"सोने.. जरा आम्हा म्हातारा म्हातारीचा विचार कर गं! का अशी वागतेय. आधीच आईविना पोरकी तू, कशी वाढवली तुला, ते का हे दिवस बघण्यासाठी ? काहीतरी चांगलं करायचं म्हणजे जीव धोक्यात घालून करायचं असं असतं का? तिचे आजोबा कळकळीने तिला समजावत होते. "आबा तुम्हीच म्हणता ना की मी अगदी पप्पांसारखी शरीराने आणि मनाने दणकट आहे. पप्पा जेव्हा माझ्या वाढदिवसाला तिरंग्यात आले तेव्हा त्यांना अग्निडाग देतानाच ठरवले की मी पण आर्मीत जाणार. मुलगी असली म्हणून काय झालं? पप्पांचा वारसा मी पुढे चालवणार." आजोबा काठी टेकवत उभे राहीले पण ती काठी खाली टाकून तिच्याजवळ आले आणि मायेने हात फिरवला. आता त्यांच्या म्हातारपणाची काठी देशासाठी प्राण पणाला लावणार होती. जणू तिच्या डोळ्यातून त्यांना देवी शैलपुत्रीचे प्रतिरूप झळकत होते.
~ऋचा निलिमा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा