तिच्या भेटीसाठी... भाग 1

Tichya Bheti Sathi



रूपक कॉलेज मध्ये अवणीला भेटणार होता, तो म्हणाला होता मेडिकल चा फायनल निकाल लागला लागल्या सर्वात आधी तो तिला कॉलेज मध्ये भेटायला येईल म्हणाला होता.


अजून एव्हाना निकाल लागला ही असावा, पण रूपक निकाल कळताच तिला फोन करून कळवणार होता, ठरलं होतं तसं त्यांचं .

मग का आला नसेल हा कुठे अडकला असेल तो..

अवणीच्या मनात एक हुरहूर सुरूच होती ,त्याला फोन करावा का ?की ठरल्या प्रमाणे तिची वाट बघू..तो करेल फोन आणि तो येईल ही पण अजून किती वेळ लागणार त्याला..

इकडे तर आता अवणीच्या lecture ची वेळ होत आली होती.. ती चांगलीच कात्रीत सापडली होती..का हा असा वागत असतो..

हा तिला मुद्दाम छळण्याचा तर प्रयत्न नसावा ना नेहमी सारखा.. तिला वाटत होते त्याची सवय आहे, आणि तो तसे करू ही शकतो..पण निदान आज तरी तो अशी जीव घेणी गम्मत करणार नाही..आज त्याच्या निकालाची ती वाट बघत आहे..हे त्याला चांगलेच माहीत आहे...

तो विसरून तर गेला नसेल ना..नाही ते तर कधीच शक्य नाही..तो तिला इतके जीवापाड प्रेम करत की, त्याने तिला कोणत्या ही परिस्थितीत विसरणे शक्य नाही..


अवणी इकडे फेऱ्या मारत होती..तिला काहीच सुचत नव्हते..तिच्या लेक्चर ची वेळ झाली होती तशी बेल ही वाजली होती.

तिची वाट बघत उभ्या असलेल्या मैत्रिणी तिला खुणावत ही होत्या/ यार चल लवकर किती हा उशीर, अजून आम्ही किती तुझ्यासाठी ताटकळत उभे राहायचे ,अजून कधी येणार तुझा तो
हिरो ?/

"Come on dear, तू विसर तो पास ही झाला असेल आणि मग त्याचा घरी ही गेला असेल , आणि तू बस इथे त्याची वाट बघत " ...तिची मैत्रीण सारिका तिला रागात म्हणाली..

अवणी... "अजून ,अजून फक्त काही वेळ दे बघ तो येणार हे नक्की. "


सारिका.."तू आणि तुझा तो हिरो..काय तो गोंधळ घाला ,हे मी निघाले हं !! "


अवणी, "आज तू माझी प्रेसेंटी लावशील का please ,तो आला तर तसाच मी नाही थांबले समजून डीसमूड होऊन निघून जाईल ग. "



सारिका, "कमाल आहेस, खरंच तुझ्या ह्या devotion ला मानले यार ,मी तर त्याला फोन करून करून हैराण केले असते.. आणि तू बसलीस त्याची वाट बघत..काय म्हणतात ना त्या चतका सारखी..."


अवणी... I think तो जवळ आला आहे ,त्याच्या vibes मला सांगत आहे, तो आला आहे... बघच तो येईल इतक्यात...मी एक ते 10 म्हणते तोपर्यंत तो येईल / i know/ "



सारिका...... "तू खरंच कठीण आहेस अवणी..मी तर ह्या असल्या अंधल्या प्रेमापासून दूरच रहाते.. हे मृगजळ आहे..तू ही त्यात गुंत जात आहेस..तरी best luck..."

अवणी , "हो मला त्याची गरज नाही ,माझा लक नक्की येणार ,तू बघ.."

सारिका , " मला इतका time नाही की मी तुला डोकं लावत बसू.."

अवणी ,"सारिका तू नको इतके serious घेऊस, मी काळजी घेईल माझी ,आणि मी नाही घेतली तर तो आहे ना, तो घेईल माझी काळजी आयुष्यभर "

सारिका,"अवणी तुला वाटत नाही का तू तुझ्या भविष्याची वाट लावली आहे त्याला मदत करत असताना..तू तुझे एक वर्ष वाया घालवले आहेस त्याच्या मेडिकल चा अभ्यास करण्यासाठी आणि तेव्हा कुठे तू त्याची writer होऊ शकली होतीस.. आणि आज त्याचे तू परिणाम भोगत आहेच स , मग आता तरी डोळे उघडे ठेवून प्रेम कर.."


अवणी ,"जाऊ दे माझे प्रेम हे असेच असणार आहे, त्याला कोणती अटी शर्ती च्या आधीन राहण्याची सवय नाही... आणि तो जरी पुढे गेला तर मी असे समजेल की मी जिंकले.. आज म्हणूनच तर त्याच्या निकालाची खास वाट बघत आहे.. "

सारिका, "अवणी तू खूप करत आहेस त्याच्यासाठी पण तुला माहीत नाही त्याची आई तुझा वापर करून घेत आहे..तिला तू फक्त एक शिडी सारखी आहे... त्यावरून रूपक वरती जाईल आणि तो एकदा काय मोठा काही झाला ,त्याचे नाव झाले तर त्या तुला त्याच्या आयुष्यातून सहज बाहेर काढतील ,हे माझे शब्द लक्षात ठेव..."

अवणीला अजून ही सारिकाचे शब्द ऐकू येत नव्हते.. ती काय म्हणत होती ते तिने जणू कानाआड टाकले होते... आता ती फक्त त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती.. ती फक्त तिच्या हृदयाचे ठोके ऐकत होती...आणि ती फक्त तिच्या मनातील आवाज ऐकत होती... तीला त्याच्या येण्याचे जणू स्पंदने जाणवत होते.. मनातल्या मनात तिने कितीदा तरी एक ते दहा मोजले होते... सारिका कंटाळून निघून गेली होती.. तसे त्यांचे सगळे लेक्चर ही हळूहळू संपले होते...

सगळ्या मैत्रीणी बाहेर आल्या होत्या..

अवणी अजून ही तिथेच उभी असते.. तितकीच आतुरतेने वाट बघत.. आणि अजून ही तिची उत्सुकता कमी झालेली नसते.. ती जवळपास दोन तास त्याच्या येण्याची वाट बघत असते.. पण तो अजून ही आलेला नसतो..

सारिका इतर मैत्रिणींना सांगत होती / तुम्ही सगळ्या घरी जा, मी आणि अवणी जरा उशिरा येतो /

सारिकाच्या सांगण्यावरून बाकी मैत्रिणी अवणीची ही अशी गम्मत आणि धीर बघून ,तिला नको ते आपापसात बोलून निघून जात होत्या.. कोणी म्हणत , / तिला वेड लागेल अशीच जर ती वागत राहिली तर /

तर कोणी म्हणत , / हीच प्रेम करत असेल ,त्याचे तर प्रेम ही नसेल ,तो कुठे आणि ती कुठे.. त्याची जात काय आणि हिची जात काय /

तर कोणी म्हणत होती , / तिला वापरून घेतले असेल आणि आता तो तिला सोडून गेला असेल ,तरी ही मात्र डोळ्यावर पट्टी लावून त्याची वाट बघत आहे /

सारिका त्यांचे बोलणे ऐकत होती ,तिला आता खूप चीड येत होती.. तिने सगळ्यांना ओरडून गप्प बसवले होते.. आणि निघून जायला सांगितले होते.. तशी ती तुरंत अवणी कडे झप झप चालत गेली... आणि तिला एक लगावली , तशी अवणी भानावर आली..आणि सकाळ पासून तिच्यासाठी आणि त्याचा निकाल चांगला लागावा आणि तो पास व्हावा म्हणून तिने निर्जळी उपवास पकडला होता तिने.. आता दुपारचे 4 वाजले होते..ती भर उन्हात उभी होती..तिला ऊन लागले होते.. आणि तिला अशक्त ही वाटत होते..

तशीच सारिका ने तिला भानावर आणण्यासाठी आणि रुपकच्या खोट्या प्रेमाच्या धुंदीतून बाहेर काढण्यासाठी अवणीला एक लगावली होती, तशी ती रडू लागली..तिला आता त्याची वाट बघण्याचा वीट आला होता... त्याने साधा एक फोन ही केला नव्हता... ना तो आला होता..

अवणी, "सारिका मी पुन्हा एक ते दहा मोजते, बघ तो येईलच ,तो येतच असेल तो मला विसरून जाणार नाही बघच, फक्त तू अजून थोडा वेळ थांब, माझा रूपक असा नाही...तो मला वापरून घेणाऱ्यातला नाही.."

सारिका ला आता अवणीच्या ह्या बोलण्याचे अजूनच टेन्शन होते..अवणी हे असे का बोलत आहे ,हिला खरंच वेड नाही ना लागले... हिला भानावर आणावे लागणार आहे... मला रूपक ला फोन करावा लागणार आहे..नाहीतर भलतेच होईल..जर फोन नाही उचलला तर मग त्याच्या घरी जावे लागणार..आणि असे झाले तर ह्यांच्या प्रेमा बद्दल त्याच्या घरच्यांना कळणार हे नक्की..

अवणीने सारिकाच्या हाताला धरून तिला विनंती केली, / तू please रूपक ला फोन कर ,त्याला काही झाले तर नसेल ना ,विचार तो कसा आहे, कुठे आहे..सांग त्याला मी त्याची वाट बघत आहे इथे ,आणि सांग तो त्याच्या हाताने मला घास भरवणार आणि पाणी ही पाजनार आहे../

अवणीने स्वतःचा फोन सारिकाच्या हातात दिला आणि तसाच त्याचा फोन नंबर ही काढून दिला, तसा सारिकाने रूपक ला फोन लावला, पण बरेच कॉल देऊन ही रूपक काही फोन घेत नव्हता..

काय झाले असेल रुपक ला , का त्याने फोन घेतले नाही..त्याचा प्रॉब्लेम काय आहे..का हा असा वागत होता..


क्रमशः.....


🎭 Series Post

View all