टोचणार सुख... भाग 1

डोक्यापासून पायापर्यंत दागिन्यांनी मठलेली साक्षी डोक्यावरून पदर घेवून डायनिंग टेबलवर सगळ्यांना नाश्ता वाढत होती



टोचणार सुख... भाग 1

©️®️शिल्पा सुतार
..............

डोक्यापासून पायापर्यंत दागिन्यांनी मठलेली साक्षी डोक्यावरून पदर घेवून डायनिंग टेबलवर सगळ्यांना नाश्ता वाढत होती, तिचा नवरा अभिजीत, सासरे, मोठे दीर बसलेले होते, बिझनेस बद्दल काही तरी बोलत होते ते , सासुबाई लक्ष देवून होत्या, मोठ्या जावूबाई बाजूला उभ्या होत्या, पण त्या तिघींकडे या तिघांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल होत, जस त्या तिथे आहेत की नाही, अगदी महत्व नव्हत त्यांना,

जावू बाई आजारी होत्या, त्यांना उभ राहता येत नव्हतं,

"तुम्ही बसा ना ताई, करा नाश्ता, एक तर बर नाही तुम्हाला, थोड खावून घ्या ",.. साक्षी

तेवढ्यात जावेकडे तिच्या नवर्‍याने बघितल, तिने मानेने नकार दिला,

सासुबाईंनी बघितल,.. "अग मीनाक्षी.. साक्षी बरोबर बोलते आहे, बस तू खा थोड",.. त्यांनी दिराला रागवल, तरी मीनाक्षीची हिम्मत झाली नाही, ती नंतर बसली या सगळ्यांसोबत,

सगळे ऑफिसला जायला निघाले, साक्षी बघत होती अभिजीतकडे, त्यांनी लक्ष दिल नाही तिच्याकडे , माहिती होत तिला मोठय़ां समोर हे बोलणार नाहीत माझ्याशी, पण निदान एकदा बघितल तरी असत माझ्याकडे, सासुबाईंना समजली तिची अवस्था, त्याही बरेच वर्ष झाले हेच सोसत होत्या.

सासरे कडक होते स्वभावाने, त्यांच्या समोर काहीही चालत नव्हत कोणाच, ते अजिबात घरच्या बायकांना विचारत नव्हते, सासरे घरी नसतांना नियम मोडायची कोणाची हिम्मत नव्हती, एवढा दरारा होता त्यांचा.

साक्षी, सासुबाई, मीनाक्षी यांनी शांत पणे नाश्ता केला, जो तो ज्याच्या त्याच्या रूम मधे निघून गेल,

नवीनच लग्न झालेली साक्षी या वातावरणाला कंटाळली होती, सारखी दुय्यम वागणूक मिळते इथे , काय अस? , आम्ही काही कमी आहोत का कोणा पेक्षा, पुरुष मंडळी का श्रेष्ठ इथे, आम्हाला ही येवु द्या ऑफिस मधे मग बघा कस काम करतो ते, काही करू देत नाही तर कस समजणार यांना की आम्ही हुशार आहोत ते,

भल्या मोठ्या घरातल्या वरच्या मजल्यावरची कोपर्‍यातली बेडरूम होती तिची, तेच तीच विश्व होत, ती तिच्या बेडरुमच्या खिडकीत बसलेली होती, अगदीच करमत नाही इथे, काय करणार दिवसभर, शिक्षण घेवू किंवा एखादा क्लास लावू तर त्याला ही परवानगी नव्हती.

सासरचा मोठा बिजनेस होता, अभिजित सकाळी ऑफिसला जायचे ते रात्रीच घरी यायचे, कधी कधी तर रात्री पार्टी असली तर खूप उशीर व्हायचा त्यांना यायला , घरचा नियम होता सुनांनी नोकरी करायची नाही, बिजनेस मध्ये लक्ष घालायचं नाही, बाहेर बिनकामाचा फिरायचं नाही, नवरा सोबत असेल तर जाता येईल बाहेर, त्यामुळे तिला अभिजीत कधी कुठे घेवून जातात याची वाट बघावी लागायची,

कॉलेज काळात अतिशय आनंदात असायची साक्षी, छान ग्रुप होता त्यांचा मुलींचा, सगळे मुल टरकून असायचे त्यांना, काही अडचण असली की मुली येवून त्यांच्या ग्रुपला सांगायच्या, मोटर सायकल चालवण, डोंगरावर पिकनिकला जाण म्हणजे खूप आवडीच होत तिच, एका स्त्रीशी अस कोणी आधी वागलं असत तर किती विरोध केला असता तिने, तिला काय माहिती होत की तीच स्वतः च नशीब अस आहे, एक दिवस अश्या घरात तीच लग्न होणार आहे, न आवडणार्‍या सगळ्या प्रथा तिला पाळाव्या लागता होत्या आता.

एवढ छान मुक्त बागडणारी ती आता एकदम पिंजर्‍यात बंद केल्या प्रमाणे अडकून पडली होती, तिला स्वतः निर्णय कोणी घेवू देत नव्हत, हाता पायात नियमांच्या बेड्या होत्या, तिचा जीव तिथे गुदमरत होता, तिचा नाईलाज होता.

जलद कथा मालिका स्पर्धा 


🎭 Series Post

View all