटे याच्या लिखित प्रकाशवाटा या पुस्तकात आहे. हे एक आत्मचरित्र आहे . आदिवासींना सुद्धा सामान्य माणसाप्रमाणे जगण्याची संधी मिळावी त्यांची पिळवणूक थांबावी , हे नेहमीच बाबाचें स्वप्न होते आणि या स्वप्नपूर्तीचा प्रवास म्हणजे प्रकाशवाटा . समाजात बदल आणायचा आहे पण “ मी एकटा कसं करणार “ हा विचार जर झटकून टाकायचा असेल तर नक्कीच हे पुस्तक एकदा तरी वाचावे .

वपूर्जा - पुस्तक म्हंटले कि पहिला प्रश्न येतो कि वेळ काढून रोजनिशी वाचावे लागणार आणि कुठे थांबलोच तर लिंक तुटण्यापूर्वी आपले वाचन पुन्हा सुरु झाले पाहिजे परंतु व . पु . काळे . यांचे लिखित वपुर्झा पुस्तक याला अपवाद आहे. वपुर्झा म्हणजे रिक्त अर्थात नवीन विचारांना आत्मसात करण्यासाठी आतुरलेले रिक्त पात्र . तर या पुस्तकाची सर्वात खास बात ही कीं या पुस्तकात कुठेही अनुक्रमणिका किंवा पान नंबर नाही. म्हणजेच हे पुस्तक तुम्ही कुठेही केव्हाही आणि कसेही वाचण्यास सुरु करू शकतात . लेखकाने या पुस्तकात त्याच्या रोजच्या आयुष्यातील घडणाऱ्या प्रसंगांची सुरेख सांगड घातली आहे . आयुष्याच्या एका नव्या दृष्टिकोनास एकदा तरी संधी द्यावीच आणि वपुर्झा आत्मसात करावे .

एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर यांचे लिखित हे पुस्तक जॉर्ज वॊशिंग्टन यांचे चरित्र आहे . जन्मापासूनच जे व्यक्तिमत्त्व निसर्गाच्या सानिध्यात जगले होते आणि आयुष्य देखील त्यांनी त्यासाठीच समर्पित केले असते परंतु नशिबाने काहीतरी वेगळे लिहिले होते आणि म्हणूनच कदाचित एक कृष्णवर्णीय माणसाची परदेश पर्यंतची वाटचाल म्हणजे एक होता कार्व्हर . एक साधारण कृष्णवर्णीय ते अमेरिकेचे पहिले अध्यक्ष म्हणजे एक होता कार्व्हर . निसर्गापासून उपलब्ध होणाऱ्या अमाप नैसर्गिक वस्तू पॉलिश , रंग, कॅंडी ,माती तयार करणे आणि कित्येक पद्धतीचा रसाळ खजिना या विश्वाला देणाऱ्या जॉर्ज यांचे चरित्र एकदा तरी वाचावेच .

भगवद गीता - हिंदुत्वाची शान म्हणजे गीता . आपल्या प्रत्येक भावनांची रूपे आणि स्वरूपे या गीते मध्ये आपणास उपलब्ध आहे. आयुष्याच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर या गीतेत आहे . ५००० वर्षांपूर्वी युद्धभूमीमध्ये श्रीकृष्णने अर्जुनाला हे ज्ञान दिले होते . यामध्ये ७०० श्लोक आणि १८ अध्याय आहे. गीता ही इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये उपलब्ध आहे परंतु कृष्णकृपामूर्ती यांनी मराठी मध्ये सुद्धा गीता लिहिलेली आहे . मग हिंदुत्वाची शान वाचणार ना !

माझी आत्मकथा - आधुनिक भारताचे शिल्पकार . डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या आयुष्याची कारकीर्द म्हणजे त्यांचे लिखित पुस्तक माझी आत्मकथा . बाबासाहेब या पुस्तकाविषयी असे सांगतात कि त्यांच्या आयुष्यात त्यांना सर्वानी दुरावले होते या समाजाने त्यांना दुरावले होते परंतु ग्रंथ हे एकमेव व्यक्ती होते कि त्यांनी बाबासाहेबाना नेहमी आधार दिला . त्यामुळे त्यांचे पुस्तके मागणे म्हणजे त्यांचे प्राण मागण्याजोगे आहेत असे सांगतात . बाबासाहेबांच्या भीम ते डॉ. बाबासाहेबापर्यंतचा प्रवास जर जाणून घ्याचा असेल तर नक्की एकदा हे पुस्तक वाचावे.

मन मै है विश्वास - एक परीक्षा माझे भविष्य नाही सांगू शकत बर का ! एवढे एकच वाक्य मला सुचले . कारण जिथे एक परीक्षा पास करण्यासाठी कधी कधी मुलांना एक सेमिस्टर सुद्धा अपुरे पडते तिथे एक असे व्यक्तिमत्त्व ज्यांनी ८ महिन्यांमध्ये १३ परीक्षा पास करून नवीन इतिहास नोंदला तसेच २०१३ च्या दहशतवादाच्या हल्ल्यात प्राणांची बाजी लावून मुंबईचे रक्षण करणारे निधड्या छातीचे आय . पी . एस विश्वास नागरे पाटील यांच्या प्रेरणादायी जीवनाचा आढावा म्हणजे स्वतः विश्वास नागरे पाटील लिखित पुस्तक मन मै है विश्वास . अगदी सामान्य भागातून आलेला मुलगा ते ips पर्यंतचा प्रवास तर एकदा तरी वाचलाच पाहिजे .

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार - सद्गुरू वामनराव पै . लिखित पुस्तक नावावरूनच त्याचा परिचय देते . अर्थात आपले जीवन घडवण्याचा पूर्ण हक्क आणि सामर्थ्य केवळ आपल्यामध्ये आहे असे जणू ते जगाला सांगत आहे. ८४ लाख वर्षांनंतर माणूस मनुष्य योनी मध्ये जन्माला येतो मग याचे सार्थक नको करायला का? ज्याप्रमाणे सा , रे , ग , म , प ध . नी या सात सुरांनी संगीताची ठेवणं घातली आहे त्याचप्रमाणे जग , कुटुंब , शरीर ,इंद्रिये , अंतर्मन ,बहिर्मन आणि परमात्मा या सात तत्वांनी जीवनाची सांगड घालता येते . वामनराव यांनी आपल्या जीवनात अज्ञान , अंधश्रद्धा यांचे नेहमी निर्मूलन केले मग त्यांचे लिखित हे पुस्तक सुद्धा समाजासाठी एक नवीन दिशाच आहे आणि ही दिशा तर बघितलीच पाहिजे .

मुसाफिर - अच्युत गोडबोले याचे लिखित मुसाफिर सुद्धा एक आत्मचरित्र आहे . अर्थशास्त्र , संगीत, साहित्य , राजकारण , आणि कंप्युटर हा प्रवास तर आपण जाणतो परंतु या प्रवासापूर्वीचा प्रवास त्यांचा घडवणीचा प्रवास म्हणजे मुसाफिर . सोलापूर ते IIT आणि आदिवासी भाग ते अमेरिकेतील IT क्षेत्राचा आढावा म्हणजे मुसाफिर . तर नक्कीच एकदा तरी हे पुस्तक वाचावे .
श्रीमान योगी - रणजित देसाई लिखित ही एक ऐतिहासिक कादंबरी आहे . परंतु प्रत्येक परिस्थितीमधून बाहेर येण्यासाठी फक्त थोड्या धैर्याची गरज असते इतका साधारण परंतु अमूल्य संदेश आपल्याला महाराज देऊन गेले.
मराठ्यांच्या किंबहुना भारताच्या इतिहासातील तेजानं लखलखणारा दीपस्तंभ.
इतका अष्टपैलू, आवधानी संपूर्ण पुरूष इतिहासात दुसरा नाही. आदर्श राज्यकर्ता, थोर सेनानी, प्रजादक्ष, धर्माभिमानी, परधर्मसहिष्णू, चारित्र्यसंपन्न, दूरदृष्टीचा असा जाणता राजा जगाच्या इतिहासात दुसरा मिळणे कठीण. छत्रपती शिवाजी महाराज यांचे धगधगते आत्मचरित्र म्हणजे श्रीमान योगी .