To ani ti...1

Curiosity, attraction, love and then breakup... End of the story! Or is it really?? Enjoy the story after everything ends or just it seems like it!!

जेवढे लोक तेवढी नाती, जेवढी नाती तेवढी नावं...
 तीच सोडून गेल्यावर खूप वाईट वेळ सुरू होती. पण आज एका वर्षांनंतर खूप हलकं वाटतंय, मनावर कोणतं ओझं नसल्यासारखं फील करत होतो... काही दिवसांपासून तर नो anxiety, नो panic attack, खूप फ्री वाटत होतं.
     आज एका फ्रेंडच्या लग्नात सहज बोलताना एक गोष्ट घडली, मी काहीतरी बोलत होतो, इतक्यात समोर “तिला” बघितलं आणि 1-2 मिनिट एकदमच आवाज बंद झाला. जसं कोणीतरी गळ्याभोवती फासच लावला... हलक झालेलं मन पुन्हा भरून आलं. 
      माझी एक सवय आहे... पळून जायची ... लोकांपासून.. परिस्थितीपासून.. कधी कधी स्वतःपासून सुद्धा !
      मी तिथून बाहेर जाणारच तेवढ्यात तिने मला बघितलं... ती माझ्याकडे बघताच मी तिथून नजर चोरून बाहेर पडलो... जसं काही माझी कोणतीतरी चोरी सापडल्यासारखी... 
ती पण माझ्या मागे आणि आणि तिने हाक मारली... 
मी थांबलो आणि तिच्याकडे बघतच राहिलो. ती खुपवेळ काहीतरी बोलत होती, बडबड करत होती आणि मी नुसता बघत होतो.. मला खरंच वाटत नव्हत की आम्ही परत भेटतोय... आणि ती ...
     
ती:- hiii, कसा आहेस?
मी:- ठीक... तू ?
ती:- मस्त 
    मग, कुठं आहेस? काय सुरू आहे ?
मी:- जॉब.. जॉब सुरू आहे. मुंबई मध्ये 
ती:- भारी .. शेवटी झालास इंजिनीअर..  गुड, गुड 
( मी खूप डिस्टर्ब होतो आणि ती बोलायचा प्रयत्न करत होती.)
मी:- तुझ काय सुरू आहे ?
ती:- कॉलेज झालं. आता कथ्थक सुरू आहे. 
मी:- गुड
ती:- all okay ?
मी:- हा .. हो 
ती:- मग असा बाहेर का आलास ?
मी:- आलो असच
ती:- लग्नाची वेळ झाली.. 
मी:- सोडना, मला आधीच .. 
ती:- हो हो माहितीये लग्न वगैरे बोअरिंग वाटतं... 
मी:- हा 
( इतक्यात कोणीतरी तिला हाक मारतं आणि ती त्याच्यासोबत जाताना )
ती:- आले .... चल ना तू पण 
मी:- ... आलो 
ती जाताना मी तिलाच बघत होतो. तिच्यासोबत कोणीतरी होतं, आणि ती ... खुश होती.
तिच्या कडे बघत पावलं टाकताना असं वाटलं .. ही सगळच विसरली असेल का ? आणि टेंशन आलं...
आम्ही आमच्यासाठी perfect होतो. आमचं प्रेम पण... आज पण आहे... पण काहीसं तुटक तुटक.. काहीसं कमी स्वार्थी.. 
तिचं नाव आता दुसर्‍याच सोबत ऐकायला येतं. 
आता ती दुसर्‍याकोणासोबत तरी खुश असते. 

आणि मी ... 
मी आज पण इथेच आहे !
काही प्रश्न घेऊन .... 

जर त्यावेळी हात हातातून सुटला नसता तर ?
जर आमचे रस्ते वेगळे झाले नसते तर ? 
जर आठवण आल्या क्षणी बोललो असतो I miss u ..  तर ?
आता आठवण येऊन त्रास होवू नये म्हणून हजार गोष्टी करतो पण तिला का विसरत नाही ? 

आता ती सोबत नाही
बहुतेक ती तिच्या मार्गाने पुढे निघून गेली 
पण आता मीसुद्धा पुढं जाऊ शकतो.. माझ्या रस्त्यानं 
तिच्या शिवाय मी पुढं जाऊ शकतो ?

🎭 Series Post

View all