तो सध्या काय करतो (भाग ०२)

Sometimes somewhere we are having a Crush on Someone but we didn't expressed it to that person. Still that memories are so special.

हातात चहाचा कप, बाहेर सूर्य मवळतीच्या दिशने झुकला होता, इतक्यात मोबाइल मध्ये एक Notification आल्याचा आवाज आला, काय मेसेज आला पाहण्यासाठी गौरी ने मोबाईल उघडून पहिला , "Gautam sent you a friend request " असं दिसतं होत, इतक्या वेळा विचार करून आपण न पाठवलेली request आपल्यालाच कशी आली असा विचार करत तिने confirm बटन वर क्लिक केलं, आणी लगेचच इनबॉक्स मध्ये एक मेसेज झळकला , " हॅलो, ओळखलं मी गौतम?? ; आपल्या शाळेच्या बॅचचं गेट-टूगेदर करायचं आहे " हळु-हळु मग त्यांच्या गप्पा होऊ लागल्या. 
गेट-टूगेदर चा दिवस आला, त्या दिवशी बऱ्याच जणांनी आप-आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत खुप साऱ्या गप्पा मारल्या, एरव्ही शाळेत शांत असणारे चेहरेपण आज खुप धम्माल करत एकमेकांची फिरकी घेत होते, किती बदललं होत गेल्या काही वर्षांत, प्रत्येकाचं वागणं बोलणं राहणीमान कमालीचा फरक जाणवत होता, शाळेची काकूबाई असणारी एखादी मुलगी आज जगाच्या बरोबरी ने पाऊल टाकत होती, तर एखादा बिनधास्त असणारा चेहरा आज अपेक्षा आणी जबाबदारीच्या ओझ्याने कुठेतरी हरवला होता, एक न अनेक उदाहरणे, या सगळ्याचा आनंद घेत दर वर्षी भेटण्याचा संकल्प करत सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला, पुढे काही दिवस मग ग्रुप च्या माध्यमातुन सगळेजण गप्पा-टप्पा मारत राहिले.
 
दिवसेंदिवस परिस्थिती, जबाबदारी, वेळ बरंच काही शिकवुन जातात, काही वेळेस उगाच धरून ठेवलेला अबोला, चुका मनात सलत रहातात, त्यापेक्षा मनाला आवडेल तसं वागणं आणी सगळ्यांना एकत्र बांधुन ठेवत आहे त्या दिवसाचा आनंद घेणं हेच आजच्या जगात गरजेचं नाही का? नात्याला दर वेळी नावं असलंच पाहीजे का!! काही नाती नावं न देता ही जपता येतील की?? जस गौरी गौतम ने जपलं होत, शाळेत कधीही न बोललेले दोघे जण आज छान मित्र झाले होते ???? . 

(समाप्त)

तर कशी वाटली गोष्ट, बऱ्याच जणांना ही आपलीच कथा असल्यासारखी वाटेल; कारण मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी अबोल नातं प्रत्येकाने जपलेल असतं. 
त्या नात्याला बोलकं करूयात हाच निरोप या कथेतुन तुमच्या पर्यंत पोहोचवायचा आहे 

कसा वाटला ब्लॉग नक्की कळवा, तुमच्या प्रतिक्रिया पुढील लिखाणासाठी प्रेरणा देतील.

© स्वप्नील घुगे

🎭 Series Post

View all