तो पाऊस क्रूर होता : भाग ३

पाऊस न आवडणार्‍या एका मुलीची कथा


"कुठली गुड न्यूज...??", समिधा आश्चर्यचकित होऊन तिच्या बाबांना विचारते.

"कायं अहो कसली गुड न्यूज..?? सार्थक तु तरी बोल काही..", समिधा ची आई एकदा तिच्या बाबांकडे आणि एकदा गळयात पडलेल्या सार्थकला विचारते.

"अगं तुम्ही दोघी मला जरा बोलू द्याल का?? मी पुढे बोलतोय पण तुम्ही दोघी एकावर एक प्रश्न विचारत बसला आहात मगं मी कशी सांगणार गुड न्यूज..?? ", समिधाचे बाबा एकदा समिधाकडे आणि एकदा त्यांच्या बायकोकडे पाहून बोलतात हे.

तशा त्या दोघी एकदम शांतच बसतात.. आणि त्या दोघी शांत बसलेल्या पाहून बाबा बोलायला सुरुवात करतात,

" तर गुड न्यूज अशी आहे की, आपल्या सार्थकला इंजिनिअरिंग पूर्ण व्हायच्या आधीच एका चांगल्या आणि मोठ्या कंपनीकडून नोकरीची ऑफर आली आहे.."


"कायं?? दादू खरचं...??", समिधा मोठ्याने ओरडते आणि सार्थकला विचारते तसा सार्थक डोळ्यांनी चं खुणावतो आणि समिधा उठून सार्थककडे धाव घेते.


" माझं गुणी बाळ गं ते.. ", असे म्हणून आई सार्थक च्या चेहर्‍यावरून मायेने हात फिरवते तर तेवढ्यात समिधा सार्थकचे गाल ओढते जोरात तसा सार्थक ओरडतो जोरात, "आई गं...", म्हणतं चं.

"ओहहह... माझ्या क्युट दादूला जॉब मिळाला आहे.. मज्जा आहे बाबा आता कोणाचीतरी...", असे म्हणून समिधा त्याचे गाल ओढत राहते.

इकडे आई तोपर्यंत देवापुढे दिवा लावून देवाचे आभार मानते आणि बाबांच्या हातामधील पेढ्यांचा बॉक्स देवाला दाखवून दिले सर्वात अगोदर सार्थकला पेढा भरवते आणि नंतर सगळ्यांना देते.


" अगं वेडाबाई माझे गाल ओढत बसली ना अजून तर तुझा वडापाव आणि जलेबी गार होऊन जाईल..", सार्थक थट्टा करत चं म्हणतो तशी समिधा वडापाव कडे धाव घेते आणि , "व्वा..!", म्हणून मिटक्या मारत एक घास घेते वडापावचा.

तसे तिच्याकडे पाहून सगळेच हसायला लागतात आणि ते देखील वडापाव खाऊ लागतात.

" कायं हो पण तुम्हाला कधी कळले?? सार्थकने फोन केला होता का तुम्हाला??", आई वडापाव खाता खाता चं बाबांना विचारते, तेव्हा बाबा म्हणतात,


" अगं नाही.. सार्थक पेढे, वडापाव आणि जलेबी घेऊन च दुकानात आला होता आपल्या आणि मला तिथे ही बातमी सांगितली त्याने मगं मीपण आलो लवकरच सेलिब्रेशन करण्यासाठी.. "


"अच्छा... खूप छान बातमी आहे हो खरचं... पोराच कौतुक करावं तेवढं कमी...", आई आनंदाने बोलत असते तेव्हा बाबांच्या चेहर्‍यावर ही समाधान आणि आनंद दिसतो.

" अगं हळू खा.…. कसं लहान मुलासारख सांडल आहे तु... आईला किती त्रास कपडे धुवायचा.. ", जलेबी आणि रबडी खाताना समिधा ड्रेस वर रबडी सांडते तेव्हा सार्थक तिला मस्करी करत म्हणतो.


" ए दादू तु गप्प बस.. रबडी किती आवडते माहित आहे ना तुला.. आणि डोन्ट वरी आईला धुवायचा त्रास नाही होणार... ", समिधा खात खात चं बोलते तेव्हा सार्थक म्हणतो,


" आईला त्रास नाही होणार म्हणजे...??"

"म्हणजे असं आहे ना दादू...", हे वाक्य बोलत च समिधा सार्थकला अंगणात घेऊन येते पावसात.


" अगं समू.. ", सार्थक समिधाला पुढे काही बोलणार इतक्यात समिधा चं त्याला म्हणते,


" दादू यापेक्षा बेटर सेलिब्रेशन कुठले असेल... जस्ट एंजॉय रेन... "

समिधा बरोबर सार्थक सुद्धा पावसाचा आनंद घेऊ लागतो आणि ते दोघे आई बाबांना ही पावसात घेऊन येतात.


सर्वजण आज पावसात सेलिब्रेशन करत होते आणि पावसाचा मनमुराद आनंद घेत होते, गात होते, नाचत होते.. आणि त्या क्षणाला मनसोक्तपणे जगत होते.

क्रमशः

पावसाचा मनमुराद आनंद घेणार्‍या या आनंदी कुटूंबात हा पाऊस कुठले वादळ घेऊन येणार होता याची त्यांना कल्पना सुद्धा नव्हती.

तुम्हाला जर कथा आवडत असेल तर लाईक करा आणि कमेंट्स मधून तुमचे अभिप्राय कळवा मला.