तो पाऊस क्रूर होता : भाग १

ही कथा आहे एका मुलीची जिचा पावसावर खूप तिरस्कार आहे पण तिच्या तिरस्काराचे कारण कायं आहे हे कथा वाचत रहाल तसे लक्षात येईल तुमच्या..


     टिप... टिप, असा आवाज करत ते टपोरे पावसाचे थेंब जमिनीवर बरसतं होते आणि खिडकीमध्ये बसून समिधा त्या कोसळणाऱ्या पावसाकडे एकटक पाहतं होती. पावसामुळे तिच्या घराबाहेर असलेल्या रस्त्यावर एक छोटेसे तळे साचले होते. अचानक कुठूनतरी एक छोटीशी कागदाची होडी त्या तळ्यात वाहतं वाहतं आली आणि त्या होडीकडे बघून इतका वेळ त्या पावसाकडे एकटक बघणारी समिधा अस्वस्थ झाली खूप. ती तशीचं उठली सरळ बाहेर आली आणि त्या छोट्याश्या तळ्यात वाहतं असलेली होडी हातातं घेऊन तिला मोडायला सुरूवात केली. एरवी भिजणे टाळणारी, चिखलाचा तिरस्कार करणारी ती आजं मात्र तिला याचा विसर पडला होता बहुतेक. तिने ती होडी हातामध्ये घेतली. आधीचं तो होडीचा कागद पूर्ण भिजलेला त्यामुळे त्या होडीला उद्ध्वस्त करायला समिधाला एवढा वेळ नाही लागला, तरीही ती अजून त्याची चिरफाड करत चं राहिली तिच्या मनाचे पूर्ण समाधान होईपर्यंत. आणि मगं तिचे मन शांत झाले तशी ती घरात आली आणि आपण पावसातं भिजलो आहोत, हे तिच्या लक्षात आले, तशी ती ताडकन बाथरूममध्ये गेली आणि पुन्हा अंघोळ करून तिने कपडे बदलले आणि पावसात भिजलेली ते कपडे तिने सरळ कचरापेटीत टाकले ते आणि एक तिरपा कटाक्ष टाकून ती पुन्हा खिडकीत येऊन बसली. अवघी २२ वर्षाची समिधा, ज्या वयात मुली पावसात कोणाबरोबर तरी भिजण्याची, स्वप्न रंगवत असतात, त्या वयात ही त्या पावसाचा इतका तिरस्कार करत होती. पाऊस न आवडणे एकवेळ समजू शकते, परंतु या पावसाचा एवढा तिरस्कार का वाटायचा समिधाला??
हा पाऊस एवढा ही नकोसा वाटे तिला की, त्या पावसाच्या एका थेंबाचा स्पर्श सुद्धा तिला त्रास देत असे.
सर्वांसारखे पावसातं भिजणे तर दूरच, तिला तो पाऊस बघून आनंद नाही व्हायचा उलट त्या पावसाची चिड यायची. तिचे हे मगाशीपासून चे वागणे स्वयंपाक घरामधून समिधाशी आई पाहंत होती. समिधाच्या आईला नेहमी वाटायचे की, तिनेही इतर मुलींसारखे पावसातं बागडावे, मुक्त होऊन भिजावे, पण तिची आई तिला हे मनातून वाटले तरी ही समिधाशी या पावसाबद्दल बोलू शकत नव्हती, त्याला कारण ही तो पाऊस चं होता. त्या एका पावसाने समिधा आणि तिच्या कुटुंबाचे पूर्ण आयुष्य चं बदलून टाकलेले. तो एक पाऊस समिधाला पावसाचा तिरस्कार करायचे कारण देऊन गेला. समिधाला अशी खिडकीत एकटी बसलेली पाहून समिधाच्या आईला तो पाऊस आठवला.

  क्रमशः

समिधा च्या आयुष्यात नेमके कायं घडले असेल की तिला त्या पावसाचा इतका तिरस्कार वाटतो हे पुढील भागात कळेल..