टोचणार सुख... भाग 3

एक दिवस डॉक्टरकडे जाण्याच्या बहाण्याने ती मैत्रीणी कडे निघून आली, कोणाला सांगितल नाही,


टोचणार सुख... भाग 3

©️®️शिल्पा सुतार
..............

नुसते बघायला आले तरी कितीतरी दागिने चढवले होते त्यांनी साक्षीच्या अंगावर, पण तेव्हाही ते डोक्यावरून पदर, सगळ्यांसमोर काहीच बोलायच नाही, हे नियम तिला पाळावे लागले, हे खटकलं होतं साक्षीला, पण घरच्यांनी तिला गप्प केलं,

तिच्या आईकडे एक मंगळसूत्राच्यावरती दागिना नव्हता कधी , आता तिला मुलीच्या नशिबाचा हेवा वाटत होता, सोन्याने मठवली हिला, सुखात राहील मुलगी ही खात्री होती त्यांना , त्यासाठी थोडा त्रास सहन करायचा साक्षी अस आई सांगत होती,

पाठची छोटी बहीण लग्नाची होती, तिच्या लग्नातही मदत होईल यांची ही आशा होती, गरिबीत राहणं कठीण असतं, एवढ छान घरदार आणि स्टेटस आहे, थोडं त्यांच्या मनाप्रमाणे वाग, मर्जी सांभाळ नवर्‍याची साक्षी ,

अगदी महिन्याभरातच वाजत गाजत साक्षी आणि अभिजीत लग्न झालं, मुलीकडच्यांना थोडा सुद्धा खर्च करू दिला नव्हता त्यांनी, उलट अजून साक्षीच्या आईला साड्या दागिने दिले होते, साक्षीचे आई बाबा ही काही लागल तर अभिजीतला सांगत होते, अडीअडचणीत मदत करत होते अभिजीत त्यांना,

कित्येक ड्रेस साड्या घेतल्या होत्या अभिजीतने साक्षीला लग्नापर्यंत, लग्नानंतर लगेच थंड हवेच्या ठिकाणी फिरून आले दोघ, अगदी साक्षी म्हणेल ती पूर्व दिशा अस होत, आता साक्षीला ही वाटत होतं की आपल्यासारखं नशीब कोणाचच नाही, अभिजीत खूपच चांगले आहेत,

घरी आल्यानंतर पहिल्याचं दिवशी तिला घराचे नियम समजले, तिला धक्का बसला होता, यानंतर आपल्याला कुठेच बाहेर जाता येणार नाही, जेव्हा अभिजीत यांना वेळ असेल, ते सोबत नेतील तेव्हाच जाता येईल,

मीनाक्षी होती घरात, बर वाटल साक्षीला अगदी मैत्रिणी सारखी आहे ही, ती पण अशीच घाबरलेली बुजलेली होती, कायम ती तिच्या खोलीत असायची, तिला मूल बाळ नव्हत, एक-दोनदा साक्षीने तिच्याशी जाऊन बोलण्याचा प्रयत्न केला, आपण दोघी जात जाऊ बाहेर असंही सुचवलं, पण तिने नकार दिला ती मोठ्याने बोलत नसे, जास्त काही सांगत नसे, वेगळीच घाबरलेली असायची ती, कोणत्यातरी दडपणाखाली होती

मधेच एका सणाला साक्षीला माहेरी जायची संधी मिळाली, तेव्हा घरच्यांनी ताकीद दिली की इकडेतिकडे फिरली तर बघ, डोक्यावरचा पदर पडू द्यायचा नाही, दागिने भरपूर घालून राहायचं, साक्षीला आता या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आला होता, सजलेल्या बाहुली प्रमाणे मी नाही राहणार, छान घरी गेल्यानंतर ड्रेस घालावा सगळे दागिने काढून ठेवून मुक्त वावराव, मैत्रिणींना भेटाव खूप वाटायचं तिला,

आईकडचे चार दिवस पटकन गेले, सासरकडच्या श्रीमंतीपेक्षा आईकडचे साधपण तिला खूपच आवडलं, तसं तिने एक-दोनदा आईला बोलुन सुद्धा दाखवलं,.. "मला आवडत नाही ग तिकडे, खूपच नियम आहेत, कुठे बाहेर जायचं नाही, हे नाही, ते नाही, अभिजित सुद्धा उशिरा येतात ऑफिसहून, मला नाही करमत तिकडे" ,

"असंच होतं सुरुवातीला सासरी, तुला हळूहळू तिकडची सवय झाली की इकडे आवडणार नाही, अस करु नको बेटा, जा घरी चांगले आहेत अभिजीत, किती मदत करतात आपल्याला",... आईने समजवून तिला सासरी पाठवलं

परत पूर्वीचा दिनक्रम सुरू झाला, आता साक्षीला घरात करमत नव्हत, रोज खूप रडायची ती, आजारी राहू लागली, मला वेड लागेल अस केल तर, तिने तिच्या मैत्रिणीला कॉन्टॅक्ट केला,.. "मला यायच आहे तिकडे, मी नाही राहणार इथे मदत कर, मी नौकरी करेन, माझी माझी राहीन, सुरुवातील तुझ्याकडे रहाता येईल का आठ पंधरा दिवस",

"ये ना साक्षी काही हरकत नाही पण तुझ्या सासरचे मला पोलिसात देणार नाही ना",..

"नाही काळजी करू नकोस मी आहे तुझ्या बाजूने",.. साक्षी

एक दिवस डॉक्टरकडे जाण्याच्या बहाण्याने ती मैत्रीणी कडे निघून आली, कोणाला सांगितल नाही, अभिजित रात्री घरी आले, सासुबाईंनी सांगितल साक्षी संध्याकाळ पासून नाही घरी, बघ जरा कुठे गेली ती.

बायको घरी नाही बघून अभिजीत घाबरले, ते तिच्या माहेरी आले लगेच, तिथे साक्षी नव्हती, सगळे खूप घाबरले होते,

आईने साक्षीच्या मैत्रिणींना फोन केले, एक मैत्रीण फोन उचलत नव्हती ही साक्षीची बेस्ट फ्रेंड आहे, नक्की साक्षी इथे असेल,

"हीचा पत्ता आहे का?",.. अभिजीत

हो..

🎭 Series Post

View all