तुझ्यात जीव गुंतला.७
स्वराजची मधुरासोबतची जवळीक केशवला खटकत होती. त्याला असं वाटत होतं मधुराला जाऊन सरळ सांगावं की, त्याला दूर ठेव. त्याची कमजोरी ही होती की, तो बोलू शकत नव्हता.
स्वराजची मधुरासोबतची जवळीक केशवला खटकत होती. त्याला असं वाटत होतं मधुराला जाऊन सरळ सांगावं की, त्याला दूर ठेव. त्याची कमजोरी ही होती की, तो बोलू शकत नव्हता.
सारं मनातल्या मनात ठेवत होता.
सगळे चौपाटीला गेले. स्वराज जिथे मधुरा असेल तिथेच जात होता. अर्चनाला खूप राग येत होता. मधुरा तिची खास फ्रेंड आणि नेहमी तीच सोबतीला असायची. आधीच त्याचं येणं तिला आवडलं नव्हतं. त्यात तो मधुराला जरा एकटीला सोडत नव्हता.
सगळे चौपाटीला गेले. स्वराज जिथे मधुरा असेल तिथेच जात होता. अर्चनाला खूप राग येत होता. मधुरा तिची खास फ्रेंड आणि नेहमी तीच सोबतीला असायची. आधीच त्याचं येणं तिला आवडलं नव्हतं. त्यात तो मधुराला जरा एकटीला सोडत नव्हता.
इथे केशव देखील ते पाहून मनातल्या मनात रागराग करत होता.
स्वराज बोलका होता. विविध विषयांवर तो गप्पा मारत होता. त्याचं वाचन अफाट असल्याने त्याला विविध विषयांची माहिती देखील होती. मधुरा तर अगदी प्रभावीत झाली.
"मधुरा आपण पाणीपुरी खाऊया?" स्वराज म्हणाला.
"का नाही? माझी पण फेवरेट आहे."
सगळे पाणीपुरी खात होते. तितक्यात मधुराला जोराचा ठसका लागला.
स्वराजने लगेच तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि तिला पाणी दिले.
स्वराजने लगेच तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि तिला पाणी दिले.
"थँक्स स्वराज." स्मितहास्य करत मधुरा म्हणाली.
ते पाहून तर केशवला अजूनच राग आला.
मावळतीचा सूर्य बघायला केशवला आवडायचा; पण आज त्याला कशातच इंटरेस्ट नव्हता. ज्या मुलीवर तो प्रेम करत होता तिच्यासोबत दुसराच मुलगा होता.
स्वराज आणि मधुराच्या गप्पा काही संपत नव्हत्या.
आता सगळेच कंटाळले.
आता सगळेच कंटाळले.
"ह्या स्वराजने येऊन आपल्या फ्रेंडशिप डे ची वाट लावली." विलास जरा रागात म्हणाला.
"नाही तर काय. स्वतःच स्वतःला इनवाईट केलं आहे. खरी चूक ना मधुराची आहे. सरळ नाही म्हणायचे होते. मी तिला बोलली होती;पण तिने काही ऐकलं नाही. आज इतका खास दिवस आणि त्या स्वराजसोबत गप्पा मारत बसली आहे. जायचं नाव देखील घेत नाही."
"खरंच मधुराचीच चुक आहे. ती त्याला नाही म्हणाली असती तर तो कशाला कडमडला असता. ह्यापूढे त्याला आपल्यासोबत येऊ द्यायचे नाही. मी मधुराला तसं स्पष्ट सांगणार आहे. अजिबात त्याला आपल्या सोबत नको."
विलास आणि अर्चना मधुराचीच चूक दाखवत होते. त्याचं प्रेम आहे म्हंटल्यावर त्याला ते ऐकवेना.
तो तिची बाजू सांभाळत म्हणाला,
"मधुरा कशी आहे हे आपल्याला माहीत आहे. ती कोणालाही दुखवत नाही. ती असं कोणालाही नाराज करत नाही."
"सगळं माहीत आहे; पण तरी ह्या स्वराजमुळे मूड ऑफ झाला. चला आता सूर्य मावळला आहे. निघुया का?"
"ठीक आहे." केशव.
अर्चनाने मधुराला आवाज दिला.
"मधुरा निघुया."
स्वराजला तिच्यासोबत अजून वेळ हवा होता.
"अजून पंधरा मिनिटं बसूया का?" स्वराज.
"पंधरा मिनिटं थांब अर्चना." तिने अर्चनाला सांगितले.
अर्चना पुन्हा केशव आणि विलासकडे गेली.
"अजून पंधरा मिनिटं थांब म्हणतेय."
तिघेही तिची वाट बघत बसले होते.
तितक्यात एक लहान मुलगी समुद्राच्या ठिकाणी जातांना स्वराजला दिसली.
स्वराज पळतच गेला.
त्याच्यामागे मधुरादेखील गेली.
त्याच्यामागे मधुरादेखील गेली.
त्या मुलीला समुद्राच्या लाटा खेचून घेणारं तोच पाण्यात उडी मारून स्वराजने तिला बाहेर खेचले.
तोपर्यंत बरीच लोकं जमा झाली होती.
त्या मुलीची आई देखील उभी होती. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि चिंता स्पष्ट दिसत होती.
त्या मुलीची आई देखील उभी होती. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि चिंता स्पष्ट दिसत होती.
ती मुलगी आईला घट्ट बिलगली.
"खूप खूप धन्यवाद." तिची आई म्हणाली.
"धन्यवाद काय करताय? कधीपासून तुम्ही फोनवर गप्पा मारत बसला आहात. मुलीकडे अजिबात लक्ष नाहीये तुमचं. तुमच्या अश्या बेजबाबदार वागण्यामुळे आज मुलीचा जीव गेला असता." तो रागातच म्हणाला आणि निघून गेला.
त्याने प्रसंगावधान दाखवून मुलीचा जीव वाचवला होता.
मधुराच नव्हे तर अर्चना, विलास,केशव देखील इंप्रेस झाले.
"हा तर हिरो निघाला. मुलीचा जीव वाचवला."
मधुरा.
"हो ना. आपण समजत होतो तसा हा नाही."
विलास.
विलास.
"स्वराज, तू खूप छान काम केलं." मधुरा स्वतःच्या बॅगमधील नेपकीन त्याला देत म्हणाली.
"मी इतकं काही मोठं काम नाही केलं मधुरा. जे करायला पाहीजे होतं ते केलं. राग मला त्या मुलीच्या आईचा आला, किती बेजबाबदार वागणं. मुलीकडे लक्ष द्यायला काय होतंय? पूर्णपणे जबाबदारी घेता येत नाही तर कशाला जन्म देतात मुलांना? अश्या लोकांची मला फार चीड येते."
तो खूप रागात बोलत होता.
"बरोबर बोलतोय तू."
स्वराजने जे केलं ते कौतुकास्पद होतं.
त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एका क्षणात बदलला.
त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एका क्षणात बदलला.
त्या दिवशी स्वराज त्या ग्रुपचा हिस्सा झाला होता.
स्वराजचं येणं केशवला मधुरापासून दूर करेन?
काय होईल पुढे?
काय होईल पुढे?
(क्रमशः)
अश्विनी ओगले. आजचा भाग कसा वाटला कंमेन्टमध्ये सांगा. मला फॉलो करायला विसरू नका.