तिची व्यथा भाग २

परीवाराची साथ लाभता निम्म दुखणे क्षणात दूर होते.

आपल्याला होणारा त्रास हा किरकोळ असल्याने त्याकडे दुर्लक्ष करत आलेला दिवस दूर ढकलत ज्योती ताई पेनकिलर चे औषध घेत होत्या. रात्री थंडी वाजून तापाने वेठीस धरले होते.झोपेत कूस बदलने अशक्य झाले. बोलताना जबड्याचा सांधा चमक असल्यासारखा दुखत होता. 

डाॅक्टरांनी काही रक्ताची तपासणी करुन ई. एस. आर थोडा वाढल्याचे सांगितले. ५ दिवसांच्या गोळा दिल्या. आता दुखण कमी होणार म्हणून ताईंना थोडे हायसे वाटले. परंतु दुखणे वाढतच होते. दैनंदिन स्वरुपातले काम, कपडे बदलणे देखील मुश्किल झाले होते.
हि लक्षणे डाॅक्टरांना सांगितल्यावर ताबडतोब पुण्यातल्या संधिवात तज्ञांना भेटण्याचा सल्ला दिला. सगळ्या तपासण्या केल्यावर पुन्हा ई. सी.आर वाढल्याचेच आढळले. बाकीच्या तपासण्याचे रिपोर्ट नाॅरमल होते. १५ दिवसांनी पुन्हा भेटायला या, असे त्यांनी सांगितले.
एक दिवस बरे वाटले. दुस-या दिवसापासून पुन्हा अंगात ताप भरला. रात्रभर शेखररावांनी मिठाच्या पाण्याच्या पट्या ठेवल्या. ताप उतरण्याची वाट पाहत होते. ताप तरीही उतरला नाही. सकाळी नैसर्गिक विधी करता उठता येणे देखील शक्य होत नव्हते. शेखररावांनी लहान मुलाला उचलून नेतात तसे उचलून नेले. नंतर मुलांसाठी डबा बनवून आंघोळ देखील घातली. जेवण झाल्यावर ताईंसमोर ताट समोर ठेवले.
जेवताना घास घश्याखाली उतरतच नव्हता. एवढस नखाएवढी लेकरु दिशा पुढे येवून तिच्या इवल्याश्या हाताने ताईंना घास भरवायला लागली. अश्रू अनावर झाले. हे दिवस तिला भरवण्याचे होते. उलट तिच भरवते आहे. डोळ्यांतून वाहणा-या अश्रूंना दिशा आपल्या हातांनी पुसत होती.


हे पाहून शेखर रावांना देखील वाईट वाटले. मनात आपले भाव लपवत ताईंना उभारी देत होते. सगळे आवरल्यावर डाॅक्टरांकडे गेल्यावर \" एॅंटिबाॅडी सीसीपी टेस्ट केल्यावर रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला. औषधांचा डोस चालू झाला. रोजचे काम, केस विंचरणे, कपडे घालणे, पांघरुण घेणे , चहाचा कप देखील उचलणे शक्य होत नव्हते. ते या औषधांनी आठवड्याभरातच फरक पडला.
म्हणतात ना संकट जी येतात त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग ही आपोआप सापडतो तसेच काहीसे दैवी चमत्काराने घडले. जिथे ताई राहतात त्याच इमारती मध्ये शेखररावांचा बिजनेस सुरु होता. घरातले काम पाहताना मुलांचे डबे, त्यांचे आवरुन देणे हि कामे देखील शेखरराव कोणतीही तक्रार न करता आवडीने हि जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडत होते.


ताईंचे आई-वडिल गावी व्यवसाय आणि नोकरी करत असल्याने आपल्या मुलीकडे येवून राहू शकत नव्हते.
शेखररावांनी दिलेली अनमोल साथ ताई या काळात कधीच विसरु शकल्या नाहीत. शेखररावांनी लग्नात दिलेली सात वचन सार्थ करुन दाखविली. कठिण परीस्थितीत आधार देत पाठिशी भक्कम उभे राहिले.
मानवी वृत्ती ही बघ्याचीच भूमिका साकारत असते हे विधान या बाबतीत काही वावगे ठरणार नाही असेच काहीसे घडले,
आपला मुलगा किंवा भाऊ बायकोची इतकी सेवा करतोय हे काही नातेवाईक, समाज, आई-वडिल यांना न आवडणारे होते. अश्यावेळी सल्लामसलत देणे हाच एकमेव उपाय सर्वजण करत असतात. ताईंच्या गैरहजेरीत ताईंना माहेरी पाठवून द्यावे. तिच्या आई-वडिलांनी इकडे यायला काय झालय? ते बघतील तिच्याकडे, आपण मुलांना इथेच ठेवून पाहूया.


यावर शेखररावांनी मनाला चटका लावणारा मुद्दा उपस्थित केला.

शेखरराव : हिच परीस्थिती जर माझ्यावर ओढवली असती तर.. ज्योतीने असचं मला आई-वडीलांच्या भरवश्यावर सोडून दुर्लक्ष करुन माझ्याकडे पाठ फिरवली असती का?
माझ सर्वकाही तिनेच केले असते. मग मी केले तर कुठे जग बदलणार आहे.
घर, बायको, मुले ह्यांची जबाबदारी माझ्यावर आहे. मी ती पार पाडण्यात कुठे कमी पडणार नाही. ज्योतीच्या आई-वडिलांनी मानसिक आधार तिची भेट घ्यायला याव इतकच. माहेरी पाठवणार नाही मी.

या शेखरारावांच्या भाष्याने दहा हत्तींचे बळ ताईंच्या मनामध्ये निर्माण झाले. त्याचवेळी निम्मा आजार बरा झाला.

        ताईंच्या आयुष्यात घडणा-या पुढिल घडामोडी पुढच्या भागात पाहू या


क्रमशः

🎭 Series Post

View all