तिसरा डोळा..

टेलिस्कोप महिती...


तिसरा डोळा...

पुराणांत तिसरा डोळा म्हणजे... प्रलय, राग, संकट ई... चे प्रतिक मात्र येथे आपण तिसरा डोळा म्हणजे ज्ञान, कुतूहल, माहिती यांचे प्रतिक म्हणुन घेऊ....

आपल्याला निसर्गाने दोन डोळे दिले आहेत... या मार्फत बरंच निरिक्षण करून आपण आपल्या ज्ञानात वृद्धि करत असतो.. याच ज्ञानामुळे आज आपण तिसरा डोळा निर्माण केला आहे... तो तिसरा डोळा म्हणजे दुर्बीण किंव्हा टेलिस्कोप होय....या टेलिस्कोप मुळेच आज आपल्याला विश्वाचा पसारा किती आहे ते समजायला मदत होते...

आपले विश्व अथांग आहे. आपले विश्व इतके अथांग आहे की, आज पर्यंत आपल्याला त्यांतील फक्त तीन चार टक्केच माहिती आहे असं काही शास्त्रज्ञांच मत आहे... यावरूनच आपल्या विश्वाचा पसारा किती असेल याचा अंदाज येऊ शकतो.. सध्या माणसाने तंत्रज्ञान क्षेत्रात फ़ार प्रगती केली आहे... आणि इतकी प्रगती करून सुद्दा आपल्याला विश्वाची फक्त तीन चार टक्केच माहिती!... म्हणजेच हे विश्व अफाट आहे..याचा.या अफाट विश्वाचा अभ्यास करायचा असेल तर माणसाला तिसऱ्या डोळ्याचाच आधार घ्यावा लागेल....


जेव्हापासून तिसरा डोळा म्हणजे टेलिस्कोपचा शोध लागल्या पासुन अवकाश संशोधन कामाला फ़ार गती मिळाली. तसं त्या आधी देखिल गणितीय संकल्पना द्वारे अवकाशाचा अभ्यास चालुच होता. पण दुर्बिणीमुळे त्याला नवी दिशा मिळाली असं म्हणावे लागेल. कारण यामुळे ग्रह तारे यांचे जवळुन निरिक्षण करता येऊ लागले म्हणून शास्त्रज्ञांचा उत्साह वाढला आणि अवकाश शंशोधनाला गती मिळाली.. यातुन अनेक ग्रह, उपग्रह, दिर्घिका, धूमकेतू.. ई. शोध लागत गेला.. दुर्बीणक्षेत्रात प्रगती झाल्यानंतर अवकाशात देखिल दुर्बिणी सोडण्यात आल्या.. आणि त्या दुर्बीनीच्या सहाय्याने विश्वाची अनेक रहस्य उलगडली...


आज पर्यत माणसाने अनेक आकाशस्थ दुर्बिणी पाठवल्या त्यांत प्रामुख्याने हबल व स्पिट्झर यांचा उल्लेख करावा लागेल... सध्या यांचा संभवित कार्यकाल संपलेला असला तरी यांचे काम अविरतपणे सुरु आहे...यातच आता भर पडणार आहे ती अतिशय अत्याधुनिक व महाकाय जेम्स वेब या दुर्बीनीची...

जेम्स वेब ही अतिशय अत्याधुनिक दुर्बीण म्हणजे एक प्रकारची वेधशाळाच आहे. ही दुर्बीण हबल आणि स्पिटझर या टेलिस्कोपचा खऱ्या अर्थाने वारसदार ठरणार आहे...या टेलिस्कोपचे काम अंतिम टप्यात असुन शनिवार दिनांक १८ डिसेंबर रोजी ती अवकाशात सोडली जाईल. यात चार अतिरिक्त उपकरणे आहेत त्यांत अवरक्त कॅमेरा ,मध्ये अवरक्त उपकरण, निअर इन्फ्रारेड इमेजर, स्लीटलेस स्पेक्टोग्राफ ही होय...


जेम्स वेब दुर्बिणीच्या आरश्याचा व्यास २१ .३ फूट इतका आहे.. आणि या टेलिस्कोपचे पृथ्वीपासूनचे अंतर १५ लाख किलोमीटर इतके असेल. हिचा कार्यकाल ५ ते १० वर्षे इतका असला तरी... या पूर्वीच्या आकाशस्थ दुर्बीनीचा इतिहास पाहता हा कार्यकाल मोठा होईल यांत शंका नाही. या टेलिस्कोपला पाच स्तरांचे सूर्य संरक्षक कवच लावले आहे.. त्यामुळे तिचे वातावरण नियंत्रित राहुन ती आपले काम व्यवस्थित करत राहील..


जेम्स वेब आज पर्यतची सगळ्यात मोठी आकाशस्थ दुर्बीण असल्याने ती अवकाशात सोडताना काही अडचणीत येणार आहेत.. यांतील पाहिली अडचण म्हणजे या दुर्बीनीचा व्यास २१.३ फूट आहे आणि सध्या उपलब्ध असलेल्या एरियन अग्निबाणाची २१ फूट व्यासाची दुर्बीण अवकाशात सोडण्याची क्षमता नाही. त्यांवर उपाय म्हणून यातील काही भागांची घडी करण्यात आली आहे. अवकाशात गेल्यानंतर ही घडी उघडुन त्याचे वेगवेगळे भाग सुटे करणे हे एक मोठ आव्हान असेल.. ही प्रक्रिया व्यवस्थित पार पाडली तरच या टेलिस्कोपचे काम सुरळीत चालेल अथवा हा इतका मोठा प्रकल्प फसू शकतो..

सुरवातीला या टेलिस्कोपचे नावं नेक्स्ट जनरेशन टेलिस्कोप असे ठेवण्यात आले होते... मात्र नंतर नासाचे माजी प्रमुख जेम्स वेब यांचे नावं देण्यात आले. त्यामुळे आकाशस्थ टेलिस्कोपचे एखाद्या शास्त्रज्ञाचे नाव द्यायची परंपरा कायम राहिली..सध्या अवकाशात माणसाचे हबल व स्पिटझर हे दोन प्रमुख कृत्रिम डोळे असले तरी तिसऱ्या डोळ्याच्या स्वरूपात जेम्स वेब ही काही दिवसांतच कार्यरत होईल.त्यामुळे विश्वातील अंधारातील अंधूक घटकांचीही माहिती होईल.. त्यामुळे विश्वनिर्मिती सारखी अनेक कोडी सोडवायला मदत होईल... त्यामुळे १८ डिसेंबर रोजी फ्रेंच गयाना येथून अवकाशात झेपावणारी जेम्स वेब हिचे यशस्वी प्रक्षेपण होऊन तीचे सर्व भाग नियोजित प्रक्रिये प्रमाणे सुटे होऊन तीचा कार्यकाल यशस्वी पार पडु दे अशी आशा करूया!
- चंद्रकांत घाटाळ
(संचालक - अनुजा अवकाश निरिक्षण केंद्र कासा )