तिच्या भेटीसाठी भाग 2

Tichya Bhetisathi


सारिकाने खूप प्रयत्न केले रूपक ला फोन करून अवणीच्या बद्दल जे घडत आहे ते सांगण्याचे.. ती तुझी वाट बघत आहे खूप आतुरतेने आणि ती तुला भेटलताशिवाय अन्नाचा एक कण ही खाणार नाही ,ना पाणी घेणार ..तू येशील तेव्हाच तुझ्या आनंदाच्या बतमीसोबत ती जेवणार आहे.. तेव्हाच तुझ्या हाताने पाणी पिणार आहे..


तू आज आला नाहीस तर तिच्या मनावर तर परिणाम होणार हे ठरलेले आहे पण तिच्या डोक्यावर मानसिक आघात होईल..त्यात तिचे तुझ्या वर असलेले निस्सीम प्रेम तिला बदनाम करेल..लोक तिला नको त्या गोष्टी ऐकवतील.. तिचे करिअर संपून जाईल...ती पुन्हा तुझ्या शिवाय जगणार नाही...


कृपया तू , ये...तू , ये... माझ्या मैत्रिणी साठी ये... एकदा ये आणि तिला सांग तू ही असेच प्रेम करत आहेस तिच्यावर..जितके ती तुझ्यावर करत आहे... सांग तिला तू सोडून जाणाऱ्यातला नाहीस..ना तू तिचा वापरून फेकून देणाऱ्यातला आहेस.... रूपक तुला जरा ही तिच्या केलेल्या त्यागाची जाणीव असेल तर तू येशील..किंवा एक कॉल तरी करशील...किंवा मी कॉल केल्यावर तो कॉल घेशील../

सारिका तिच्या मनात बोलत होती ,सगळे प्रयत्न करत होती रूपक ला फोन करण्याचे...पण तिकडून काहीच प्रतिसाद येत नव्हता ना रूपक येतांना दिसत होता.

अवणी ,"सारिका तो येतोय ना ,का खरंच तो विसरून गेला असेल ग, मी तर कितीदा एक ते दहा मोजले ,तरी तो आला नाही. "

सारिका ,"अवणी सावर स्वतःला ,तो येणार नाही ,चल आता आपण घरी जात आहोत ,उठ चल ,आधी काही खाऊन घेऊ ."

अवणी ,"नाही नको ,मी त्याच्या हाताने खाणार आहे ,आणि तोच मला भरवणार आहे, and its final, "

सारिका, "ok, पण आता घर गाठायचे "

अवणी ,"सारिका त्याच्या घरी जाऊ का आपण please ssss, please "

सारिका ,"no ways, मी तुला तुझ्या घरी सोडणार आहे,कारण काका काकू वाट बघत असतील तुझी. "

सारिका आणि अवणी ऍक्टिवा वर बसून घरी येतात.. सारिका तिला gate च्या आत सोडते.. आणि तिला तिची काळजी घे म्हणून सांगून जाते, अवणी तिला मी काळजी घेईल असे सांगते.. आणि सारिका जरा नजरे आड गेल्यावर ती न राहता रुपकच्या घरी जाते... तो दिसतो का कुठे हे पहाते... पण तो कुठे ही दिसत नसतो..तिला त्याच्या न दिसण्याने आज खूप त्रास होऊन ही ती त्याची वाट बघत तिथे थांबते...

आणि अचानक तो तिला दिसतो...त्याला बघण्यासाठी डोळे अतुरलेले असतात..जणू ती चातक असावी अशी...तिच्या आनंदाला पारा राहिलेला नसतो... तो ही खूप खुश होतो ..आणि पुन्हा...तो तिला बघून माघारी फिरतो... तिच्या कडे पाठ करून आलेले अश्रू पुसून पुन्हा तिच्या कडे बघतो..आणि hii करतो...तो त्याचे कान पकडतो..खूप दा सॉरी सॉरी म्हणत असतो..

आणि तिला जवळ येऊ तिच्या थकलेल्या चेहऱ्यावर हात ठेवून आणि तिचे अश्रू पुसत असतांना त्याच्या यशाची आनंदाची बातमी सांगतो..."आता रडायचे नाही यार आता फक्त हसू आणि आंनद द्यायचा आहे तुला ,तुझ्या ह्या चेहऱ्यावर अश्रू नाही हसू आणायचे आहे मला ,तुला ती आनंदाची बातमी सांगायची आहे, तुझ्या कष्टाचे सोने झाले अवनी , अवनी मी टॉप केलंय ,आणि सगळ्यात आधी मी तुलाच सांगत आहे..फक्त तुलाच सांगत आहे ,मी तसे promise ही केले होतेच ना ,बघ मी विसरलो नाही ,मला आठवण आहे...तूच ह्या माझ्या यशाची खरी शिलेदार आहेस...तू माझ्यासाठी आणि आज मिळालेल्या ह्या यशाची हक्कदार आहेस.. तू माझ्यासाठी तुझे एक पूर्ण वर्ष वाया घालवलेस... मला ह्याची जाणीव आहे... ती मी माझ्या पूर्ण आयुष्यात विसरणार नाही..."

अवनी डोळे पुसत त्याच्या आनंदात आपला त्रास विसरून जाते..आणि त्याच्या पुढील भवितव्यासाठी अशीच मी नेहमी सोबत राहो, आणि तुझे यश मला बघायला मिळो असे म्हणते.. आणि मी नसले तरी देवाकडे तुझ्या यशासाठी कडक उपवास ठेवेन..तो ही निर्जळी..


रूपक ,"ए हो, तू सकाळपासून उपाशी आहेस माझ्यासाठी ,मी म्हणालो होतो की मी आल्यावर आपण उपवास सोडू.. मी तुला घास भरवेन आणि माझ्याच हाताने तू पाणी घेशील...मी विसरलोच..अवनी तू काहीच कशी बोलली नाही.. मला निदान एक फोन तर करायचा..मी खूप busy होतो..कॉलेजच्या सगळ्या फॉर्मलिटी पूर्ण करण्यात दिवस निघून गेला.. त्यात फोन घरी राहिला.. मग मला वाटले तू निघून गेली असशील.., "

अवनी, "अरे असू दे, माझी भूक गेली पळून, तुझ्या ह्या आनंदात मला भूक आहे असे वाटत नाही.. मी घेईन manage करून...हो पण मन समाधान पावले..की तू तुझे ते promise पाळलेस... मला सर्वात आधी सांगणार होतास आणि मला तू तुझी आनंदाची बातमी कळवलीस ते "

ती असे बोलत असतांना तिला चक्कर येऊन ती खाली पडते..तसा रूपक तिला पकडतो..तिची शुद्ध हरपते... त्यात ती बडबडत असते...तुला मी नाही विसरणार..तूच माझ्या आयुष्यातला पहिला आणि तूच शेवटचा असणार..पण तू मला विसरणार नाहीस ना..मला promise करशील ना.. मी माझे सगळे काही तुझ्यासाठी हरवून बसले आहे... मी माझी नाही उरले रे...

त्याला काहीच कळत नव्हते अवनीला हे काय होत आहे, ती अशी का बोलत आहे...तिने माझे न येणे किती मनावर घेतले आहे..ती किती प्रेम करते माझ्यावर.. आणि मी तिला आज खोटे बोलून सहज फसवले आहे.. मी माझ्या ह्या यशाची बातमी सर्वात आधी तिला न सांगता सगळ्यांना सांगितली ,तिला उपवास असून ही मी तिच्यासाठी तिच्या कॉलेज मध्ये जाऊ नाही शकलो..तिने माझ्यासाठी निर्जळी उपवास पकडला तरी मी नाही गेलो...तिने माझ्यासाठी तिचे आयुष्यातील एक शैक्षणिक वर्ष वाया घालवले... तिला मी कसा डावलून पुढे निघून जाऊ शकतो... मी कसा तिला सोडून परदेशी कायम निघून जाऊ .. मला आई बाबांनी जर त्यांच्या जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी नसती दिली तर आज मी अवनी सोबत खोटे नसतो बोललो...एका खऱ्या प्रेमाला मुकणार तर आहेच पण मला खरे प्रेम मिळेच असे होणार नाही.. कारण मी तिच्या प्रेमाची कदर केली नाही..आणि ते देवाला ही मान्य नाही..मला तिच्या सारखे खरे प्रेम करणारी मिळोच नाही..
मी तिच्या प्रेमाच्या शापात राहो..तिला मी सतत शोधत राहो..हीच माझी शिक्षा असो...हया आयुष्याच्या वळणावर मी चातक असो आणि ती मेघ...

त्याने तिला आपल्या हृदयाशी घेतले, तिला जवळून न्याहाळले..तिला त्याच्या हाताने पाणी पाजले...तशी तिला जाग आली...ती त्याच्या कडे बघून हसली..तिला कळले की आज त्याच्याच हाताने तिला त्याने पाणी पाजले... ती खूप खुश झाली...तिला जणू आसमंत मिळाले होते.. त्याच्या मिठीत शुद्ध हरपून ही काही वेळ जणू स्वर्ग सुख लाभले होते... तिने स्वतःला सावरले.. सावरून पुन्हा त्याच्या मिठीत गेली...त्याने आता घरात जाऊन आणलेली मिठाई तिला भरवून तिचा तो उपवास ही सोडला होता... तो ही सकाळपासून जेवला नव्हता... त्याची भूक पळाली होती...त्याला काही सुचत नव्हते.. कारण आई बाबांनी त्याला एका सपथेत पुरते अडकवून टाकले होते..."/एक तर अवनी निवड किंवा आमचे जीव घे../

त्यात त्याला आई बाबांनी अवनीचा फक्त माझ्या कामापूरता वापर केला होता हे समजल्यावर तो कोलमडला होता...आपले आई वडील असे कसे वागू शकतात..

आधी त्यांनीच तर अवनीची माझ्याशी ओळख करून दिली...मग माझी आणि तिची ओळख वाढवली...मग मला सतत तिच्या सोबत रहायला सांगितले..तिला माझा अभ्यास करायला लावून तिला तिचे वर्ष वाया घालवायला करणीभूत ठरले...


ह्यात आम्ही दोघे हळूहळू जवळ येत गेलो..आणि हळूहळू आमचे नाते प्रेमाच्या हिंदोळ्यावर झुलू लागले... ते ही त्यांना दिसत होते... त्यांची त्याला हरकत नव्हती..आणि आता मी पास झालो आणि आता कुठे अवणी ने माझ्यासाठी बघितलेले स्वप्न सत्यात येणार होते तोच आई बाबा यांनी अवनी पासून दूर राहायला सांगितले... इतकेच नाही तर, परदेशात कायमच जायला सांगितले...ते ही अवनीला कायमचे मनातून काढून...ते कसे शक्य होईल..हे का नाही कळत त्यांना..आता हे बंध गुंतले आहेत एकमेकांच्या आत्म्याशी हे का नाही समजत त्यांना...!!

रूपक अवनीला सोडून परदेशी निघून जाण्यासाठी मन कठोर करतो..अगदी स्वतःला तिचा गुन्हेगार मानतो ,दोषी मानतो तिचा..तो स्वतःला शिक्षा म्हणून स्वतःलाच तो शाप देतो.. तडफड शील तू खऱ्या प्रेमासाठी ..तिला दुखवुन तू कधीच सुखी राहू शकणार नाहीस...तिच्या ह्या थोर त्यागामुळे तू मोठा होशील पण तुला त्याचा अभिमान कधीच वाटणार नाही, ती तुला पदोपदी आठवत राहील पण तू तिला बघू,भेटू, आणि बोलू शकणार नाही...आणि त्या शापातून तीच तुला मुक्त करेल...तीच तुला सोडून जाईल.. त्याचा जीव इथेच अडकून असतो..अवनी साठी तो जीव तळमळत असतो..

त्याआधी तिच्यासोबत एक शेवटची भेट घ्यायचे ठरवतो...कशी असेल ती भेट..काय ठरवले असेल रूपक ने...कसे सांगणार तो अवनीला सत्य...कसा सामना करेल तो तिचा..काय होईल तिची आवस्था जेव्हा तिला कळेल की रूपक तिला सोडून दूर निघून जाणार आहे ते ही कायमचा..

क्रमशः...?

🎭 Series Post

View all