आयुष्य

Zindagi
       आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे इतरांना जिंकायला मदत करणं. त्यासाठी वेळप्रसंगी आपला वेग कमी करावा लागतो किंवा अगदी शर्यतच बदलावी. दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही. मुलं जरा करती सवरती झाली की सारं कसं आनंदानं भरून जाईल, असं आपल्याला वाटत असतं.
आपला नवरा  जरा नीट वागायला लागला की…
आपल्या दाराशी एक गाडी आली कि,

आपलं आयुष्य कसं सुखानं भरून जाईल, असं आपण बायका सतत स्वतःशीच घोकत असतो.

आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतच. ती स्विकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी राहायचा निश्‍चय करायचा हेच बरं नाही का?
जगायला – खरोखरीच्या जगण्याला – अद्याप सुरुवात व्हायचीये , असंच बराच काळ वाटत राहतं .
पण, मध्ये बरेच अडथळे असतात. काही आश्‍वासनं पाळायची असतात, कोणाला वेळ द्यायचा असतो, काही ऋण फेडायचं असतं….
आणि अगदी शेवटी कळतं, की ते अडथळे म्हणजेच जीवन होतं.
या दृष्टिकोनातून पाहिलं की कळतं,
आनंदाकडे जाणारा कोणताही मार्ग नाही.
आनंद हाच एक महामार्ग आहे.
म्हणून प्रत्येक क्षण साजरा करा . एकदाचा हा टप्पा पार पडला की, सारं काही मनासारखं होईल, अशी आपणच आपली समजूत घातलेली असते. पण, असं काही ठरवण्यापूर्वी आनंदी होण्याचं ठरवूया.....नमस्कार... सौ.. सोनल  गुरुनाथ शिंदे... ( देवरुख - रत्नागिरी )