तिच मन

Marathi katha

तिच मन 

नेहा एका सर्वसाधारन कुटुंबातील मुलगी.bsc 2nd year ला प्रवेश घेताच नातेवाईकांची कामं सुरु झाली,तिला स्थळ आणण्याची.नेहा दिसायला सुंदर ,उंच ,थोडी अल्लड ,पण तितकिच प्रेमळ .

तिचे बाबा सुधाकर देसाई शिक्षक आणि आई सुनीता देसाई गृहिणी होत्या.त्यांनाही असे वाटायचे कि आता नेहा लग्नाची झाली आहे ,तिच्या साठी स्थळ येऊ लागली.

नेहा लग्नासाठी मनाने तयार नव्हती. असेच् करता तिला साकेत चे स्थळ आले .साकेत electric engineer होता आणि एका प्रसिद्ध कंपनी मध्ये नोकरी करत होता.ए स्तल् नेहा च्या वडिलांना फारच आवडले.त्यांनी नेहाला न् विचारता कांदे पोहे कार्यक्रम ठेवला .

नेहाला जेव्हा कळलं तेव्हा तिला दुःख आणि राग आला होता पण आई ने तिला म्हटलं ,तुला जर मुलगा पसंत नसेल तर आपण नाही सांगू. कसेतरी ती हो बोलली पण आतून उदास झाली .तिला पुढे शिकायचं होत पण आता सर्व् विसरून तिला तयार व्हायचं होत.

'बघायला येणार आहे आई लग्न लावायला नाही तु मला इतक का सजवतेय',जर पसंत करायच आहे तर मि जशी आहे तशीच बघाव',नेहा तिच्या आई ला समजावत होती कारण तिच्या आई ने तिला चांगलंच सजविले होते.आई वैतागुन बोलली ,'मुलाला पसंत यायला नको का बाई'.आई च हे बोलणं तिला चांगलंच जीवाला लागलं.पण तिने तास न् दाखवता हसून दिलं.

मुलाकडची मंडळी आली पण मुलगा आला नाही,त्याला महत्वाचे कामं आहे हे सांगितले गेले.मुला कडून त्याचा भाऊ ,आई ,वडील आले होते.हे एकूण नेहाला फारच वाईट वाटले.तिच्या मनात खूप प्रश्न निर्माण झाले,ज्याच्यासाठी आपण येवढ तयार झालोय तोच नाही आला ,माझं लग्न याच्याशी होतय कि यांच्या कुटुंबाशी तेच कळतं नाय .

सगड्यांच्या गप्पागोष्टी झाल्यावर नेहाला बोलावन्यात् आले.तिने आई ने सांगितल्या प्रमाणे सर्वाना नमस्कार केला ,चहा दिला ,तिचे हातपाय कापत् होते .तिला प्रश्न विचारण्यात आले जसे नाव ,शिक्षण ,गोत्र, तिने उत्तर दिली पण मनात विचार आला कि हे बघून नाही आले का? नाव ,शिक्षण माहित असल्यावरच आले आहे मग हेच प्रश्न का? 

प्रश्न विचारून झाले आणि ती लोक जायला निघाली.निरोप कळवतो असं बोलून, नेहा ला खूप वेगळ वाटत होत ,ती लोक तिच्यांशी आपुलकीने नाही बोलले असं तिला वाटलं .अपराधीपणाची भावना तिला येत होती ,काही चूक नसताना पण कार्यक्रम संपल्यावर तिने सुटके चा श्वास घेतला.

2 दिवसांनी फोन आला ,तो ऐकुन बाबांचा चेहरा पडला.कारण मुलाकडून नकार आला होता आणि कारण सांगितले लग्न पुढच्या वर्षी करायचे आहे.हे ऐकुन नेहा ला फार वाईट वाटले,तिला आई ने समजावलं कि हा जाऊ दे दुसरं बघू,हे एकुन् ती रडतच म्हणाली ,मि कुठे बघितला आई त्याला सांगना,आणि दुसरा काय बघू हा हा हक्क मुलांचा आहे आम्ही मुलींचा नाहीच .लहानपणापासुन तुम्ही माझं मन जपत आहे आणि लग्नाच्या बाबतीत माझं मन का नाही दिसत.ती लोक आली मला बघून गेली आणि निर्णय पण झाला .यात मि कुठे होती.यापुढे जर मला पाहायला आले तर हे सगड आठवून नकोस होईल ग् ,मी शोपिस् नाही आहे ग् जेव्हा म्हटलं तेव्हा कुणालाही दाखवलं .' नेहा बोलत होती तिच्या मनातल् आणि आई बाबा ऐकत होते.....

????योगिनी चौधरी .

(तिच मन) कसं वाटल ते सांगा.????????????

(मी आजपासून लिहायला सुरुवात करत आहे .भेटू या पुढे एका छान अश्या संकल्पना असलेल्या कथेतुन् )