तिची व्यथा भाग ४

आजारावर मात करणे हि परिवाराच्या साथीने शक्य होते.

ज्योती ताईंच्या आयुष्यातील अजून एक लग्नप्रसंगाचा किस्सा आपण येथे ऐकणार आहोत, ताई लग्नाला गेल्या तेव्हा छान तयार आल्या होत्या. ताई दिसायलाच इतक्या छान कि, प्रत्यक्ष हेमा मालिनी आपल्या समोर येवून उभी राहिली की काय? असा प्रश्न सर्वांनाच पडतो. ड्रिम गर्ल सारखे ताई दिसायला देखणी. 

लग्नाचे कार्यक्रम सुरु होते. ताईंची कोणती तरी गोष्ट गाडीत राहिल्याने शेखररावांकडून गाडीची चावी घेवून त्या पार्किंग च्या दिशेने निघाल्या. रात्रीची वेळ असल्याने थोडा अंधार होता. चालत असताना मध्येच केळीच साल असाव. ताई तिथेच घसरुन खाली पडली. आपल्याला कोणी पाहत नाही ना? तसे ताईने आजूबाजूला पाहायला सुरवात केली. समोरच्या बाजूला एका गाडीत काही वधू पक्षाची मित्र मंडळी असावीत डिकीचे झाकण उघडून ड्रिंक घेणे सुरु असावे बहुधा.
आता करायचे काय? आपल्याला तर हात दिल्या शिवाय उठता येत नाही. ताईने त्यातल्या एका माणसाला इकडे या असे हाताने खुणावले. तसा एक गृहस्थ तिथे आला.

गृहस्थ : काय झाल ताई.

ताई : मला उठवायला हात द्या.

गृहस्थ : काय?

ताई : मला उठवताना हाताला न पकडता दंडाला धरा.

गृहस्थ : काय म्हणालात?

ताई : उठवा तर आधी मला.

गृहस्थ : हो.

ताई : संधिवाताचा त्रास असल्याने जर मला मनगटाला धरुन उठवले असते तर दुखले असते. म्हणून मी दंडाला पकडा असे सांगितले. गुडघे दुखीचा देखील त्रास असल्याने पटकन उठता देखील येत नाही.

गृहस्थ : तुम्ही एवढ्या छान आवरुन दिसताय. आणि चक्क मला दंडाला पकडा अस बोलताय क्षणभर काय करावं सुचलच नाही ओ. माझी तर एका झटक्यात उतरली असच वाटतय.

ताई : इथे लग्नात काही मंडळीची आहे अशी पार्टी सुरु तुम्ही त्यांना जाॅईन व्हा पुन्हा.

इथे संवाद संपून ताई तिथून निघून जातात. खरच जीवनात येणारे अनुभव हास्य आणि अश्रूंचा सुरेख मेळ असतो. तर कधी काय कराव अश्या द्विधा मन:स्थितीत देखील अडकल्या सारखे वाटते.


अश्या घटना जीवनाच्या पाश्वभूमीवर सुरु असताना हळूहळू ताईंच्या संधिवाताविषयी नातेवाईंकामध्ये चर्चेला उधाण आले. शेखररावांना तुम्ही दुसरे स्थळ शोधून लग्न करण्याचा सल्ला देखील लोक देवू लागले. पण म्हणतात ना? विधात्याने लग्नाची गाठ एकदा बांधली की ती सहजा सहजी तुटणे शक्य होत नाही.
शेखररावांसारखे देवमाणूस मी नेहमी च ज्योतीच्या मागे ठाम पणे उभा राहणार प्रत्येक सुख-दु:खात तिची साथ देणार. लग्नात एकमेकांना साथ देण्याचे वचन आयुष्यभर जपणार आणि त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार.


नव-याची भक्कम साथीने ज्योती ताईच्या संसारात आनंदाचे वारे वाहत होते. परंतु लोकांच्या नजरेतून ताई संधिवात ग्रस्त आहेत हि बाब त्रासदायक अनुभव देत होती. आपल्याला जाणवणा-या वेदनांपेक्षा ताईला लोकांच्या बोलण्याचाच त्रास जास्त जाणवत असायचा.


ताईंच्या मनात चालणारे भावनांचे कल्लोळ संधिवात तज्ञांनी अचूक ओळखून ताईला जीवनाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोण कसा असावा याचे सूत्र शिकवून गेला. " छोडो लोगों की बाते, अपना और परिवार का सोचो और खुश रहो".
तज्ञ मानसिक बाजूनेही विचार करतात, ताईला ही बाजू मनाला स्पर्शून गेली. याच उक्तीप्रमाणे आपण वागायच आणि नेहमीच आनंदात राहायच मनाला असे तिने आवर्जून बजावून सांगितले.
ताईंना संधिवात होवून ८-९ वर्षांचा काळ लोटला होता. संधिवात आता ब-यापैकी आटोक्यात आला होता. परंतु थंडीच्या दिवसात संधिवात वाढायला सुरवात झाली की वेदना ही वाढीस लागतात. ताईंचे वय विचारात घेता जादूची कांडी फिरावी किंवा हनुमाना ने जशी संजिवनी पर्वतावरुन आणून लक्ष्मणाचे प्राण वाचवले त्याचप्रमाणे ताईंच्या दुखण्यावर सांध्याची झीज होवू नये याकरता रामबाण उपाय समजला.

माझ्या सारखीच तुमची देखील उत्सुकता इथे वाढलेली असणार याचा अंदाज मी थोडा लावू शकते. तो उपाय आपण अंतिम भागात पाहणार आहोत.

क्रमशः

🎭 Series Post

View all