Jan 23, 2022
सामाजिक

तिला विधवा म्हणू नका

Read Later
तिला विधवा म्हणू नका

काॅलेजचा पहिलाच दिवस संकेत गडबडीत लवकरच काॅलेजला पोहोचला.. काॅलेजमध्ये आल्यावर तो त्यांच्या नेहमीच्या कट्ट्यावर जाऊन बसला.. हळूहळू एक एक करत सगळे मित्र कट्ट्यावर जमा झाले.. सगळ्यांच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या.. सुट्टीत कोण काय काय मजा केलं याची जणू मैफिलच जमली होती..

पण त्या गर्दीत संकेत मात्र गेटकडेच टक लावून पाहत बसला होता.. त्याच कुणाच्याही बोलण्याकडे लक्ष नव्हतं.. एक मित्र बोलता बोलता संकेतकडे बघितला तर तो गेटकडेच पाहत होता..

"अरे संक्या, आम्ही एवढं बडबडतोय तुझं लक्ष कुठेय.." एक मित्र.

"अरे तुला माहीत नाही काय.. दोन वर्ष झाले तरी हा नुसता बघतच बसतो.." दुसरा मित्र.

"ए संक्या बास झालं ह आता.. प्रपोज करून टाक बाबा एकदाच आणि बनव वहिनी आमची.." पहिला मित्र.

"तितकं सोपं आहे का??" संकेत वैतागून..

"अरे नुसता प्रपोज करायचं.. झालं.." मित्र

"झालं.. एवढंच.." संकेत..

"मग.. तुला कोण नाही म्हणणार?? एवढा हुशार आहेस.. दिसायला हॅण्डसम आहेस.. मुलींना आणखी काय हवं असतं.." मित्र.

"अरे पण माझ्याकडे पैसा नाही.. आईबाबा आणि इतर नातेवाईक सुध्दा नाहीत.. मी अनाथ आहे.. मग ती माझ्याबरोबर येईल.." संकेत.

"मग तू नुसता प्रपोज कर.. टाईमपास रे.. लग्न झालं तर झालं.. नाहीतर नाही.." मित्र.

"मला टाईमपास नको आहे.. कायमची साथ हवी आहे.." संकेत

"बरं बाबा.. मग विचारून तर बघ.. तिची मैत्रीण तुझी मानलेली बहिण आहे ना.. मग सोपं होईल तुला.. बघ प्रयत्न करून.. नाहीतर तू असा नुसताच बघत बसलास तर एक दिवस तिच लग्न होईल.." मित्र

"बरं बघतो.." संकेत असे म्हटला इतक्यात तिची एंट्री झाली.. ती म्हणजे सायली.. दिसायला एकदम सुंदर, गोरी पान, डोळे काळे निळे.. केस मऊ मुलायम.. अगदी परीसारखीच.. कुणीही तिच्या प्रेमात पडेल अशीच होती ती.. मग संकेत कसा सुटेल त्यातून.. तिच्यासोबत तिची बेस्ट फ्रेण्ड मेघना जी संकेतची मानलेली बहिण होती..

"ए मेघना.." संकेत हाक मारतो तसेच त्या दोघी थांबतात..

"काय रे.." मेघना

"काही नाही.. मावशी (मेघनाची आई) खूप दिवस झाले भेटल्या नाहीत म्हणून विचारलो.." संकेत..

"अरे हो तिची तब्बेत बिघडली होती.. एक दोन दिवसात येऊन जाईल म्हणत होती.." मेघना

"कोण ग हा.. तुमचा कोणी नातेवाईक आहे का??" सायली

"अगं हा माझा मानलेला भाऊ संकेत.. आणि संकेत ही माझी मैत्रीण सायली.." मेघनाने एकमेकांची ओळख करून दिली.. आता काय ओळख झाली म्हणजे झालं.. रोज त्यांच बोलणं होऊ लागलं.. रोज काॅलेजमध्ये भेटी होऊ लागल्या आणि बघता बघता ते दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडले त्यांचे त्यांनाच कळले नाही..

दिवसामागून दिवस गेले.. काॅलेजचे शेवटचे वर्ष संपत आले.. मग काय दोघांचेही मन नाराज झाले.. आता भेटता येईल की नाही.. फायनल एक्झामसाठी सुट्टी चालू झाली आणि सगळंच काही क्षणासाठी थांबलं..

एक दिवस संकेत मेघना कडून सायलीचा नंबर घेतो.. मग काय फोनवरून मेसेज बोलणे चालू झाले.. दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते.. फोन आणि अभ्यास दोन्ही अगदी व्यवस्थित रूटीनमध्ये चालू होते..

परिक्षा संपल्या.. थोड्या दिवसांनी निकाल पण लागला.. आणि संकेतला एक छान नोकरी पण मिळाली.. सगळं एकामागून एक पटापट घडत गेलं.. त्याला तर आता स्वर्गसुखच वाटतं होते.. तो आता सायलीला प्रपोज करणार होता.. कारण त्यालाही माहित होते की सायली पण त्याच्यावर प्रेम करत होती..

अखेर तो दिवस उजाडला.. सायलीला आज संकेत प्रपोज करणार होता.. त्याने तिला एका ठिकाणी भेटायला बोलावलं.. सायली मस्त पिंक कलरचा पंजाबी ड्रेस घालून आली होती.. त्या ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत होती.. संकेत तर तिच्याकडेच पहात बसला.. त्याला काय बोलावे तेच कळेना..

"हाय.. बोल का बोलावलं आहेस तू मला.." सायली..


"सायली तू राग मानू नकोस.. तुझ्या मनात काय आहे ते तू सांग.. पण मी आता माझ्या मनातल सांगणार आहे.. मी काॅलेजच्या अगदी पहिल्या दिवसापासून तुझ्या प्रेमात आहे.. पण हे आज तुला सांगत आहे.. प्लीज माझ्या स्वप्नातली परी बनून माझ्या आयुष्यात येऊन माझे आयुष्य सुंदर बनवशील.. मी एका जीवनसाथीच्या रूपात तुला पाहतो.. तर तू माझ्या आयुष्यात येऊन माझे जीवन पूर्णत्वास नेशील.. तू मला आयुष्यभरासाठी साथ देशील.." असे म्हणत संकेत तिच्या समोर गुडघे टेकून बसतो आणि हातात एक रिंग घेऊन हात पुढे करतो..

सायली पण त्याच्या हातात हात देते आणि संकेत तिच्या बोटात रिंग घालतो.. इथपर्यंत सगळं ठीक होत.. पण आता पुढे काय??

तर दोघांनीही त्यांच्या घरच्यांना मनवले.. घरचे पण खूप समजूतदार होते.. त्यामुळे त्यांनीही जास्त आढेवेढे न घेता लग्नाला मान्यता दिली.. मग काय? लग्न अगदी व्यवस्थित पार पडले.. दोघेही एकदम आनंदात होते.. त्यांचा सुखाचा संसार सुरू झाला..

दिवसामागून दिवस जात होते.. आता त्यांच्या वंशवेलीला एक छान फुलं आले होते.. अवनी ही संकेत आणि सायलीची मुलगी.. दोघांनी मिळून खूप स्वप्न पाहिली होती.. अवनी हळूहळू वाढत होती..

पण त्यांच्या त्या सुखी संसाराला जणू कोणाची दृष्टच लागली.. एक दिवस संकेतला थोडी चक्कर आली.. पित्ताने असेल म्हणून त्याने त्याकडे दुर्लक्ष केले.. आणखी काही दिवसांनी तो चक्कर येऊन खाली पडला.. मग त्याला दवाखान्यात नेण्यात आले.. तिथे सगळे टेस्ट झाल्यावर समजले की त्याला ट्युमर झाला आहे.. आणि शेवटची स्टेप सुरू आहे..

त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.. सायली तर सारखी रडतच होती.. संकेत पण रडला.. आणि कुटुंबासाठी लगेच सावरला.. तो सायलीला जवळ बोलावून तिला म्हणाला, "सायली, तू दुसरे लग्न कर.."

"मी दुसरे लग्न अजिबात करणार नाही.. प्रेम केलंय तुझ्यावर.. तुला सोडून मी इतर कोणाचा विचारही करणार नाही.." सायली

"अगं आयुष्यात कुणाचा तरी आधार हवाच ग.." संकेत

"तूच म्हणतोस ना.. की तुझं तुला कुणाच्या आधाराशिवाय जगता यायला हव म्हणून.." सायली

"तू ऐकणार नाहीस.." संकेत

सायली मानेनेच नकार देते.. मग संकेत घरातील सर्वांना आणि सायलीला पण सांगतो.. "मी गेल्यावर हिच्या अंगावरील एकही दागिणा काढायचा नाही.. अगदी मंगळसुत्र सुध्दा.. ही माझी सौभाग्यवती होती आणि कायम रहाणारच.. तिला दागिणे घालण्याची हौस आहे.. आणि नवरा मेला म्हणून तिने दागिणे घालू नये हे मला पटत नाही.. तिला जी हौसमौज करायची आहे ती करू द्या.. आनंदात राहू द्या.. तिला विधवा म्हणू नका.. तिच्यावर कोणतेही बंधन घालू नका.. सणवार, लग्नसमारंभ सगळ्या ठिकाणी मोकळेपणाने राहू द्या.. हळदी कुंकू, देवाची पूजा सगळं काही करू द्या.. हीच माझी शेवटची इच्छा आहे.. कराल ना पूर्ण.." संकेत

सगळ्यांनी होकार दिला.. आणि सायली संकेत गेल्यावर तो होता त्याप्रमाणेच राहू लागली.. सणासुदीला सुध्दा ती नटूनथटून देवाची पूजा करू लागली.. काॅलनीतले सगळे लोकं तिचा स्विकार करतात.. तिला सगळ्या कार्यक्रमाला, लग्न समारंभला बोलावतात.. तिला विधवा म्हणून कोणी हिणवत नाही.. आणि हा एक नवा बदल घडून आला..

ही एक सत्य कथा आहे.. माझी सखी जयश्री खेडकर हिच्या ओळखीतली आहे.. तर खरंच असा बदल जर प्रत्येकाने स्वतःपासून केला तर समाज सुधारायला वेळ लागणार नाही..
धन्यवाद 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..