तिन्ही सांजा

Poem On Evening Time
कविता

तिन्ही सांजा


आकाशाचा रंग बदलतो
तिन्ही सांजेच्या वेळी
केशर कुंकू लेऊन येते
दिशा पश्चिमी संध्याकाळी

अशा या शांत समयी
गुढ शांतता मनी वसावी
विचारांच्या काहूरांना
वाट मोकळी ती द्यावी

मनात असता मनात नसता
मन वेगाने हुरहुरावे
इकडून तिकडे पळताना
भावनांचे ते ढग विरावे

आकाशातील ढगांमध्येही
असेच होत असावे
कोठून येतात कुठे जातात
कुणास ना ते ठावे

अशांत अस्वस्थ मी असा
पाहून विखुरलेले कुंकू तिच्या भाळी
चंद्र सुद्धा दाहक भासतो
आयुष्याच्या संध्याकाळी


छाया बर्वे (राऊत)
8390086917