तिरंगी डोसा..

आरोग्यास लाभदायक.


साहित्य:- दोन वाट्या तांदूळ , एक वाटी उडीद डाळ ,एक चमचा मेथी

गुलाबी मिश्रणासाठी लागणारे साहित्य: अर्धे बीट, हिरवी मिरची , अद्रक एक सेंटीमीटर , मीठ.

हिरवे मिश्रण : पाच-सहा पालकाची पाने , एक मिरची , मीठ आणि जिरे.

कृती : सकाळी दोन वाट्या तांदूळ व एक वाटी उडीद डाळ वेगवेगळे भिजत घालावे. उडदाच्या डाळीत मेथीचे दाणे घालावे. पाच-सहा तासांनी मिक्सरमध्ये वेगवेगळे वाटून एका मोठ्या पातेल्यात दोन्ही पीठ एकत्र करावीत. चवीपुरते मीठ व एक चमचा तेल टाकून उबदार जागेत रात्रभर झाकून ठेवावे. सकाळी नाश्त्यासाठी डोशाचे पीठ तयार होईल
ते तीन पातेल्यात विभागून घ्यावे.

गुलाबी मिश्रण:
गुलाबी मिश्रणासाठी वापरलेले सर्व साहित्य मिक्सरच्या चटणी जारमध्ये बारीक करून घ्यावे. गाळणीने गाळून त्यातील तीन चमचे रस डोशाच्या पिठात टाकावा.

हिरवे मिश्रण:
हिरव्या मिश्रणासाठी वापरलेले सर्व साहित्य मिक्सरच्या जारमध्ये टाकून ग्राइंड करावे. गाळून रस काढावा व डोशाच्या दुसऱ्या पिठाच्या पातेल्यात टाकावे.

तिरंगी डोसा….

नॉनस्टिक फ्राय पॅन तापल्यानंतर गॅसची ज्योत मंद करावी. अर्धा कापलेल्या कांद्याने तेल लावावे. एक डाव हिरव्या रंगाचे पीठ गोलाकार पसरावे मग लगेच त्या भोवती पांढऱ्या रंगाचे व बॉर्डरला गुलाबी रंगाचे पीठ पसरावे एकात एक तीन रंगाचे गोल दिसतील. कडेने तेल सोडावे डोसा उलटून मंद आचेवर भाजून घ्यावा सर्व्ह करताना चाकूने अर्धा कापून त्यावर तिळाची चटणी पसरावी व गोल रोल करून लवंगाने टोचून द्यावा.

हेल्दी डोसा खाण्यासाठी आणि आरोग्यासाठीही उपयुक्त ठरतो.. नक्की ट्राय करा..