May 15, 2021
सामाजिक

आजची तरुण पिढी आणि त्यांच सेक्सच समीकरण

Read Later
आजची तरुण पिढी आणि त्यांच सेक्सच समीकरण

आजची तरुण पिढी आणि त्यांच सेक्सचं समीकरण 

मुंबईतील नावाजलेले कॉलेज ,जिथे आज मानसरोगतज्ञ यांच व्याख्यान होत आणि विषय होता ,सेक्स लाईफ . विषय असा असल्यामुळे कॉलेज मधील कुणी प्राध्यापक नव्हते कारण ,प्राध्यापकांसमोर मुलं मनमोकळेपणाने बोलणार नाही,हा आग्रह मानसरोगतज्ञांचा होता.मुलांनी विषय वाचला होता आणि सेमिनार हॉल खचाखच भरला होता ,कारण कुणीही प्राध्यापक नसणार ही बातमी वा-यासारखी पसरली होती .

या विषयावर काय बोलणार याची सगळ्यांनाच उत्सुकता निर्माण झाली होती,समुपदेशन असणार की अजून काही .

एकदाचे मानसरोगतज्ञ आले ,त्यांच्या बरोबर प्रिन्सिपल सरही होते ,लगेच मुलांमध्ये कुजबुज सुरु झाली.तसं लगेच डॉक्टरांनी माईक हातात घेतला आणि बोलायला सुरुवात केली .

डॉक्टर- Good afternoon friends, Don't worry, your principal Sir will left hall after my introduction, so please co operate .

सगळे एकदम शांत झाले ,दोन मिनीट प्रत्येकाच्या मनात हा विचार आला ,ह्याला कसं कळलं आमच्या मनातलं.

तितक्यात प्रिन्सिपल सरांनी त्यांची ओळख करून दिली,त्यांच बुके देऊन स्वागत केले आणि सगळी सूत्र त्यांच्या हातात देऊन ते तिथून बाहेर गेले ,तसा सर्वच मुलांनी एक कल्ला केला ,तसं जी मुलं हेल्प करण्यासाठी नेमली होती ,त्यांनी सगळ्यांना शांत बसायला सांगितल ,तसं डॉक्टरांनी बोलायला सुरुवात केली.Good afternoon friends ,आता  तुम्ही असं म्हणाल,हे म्हातारं आम्हाला फ्रेंड म्हणतंय,याचं वय काय,आमच वय काय ,असा विचार करत आहात ना ,पण हेच एक नात खूप निखळ,छान आणि सुंदर असतं,ह्याला वयाच्ं बंधन नसतं आणि माझ्या दिसण्यावर जाऊ नका ,मी अजुनही तरुण आहे ,तुम्ही जसे वागता ,तसं कधी कधी मला करावंस वाटतं,मघाशी माझ्या बरोबर तुमचे प्रिन्सिपल सर आले ,तेव्हा तुमच्या मनात काय विचार आला सांगू ,हा म्हातारा इथे कशाला कडमडला ,बरोबर ना ? 

तसा एक हशा पिकला ,म्हणजे मी बरोबर ओळखलं,आता अजून एक गोष्ट ,मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल ,त्याची उत्तर तुम्ही द्यायची ,मी तुम्हाला नाव विचारणार नाही आणि मला तुमची नाव माहित नाही . पण तुम्ही जे घातले आहे ,त्यावरुन मी तुम्हाला बोलू शकतो ,त्यामुळे बिनधास्त पणे सेशन एन्जॉय करा ,कारण आपण एकमेकांना ओळखत नाही आणि तुम्हाला ओळखणारे प्राध्यापक इथे नाही ,तर आता सुरुवात करु या.

डॉक्टर- सेक्स म्हणजे काय?

मुलगा -एक मुलगा आणि मुलगी यांत जे होते ते सेक्स 

डॉक्टर- असं का ,दोन मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये होते ते काय ?

मुलगा -ते अब्नॉर्मल लोकं करतात ,नॉर्मल नाही करत .

डॉक्टर- तुम्हाला तुमच्या आयुष्यात सेक्स बद्दल माहिती कोणाकडून मिळाली.

मुलगा - इंटरनेट आणि मित्र 

डॉक्टर -किती जणांच्या आई वडिलांनी तुम्हाला या बद्दल सांगितलं आहे 

फक्त दहा ते वीस मुलेच हात वर करतात .

डॉक्टर - तुमच्यातल्या किती जणांनी सेक्सचा अनुभव घेतला आहे ,ही माहिती इथून कुठेही बाहेर पडणार नाही .

जवळ जवळ चाळीस टक्के मुलं आणि दहा टक्के मुली हात वर करतात .

डॉक्टर -कुणावर जबरदस्ती झाली आहे का,म्हणजे इच्छा नसताना .

फक्त पाच किंवा दहा मुले मुली हात वर करतात .

त्यांना पुढचा प्रश्न - घरी सांगितले का? 

फक्त दोन जणांनी सांगितले ,बाकीच्यांनी भितीने नाही सांगितले .

डॉक्टर - ज्यांनी सांगितले त्यांच पुढे काय झालं 

मुलगी - विनयभंग केलेला ,घरी सांगितल्यावर पोलीस कम्प्लेंट करणार सांगितल्यावर ,माफी मागितली आणि ते तिथून दुसरीकडे राहायला गेले .

डॉक्टर-ज्यांनी भितीने नाही सांगितले ,त्यांना ती लोक त्रास देतात का ? 

मुलगी -हो देतात ,म्हणून एकटी कुठे जात नाही 

डॉक्टर-घरी सांग

मुलगी -घरचे मलाच दोष देतील आणि कॉलेज बंद करुन टाकतील 

डॉक्टर -आईवडिलांनी मुलांशी या विषयावर मोकळेपणाने चर्चा करावयास हवी.बाकीच्यांनी सेक्सचा अनुभव घेतला ,तुम्ही त्यासाठी कसे प्रवृत्त झालात ,तुम्ही जे करता ,ते चुकीचं आहे,असं कधी वाटत नाही का आणि कुठे करता ?

मुलगी - पोर्न मुव्ही पाहिल्यावर इच्छा झाली आणि त्यासाठी पार्टनरही मिळाली ,मग अजून काय हवं ,आईवडील दोघे जॉब करतात ,घरी कुणी नसतं त्यावेळी एखादं लेक्चर बंक केलं की झालं काम 

डॉक्टर - भिती नाही वाटत का ,सगळं करताना आणि ज्या मुलीबरोबर संबंध आहे,तिच्यावर प्रेम आहे का ? लग्न करणार आहे का?

मुलगा -छे छे,तसं काही नाही,तिचीही गरज असते ,माझी गरज असते ,दोघांच्या संमतीने होतं ,झालं की एकमेकांना ओळखत नाही किंवा काही झालच नाही ,असं वागतो आणि  लग्नाच म्हणाल तर,आईवडिलांच्या इच्छेने.

डॉक्टर-मग जे चालू आहे,ते काय आहे 

मुलगा-its just fun ,not serious आणि नेहमी वेगळी मुलगी असते ,सगळ्यांशी थोडी लग्न करणार .

डॉक्टर-भिती नाही वाटत का,की एडस वैगेरे होईल याची 

मुलगा-precaution घेतो आम्ही 

डॉक्टर-म्हणजे नेमकं काय करता

मुलगा-कंडोम वापरतो .

मुलगी -डॉक्टर,एक शंका आहे मनात ,विचारू का?

डॉक्टर-त्या साठीच मी इथे आहे ,विचार

मुलगी-कधी कधी,आम्ही ग्रुप सेक्स करतो ,त्यात एड्सची काही शक्यता असते का?

डॉक्टर-शक्यता नाकारु शकत नाही ,कारण तू सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वेळी जर,वेगळया व्यक्तीशी संबंध आला तर शक्यता नाकारता येत नाही.सेक्स करणं,चुकीच आहे ,असं मी म्हणणार नाही,ती एक नैसर्गिक क्रिया आहे ,पण कसं आहे ,त्याचं व्यसनात रूपांतर होऊ नये,जर ते झालं तर माणसाच सैतानात रुपांतर व्हायला वेळ लागणार नाही आणि असं झालं की ,समोरची व्यक्ती योग्य आहे की अयोग्य ,हे सुध्दा समजत नाही आणि मग अशावेळी नकळतपणे दुस-यावर अन्याय होतो. व्यसन हे कशाचही असू शकते,अगदी सेक्सच सुध्दा,एकदा का एखाद्याला ही नशा अनुभवायची सवय लागली की,ती सुटत नाही,आजची तुम्ही ही जी पिढी आहात ,ते उद्याच आपल्या देशाचं उज्ज्वल भवितव्य घडविणार आहात ,एकदा का तुम्ही ,या गोष्टीच्या आहारी गेलात की ,तुमचं भविष्य धोक्यात येऊ शकते. भारतात लग्न संस्था जी बनवली गेली आहे,ती याच उद्देशाने की ज्यामुळे ,या गोष्टीत संयम राखला जातो ,लग्न हे सेक्सच्या पलिकडे जाऊन प्रेमाच बंधन मानलं जातं,मी जे बोलतोय ते तुम्हाला कदाचित या क्षणी पटत नसेल ,पण पुढे जाऊन तुम्ही जेव्हा आई वडिलांच्या भूमिकेत जाल ,त्यावेळी मात्र आता तुम्ही जे करताय ,ते त्यांनी केले तर तुम्हाला आवडणार नाही. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केलेला चांगला नसतो ,मी ह्या सगळ्यातून गेलेल्या व्यक्तींना पाहीलं आहे ,पुढे जाऊन हवं ते नाही मिळालं की,चुकीच्या मार्गावर जायला वेळ लागणार नाही.तुम्ही म्हणाल ,शेवटी हा ही लेक्चर देणाराच निघाला ,हो ना.

तसे सगळे हसायला लागले .

डॉक्टर-तुम्हाला काय वाटत ,सेक्स बद्दल माहिती तुमच्या पर्यंत कशी पोहोचावी ?

मुलगी - घरच्यांनी मनमोकळेपणाने या विषयावर चर्चा केली पाहिजे ,कारण ब-याच जणांना या गोष्टी उत्सुकता निर्माण होते म्हणून कराव्याशा वाटतात किंवा बघाव्याशा वाटतात ,तेच जर घरच्यांनी म्हणजे आईने मुलीला आणि बाबाने मुलाला मित्रत्वाच्या नात्याने सांगितल ,त्याच्या मागची जबाबदारीची भूमिका सांगितली आणि जर हातून चूक घडली ,तर संभाव्य शक्यता काय असतील ,हे ही सांगितले पाहिजे ,कारण आमचं वयच असं आहे की,या वयात काही करताना भविष्याचा विचार केला जात नाही. हे वय असं असतं,की जे करु नको अस्ं म्हणून सांगितलं जातं, ते जर केलं तर एक थ्रिल अनुभवायला मिळेल असं वाटतं आणि मग बाकी कसलाही विचार मनात डोकावत नाही . कारण त्या वेळी मनात ही गोष्ट असते की,जे कुणी करत नाही ,ते मी करतोय किंवा करतेय. कधी कधी तर मुलींना पटवण्यासाठी मुलांमध्ये पैज लागते ,त्यावेळी ती मुलगी म्हणजे वस्तू नसून ,एक माणूस आहे ,ही गोष्टही विसरून जातात ,हे फक्त मुलांमध्येच नाहीतर मुलीं मध्येही आढळून येते. एखाद्या मुलाला किंवा मुलीला जर गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड नसेल तर ,त्याच्यात काहितरी गडबड आहे ,त्याच्यात किंवा तिच्यात चार्म नाही ,असं समजलं जातं.

पौरुषत्व सिध्द करण्यासाठी दारु आणि सिगारेट पिण्याच आव्हान दिलं जातं,मुलींना सुंदर दिसते ,हे दाखवून देण्यासाठी 

मुलांना जाळ्यात ओढावं लागतं,ही समाजातली सत्य परिस्थिती आहे.

डॉक्टर -तू जे बोललास ,ते ह्यांच्या शब्दात बोललास ,तू ह्यांच्यात राहतो म्हणून तुला या गोष्टी अनुभवायला मिळत आहे,तुला हे सगळं बोलताना भिती नाही वाटली का ? 

मुलगा -नाही ,माझ्या सारखेच विचार यातील काही जणांचे असतील ,पण बोलण्याच धाडस कुणी करणार नाही.

डॉक्टर -हा जे बोलला ,त्याच्याशी किती लोक सहमत आहात ऐंशी टक्के मुलांनी हात वर केले,ते पाहून डॉक्टर- जावे ज्याच्या वंशा तेव्हाची कळे,तरीही जर कुणाला मनापासून इच्छा असेल आणि या दलदलितून बाहेर पडण्यासाठी जर माझ्या कडून काही मदत हवी असेल ,तर मी तुम्हाला नक्किच मदत करेल आणि या बद्दल कुठेही वाच्यता होणार नाही,याबद्द्ल नि:शंक रहा कारण आम्ही पदवी घेताना तशी शपथ घेतो.

असं म्हणत डॉक्टर - मला तुमच्याशी संवाद साधल्यावर ,तुमची बाजुही कळाली आता जेव्हा ,पालकांबरोबर सत्र असेल ,तेव्हा मी तुमच्या भावना माझ्या शब्दातून  व्यक्त करु शकतो,धन्यवाद,भेटू पुन्हा ,स्वत:ची काळजी घ्या आणि तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा.असं म्हणत ते निघून जातात आणि सगळ्या हॉल मध्ये एक गोंधळ होतो,तसे जी मुलं हेल्प करण्यासाठी होती ,त्यांनी सगळ्यांनी सर्वांना हॉल बाहेर काढलं,आज सगळ्यांमध्ये विषय हा नेहमी पेक्षा वेगळा होता,जो घराघरात कधीच मोकळेपणाने बोलला जात नाही,ज्यांची मुले कॉलेजला जातात ,त्यांनी नक्की या सगळ्याचा विचार करा .लेख आवडला असेल आणि योग्य वाटत असेल तर नावासहित शेअर करू शकता आणि अभिप्राय अवश्य द्या.

रुपाली थोरात.

Circle Image

रूपाली रोहिदास थोरात

Assistant professor

I love to read and write , from my college time, I am writing poems, whenever thoughts come in mind ,I wrote it in words, but no platform to share with others . when I saw this site, I got a platform to share my thoughts and views with all, Thanks to Era creators to giving me such a wonderful platform as well inspiring new writers, Hope all of you will enjoy our journey of reading and writing and will give comments to encourage me . also suggestions are welcome by me so that I can improve because always we are learners at the end of our life. Rupali Thorat