Jan 26, 2022
नारीवादी

आजची - स्त्री

Read Later
आजची - स्त्री
 आजची स्त्री - आजची स्त्री गृहिणी असली तरी बहुश्रुत झालेली आहे. जगात घडणाऱ्या घटनांचा,आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो? याची तिला जाणीव झालेली आहे. ही सर्व जबाबदारी सांभाळून देखील ती , घरात मुलांचा अभ्यास घेते,त्यांच्या आरोग्याची काळजी घेते, घरातील सर्व सदस्यांचे लाड पुरवते ,तेही कोणतीही अपेक्षा मनात न ठेवता. 
     आजची स्त्री पी. टी.उषा बनून जिवाच्या आकांताने धावते. तर कधी मदर तेरेसा बनुन त्रास असलेल्यांना आपल्या कवेत घेऊन मायेची ऊब पण देऊ शकते. वेळ आलीच तर देश रक्षणासाठी झाशीची राणी म्हणून युद्धात लढण्यासाठीही ती तयार असते.
    आजची स्त्री शिक्षण घेते शिक्षण देते विविध प्रकारच्या नोकऱ्या ही करते आणि घराची जबाबदारी उचलते मुलांचा अभ्यास मुलांच्या भवितव्याची जडण-घडण याचा भार देखील स्त्री समर्थपणे पेलत आहे.एवढ्या सर्व जबाबदाऱ्या पेलण्याची प्रचंड क्षमता आजच्या स्त्रीने कमावलेली आहे. 
       आजच्या स्त्रीने तर तिच्या सर्व बंधनांवर मात करून प्रगतीच्या दिशेने घोडदौड सुरू केली आहे.विसाव्या शतकात स्त्री ही पुरुषांपेक्षा अर्थार्जनाच्या क्षेत्रातही समोर आहे. महिलांच्या संघटना तयार झाल्या, आर्थिक विकासाच्या अनुषंगाने विविध व्यवसायात स्त्रिया अग्रणी झाल्या. समाजकारण, राजकारण, खेळ, क्रीडा, शिक्षण, कला, साहित्य, वैद्यकशास्त्र, विधी व न्याय यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा, देशाच्या शासनकर्त्या म्हणून आजची स्त्री प्रत्येक ठिकाणी पुरुषांच्या बरोबरीने कार्य करत आहे.
        कालची स्त्री समाजाच्या अत्याचाराला बळी पडणारी होती. परंतु अशा समाजाला वठणीवर आणण्याची समर्थता आजच्या स्त्रीमध्ये आहे. परंतु ममता व वात्सल्य मात्र आजही कालच्या - स्त्रियांप्रमाणेच आजच्या स्त्रिया ही सुंदर पद्धतीने सांभाळत आहेत. चूल आणि मूल या जबाबदारी सोबतच इतरही क्षेत्रात त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे.
    खरोखर आजच्या या स्त्रीला माझे कोटी कोटी नमन....
नमस्कार... सौ. सोनल गुरुनाथ शिंदे..... ( देवरुख - रत्नागिरी )
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Mrs. Sonal Gurunath Shinde

लेखिका

MA - Economics And Sociology