तिला काय हवे कधी कळतच नाही....

प्रत्येक स्त्रीला काय हवे असते.... ते या कथेतून सांगण्याचा प्रयत्न केलाय

आज बऱ्याच वर्षांनी सर्व कॉलेजचे मित्र एकत्र जमले होते... बऱ्याच गप्पा रंगल्या होत्या... कोण कोण काय करते? कोणी बिझनेस करत होते,तर कॊणी नोकरी... कॊणी वडीलोपार्जीत व्यवसाय... सगळीकडच्या गप्पा झाल्या.. कॉलेजचे जुने दिवस आठवून एकमेकांना चिडवून झाले.. काही जणांचे प्रेम यशस्वी झाले तर काहींचे अपयशी... फिरून फिरून विषय बायको ह्या मुद्द्यावर आला... आणि सर्वांचे एकच मत पडले... लव्ह असो की अरेंज पण साला तिला काय हवं कधी कळतच नाही रे.. कसे पण वागा कायम कटकट एक जण असे बोलला आणि सगळ्यांनी त्याची री ओढली... आणि सहमती दाखवली...

खरच यार, सगळ्याच बायका सारख्याच नाय लेकाच्या... कधी हसतात, कधी रागवतात, कधी रडतात.. साला कस वागायचं रे आपण... सगळे 40-42 या वयात होते त्यामुळे लग्न अनुभव हा १०-१५ वर्षे या गटात होता प्रत्येकाचा... एवढी वर्ष झाली वकीली करतोय मी पण साली बायको नावाची केस काय मी सोडवू शकलो नाही...एक वकील हसत हसत बोलला.. प्रत्येक जण आपल्या पेशाला धरून बायकोची किंबुहना सर्व स्ञी वर्गाची खिल्ली उडवत होता... अवि मात्र लांबून सर्व ऐकत होता.. प्रत्येक जण थोड्या फार नशेत होता कॊणी जास्त तर कॊणी कमी... ए अव्या बोल कि एक आवाज आला.. तू का गप्प राहिला... साला बायकोने दम दिलाय की काय..?? परत एक जोरात हशा पिकला...

अवि शांतपणे हसला, म्हणाला दम नाही रे बाबा.. ऐकतोय तुमची कहाणी... माझी काही वेगळी नाही पण तरीही काय बोलू रे... आपण समजतो तितक्या काही बावळट नसतात रे या बायका... आपणच समजून घ्यायला कमी पडतो त्यांना... म्हणतात ना "स्त्री मन समजले ज्यास... स्वर्गसुख लाभले त्यास...!!"

ए अव्या तू काय कविता वगैरे करतो की काय?? मज्जा आहे मग् तुझ्या बायकोची... नाहीतर ह्या बायकांना असल सेंटीमेन्टल लय आवडत बघ...विकी बोलला... परत जोरात हशा... ए पेठ भर अजून आपले कवी रंगात आलेत... हे ऐकून अवि म्हणाला...मी नाही घेत.. नको.. ए बायकोने दम दिलाय का एवढा... ती कुठे आहे इथे घे की... एवढा नाचतोस तीच्या तालावर... परत विनोद करत एकमेकांना टाळ्या देत सर्व अविभोवती गोळा झाले...

अविचा चेहरा पडला, डोळे भरून आले.. आणि एकदम पिनड्रॉप सायलेंन्स झाला... ए अव्या काय झालं? जास्त बोललो काय आम्ही? ए सॉरी यार...

अवि जोरात ओरडला, हो आपण जास्तच बोलतो...प्रत्येक तिला मग ती बायको असो, आई असो, बहिण असो नाहीतर मुलगी... आपण नेहमीच जास्त बोलतो, तिच्या मनाचा विचार न करता, तिला कमी लेखतो, तुच्छ मानतो...

तिला काय हवे? याचा साधा विचार करत नाही आपण... एक आई म्हणून ती आपल्याला घडवते, आपल्याला वाढवते, आपल्यासाठी अनेक खस्ता खाते आणि लहानाचे मोठे करत असते.... आपण मोठे झाल्यावर आईची अक्कल काढतो, पण आपल्याला हे बोलायला मोठे करणारी आई असते, हे मात्र आपण विसरून जातो... आपल्या आईला नेहमीच आपल्या कडून आपुलकीचे शब्द हवे असतात,डोळ्यात तिच्या विषयी असलेले आदरयुक्त प्रेम हवे असते....

एक बहीण म्हणून नेहमीच ती आपली काळजी घेत असते, ताई असेल तर आई सारखा जीव आेवाळणारी असते तिला पण प्रेमाचे दोन शब्द हवे असतात अन कधी काही वाटलंच तर हा भाऊ आहे हा आधार हवा असतो...

मुलीच म्हणाल तर तिच्या साठी हिरो असतो आपण, हक्काने हट्ट करते ती...ते पूर्ण करणारा सुपर हिरो म्हणजे बाबा असतो तीच्यासाठी... प्रत्येक बाबा आपल्या लेकीसाठी कल्पवॄक्ष असतो...

आणि आता राहिली बायको... तिचे म्हणाल तर काय हो... नेहमीच आपल्या साठी चेष्टेचा विषय असते ती.. आपण तिला सायको म्हणतो, सेंटीमेन्टल म्हणतो... पण खरंच तिच्यामुळे तर आपल्या आयुष्याला अर्थ असतो... तिच्या शिवाय आयुष्याची कल्पना करून बघा... एका क्षणी तीचं घर,तिची माणसे सोडून ती आपल्याकडे येते, आपल्या घराला आपले मानते,आपले आई-बाबा, बहीण- भाऊ सर्वांना ती आपले मानते... पूर्ण दिवस सतत दुसऱ्यांचा विचार करते... आपण तिच्यासाठी काय करतो? नुसते साडी, गिफ्ट, पैसे नको असतात तिला... तिला तीचं मन जपणारा साथीदार हवा असतो, तिला प्रेमाचे,कौतुकाचे दोन शब्द हवे असतात... किती करतेस? दमली असशील ना? असे तिचा हात हातात घेऊन बोलुन तर बघा... परत नव्या जोमाने ती उभी राहते तुमच्याचसाठी... तीचं अस्तित्व म्हणजे तीचं माहेर असते...त्याची टिंगल न करता कौतुक करा, बघा कशी हसेल ती... तीचं आयुष्य आपण असतो अशा तिच्यासाठी दिवसातले काही क्षण द्या जे फ़क्त तीच्यासाठी असतील.. एखादा गजरा आणा आठवणीने, कधी एकाच बशीत चहा पिऊन बघा...

खूप साध्या अपेक्षा असतात हो ह्या बायको नावाच्या सायको व्यक्तीच्या त्या वेळीच ओळखा...बघा तिच्या मनाची दार कशी अलगद उघडतील आणि तीच्या मनाच्या राजवाड्याचे मग् तुम्हीच राजे व्हाल...

सगळे टाळ्या वाजवतात... लकी आहेत रे वहिनी... खरंच घरी यायला पाहिजे तुझ्या... वहिनींनी एवढे बदलवल तूला.... मानला पाहिजे यार....

अवि डोळ्यात पाणी आणून म्हणाला मी अनलकी आहे रे, हे सर्व कळायला मला एवढा उशीर लागला, कि हा बदल बघायला ती या जगात नाही... म्हणुन सांगतो लेकांनो तुम्ही वेळीच जागे व्हा... अन तिला काय हवे आहे? कळतच नाही असे नका बोलू... खुप् साध्या असतात अपेक्षा त्या वेळीच समजून घ्या...

काय मग् घेणार ना समजून स्त्रीचे मन...??

कशी वाटली कथा? आवडली असेल तर खाली ❤️ असा आकार आहे तो नक्की प्रेस करा.
आणि अभिप्राय द्या.. अर्थात तुमच्या कंमेंटमधून..
अजून लेख वाचत राहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका....

साहित्य चोरी हा गुन्हा आहे.
सदर कथेच्या प्रकाशनाचे,वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे ह्याची नोंद घ्यावी.
कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.


©® अनुजा धारिया शेठ
१९/११/२०२०