अलक, तो आणि ती

To Ani Ti


अलक

तो आणि ती

जेव्हा नवऱ्याची आई आजारी पडते तेव्हा ती बायको म्हणून एकदम खंबीरपणे भावूक झालेल्या त्याला ती साथ देत असते, त्याच्या सोबत आधार बनून उभी असते... तिला कुठून येते हे बळ याचे त्याला नवल वाटते... ती त्याचे सगळे दुःख, चिंता ,चीड चीड लिलया पेलवत असते... ती खरी संगिनी असते

जेव्हा तिची आई आजारी पडते तेव्हा अचानक खंबीर असलेली ती कोलमडून पडते.. तिचे तिला सावरणे अवघड होऊन जाते... तिचे घर अस्ता व्यस्त होते.. तिचे कोणत्याच कामात मन लागत नाही तेव्हा तिचा कठोर हृदयाचा नवरा तिला सावरत असतो, तोडका मोडका का असेना ,मीठ कमी जास्त का होईना पण तो स्वयंपाक करत असतो... तिला तो आधार देत असतो.. तिची चिंता, दुःख, चिडचिड आता तोच सावरून घेत असतो... तिच्या भावना तो लिलया समजून तिचा नवरा तिचा प्रियकर होत असतो..

तो खरा नवरा असतो ,तीच खरी संगिनी असते जे एकमेकांना सावरून घेत संकटे बोचरी करत असतात..