आकाश आणि दिशा यांना स्वावलंबनाचा पाठ ताईंच्या दुखण्यातून शिकवून गेला. स्वत:चे काम स्वत: करु लागले. हे दृश्य डोळ्यात साठवताना ताईंना आनंद आणि दु:ख याची एकाच वेळी प्रचिती येत होती. लहान असताना मुल आपल्या आई-वडिलांचा आधार शोधत असतात. ताईंच्या परीस्थितीत इवलिशी पिल्ले आधार देण्याचे काम करत होती.
तीन-चार महिन्यांनी तपासण्या करुन त्यावर योग्य वेळी औषध उपचार केले गेल्याने संधिवात आता आटोक्यात येवू लागला होता. औषध उपचार घेवून ८-९ वर्षांचा काळ लोटला.
कानावर पडणारे प्रश्न काळजीचे रुप धारण करत गेले, अस म्हणतात कॅन्सरवर उपाय योजना आहेत मात्र संधिवातावर नाही. आता हे दुखणे कायमस्वरुपी आपली पाठ धरुन राहणार की काय?
अनेक गंमतीशीर उदाहरणांनी देखील ताईंच्या जीवनात कधी हास्य, भय, याचे रुप धारण केले होते. त्यातले थोडेफार प्रसंग आपण पाहूयात.,
ताईंनी आहे त्या परीस्थितीतून पुढे जाण्याची उमेद मनाशी पक्की केली. आपल्याला जे जे करता येणे शक्य आहे. ते करण्या करता सकाळी उठून चालायला जाणे, योगासने करणे या उपक्रमांना प्राथमिक स्वरुपात शामिल करुन घेतले.
एकदा सकाळच्या वेळी चालायला जात असताना रस्तावर कुत्र उभे होते. त्याला पाहून पळाव तर, आपल्याला कुठे जोरात पळता येणार या भावनेन ताई तिथेच शांत उभ्या राहिल्या. कुत्र जवळ येताच ताई घाबरल्या. आता जे होईल ते होईल या विचाराने हाताची मूठ घट्ट आवळली. कुत्रा ताईंच्या समोरच उभा होता. दोन्ही खांद्यावर दोन हात ठेवून उभा होता. थोड्या वेळाने निघून गेला. कुत्रा दूर होताच, झाडून काढणा-या मावशी, " तुम्ही पळाल्या नाही ते चांगले झाले, नाही तर हा कुत्रा पळणा-या माणसाच्या पाठी लागून चावा घेतो".
त्यांचे बोलणे ऐकून ताईंना पहिल्यांदा आपल्याला पळता आले नाही याची खंत वाटली नाही. जर पळालो असतो तर., १४ इंजेक्शनाचे दुखणे आपल्या पाठी लागले असते. थोड हसायलाही येत होत आणि विचार करुन घाबरण्याची प्रक्रिया दोन्ही एकाच वेळी सुरु होते. अश्या परीस्थितीत कसेबसे घर गाठले.
खडतर आयुष्यातून ताई वाट काढत खंबीर पणे आपल आयुष्य जगत आहेत हे सर्वांनीच पाहिले. काही मजेदार किस्से देखील ताईंच्या आयुष्यात घडले ते आपण पाहूया पुढच्या भागात.
क्रमशः