भारतात संधिवातावर नविन आलेले जैविक इंजेक्शन ताईने घ्यावे असा सल्ला संधिवात तज्ञांनी दिला. ताईचे वय आणि पुढे आणखी त्रास वाढू नये याकरता ते इंजेक्शन ताईने घ्यावे असे सुचवण्यात आले.
मनुष्य स्वभाव नविन टेक्नोलॉजी आत्मसात करण्यावर सहजा भर देत नाही. किंवा पटकन विश्वास ठेवायला मन राजी होत नसते. इंटरनेटवर या विषयी ताईंनी माहिती वाचली. त्यात दिसणा-या साईड इफेक्ट वाचून आगीतून उठून फुफाट्यात पडतो की काय या उक्तीची जाणीव व्हायला लागली. त्यापेक्षा आहे हिच परीस्थिती काही वाईट नाही असे ताईंना वाटणे साहजिकच आहे नाही का?
अश्या मध्येच संधिवात रुग्णांना मार्गदर्शन करणा-या माई या नामांकित संस्थेने एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यातल्या मार्गदर्शनावरुन आणि तिथे भेटलेल्या संधिवातग्रस्त मित्रांनी ताईंच्या मनातील गैरसमज दूर केला. ताईंना , " ज्योती ट्रस्ट युअर डाॅक्टर". ह्या वाक्याचा मदितार्थ समजावून सांगितला.
ताईने या मार्गावर विश्वास ठेवत बायोलाॅजी इंजेक्शन घेण्याचा निर्णय घेतला. सर्व तपासण्या करुन १५ दिवसांच्या अंतराने २ इंजेक्शन घेतली. त्यानंतर आजार क्षणात बरा झाल्यासारखे ताईला वाटले. या नंतर ताईंनी कोणतीही वेदना शामक गोळी घेतली देखील नाही. तसेच दैनंदिन जीवनातील सर्व कामे देखील ताई सहजरीत्या करु शकतात.
ताई ज्या दवाखान्यात ट्रिटमेंट घेत होती तिथे नाटकात काम करणारे काका देखील होते. ताईने काकांना नाटकात काम करण्याची इच्छा व्यक्त करुन दाखवली. ताईने ८०% स्वत:वरच आधारीत असणा-या नाटकाचे कथानक काकांना ऐकवले.
ताईला आपल्याच सारख्या जगात कितीतरी संधिवात पिडीत स्त्रिया आहेत ज्यांना मानसिक आधाराची गरज आहे. नाटकाच्या निमित्ताने त्यांच्या अंगात बळ येवून निम्मे आजार नक्कीच दूर होतील यावर संदेश देणारे नाटक आहे. शाळेत असताना ताईने वक्तृत्व स्पर्धांमध्ये हिरीरीने भाग घेतला होता. परंतु आता अनेक वर्षांचा काळ लोटला होता. त्यातून मार्गदर्शन करुन आत्मविश्वासाची ग्वाही देण्याबाबत ताईने काकांना सुचवले.
काकांना अतिशय आनंद झाला. काकांनी मार्गदर्शनाकरता आवश्यक बाबी समजावून सांगितल्या. काकांची नाटके व्यावसायिक स्वरुपाची होती. अर्थातच पैसे कमावून प्रेक्षकांना पैशाचा मोबादला मिळाला हवा, प्रेक्षक समाधानाने थिएटर मधून बाहेर पडायला हवा. याकडे डायरेक्टर चे संपूर्ण लक्ष असायचे. ते वेळोवेळी तसे मार्गदर्शन देखील करायचे.
हौस म्हणून संधिवात विषयक नाटक होते. त्यात संधिवात पिडीत पत्नीची भूमिकेशी समरस होवून ताईने उत्तम भूमिका पार पाडली. पायात वेदना असतानाही दोन नृत्य पार पाडली. सभागृहात प्रेक्षकांनी टाळ्यांचा वर्षाव केला. या नाटकात डाॅक्टर साहेब देखील सहभागी होते. प्रत्येक व्यक्तीच्या निरनिराळ्या भूमिका नाटकात दर्शवल्या होत्या. संधिवात म्हणजे बाहेरचे काही असणार, अंगारे-धूपारे फकीर, अश्या भूमिकांमध्ये नाटकाची रुपरेषा आखलेली होती. काका जेव्हा अभिनंदन करण्या करता मंचावर आले तेव्हा ताईं बरोबरच सर्वांनाच आपले अश्रू आवरने अनावर झाले.
ताईंचा जीवनप्रवासा विषयी माहिती जाणून घ्यायला अजून भाग काढणे देखील कमी पडतात. आपण इथेच थांबत आहोत. थांबण्या आधी ताईंचा जीवनाकडे पाहण्याचा उदात्त आणि सकारात्मक दृष्टिकोण मनाला स्पर्शून जातो. त्याचप्रमाणे ताई सर्वांना एक मोलाचा संदेश देताना म्हणतात कि, आजार हा मनावर घेतला तर मोठा नक्कीच आहे. पण कुटूंब, समाजाने साथ दिली तर सामान्य आयुष्य नक्कीच जगता येईल. एक स्त्री म्हणून ताई संधिवात ग्रस्त स्रियांच्या कुटूंबांना विशेषत: नवरे मंडळींना सांगू इच्छितात, थोड्या मदतीची आणि जास्त प्रेमाची, समजुतीची, आपुलकीची गोळी तुम्ही संधिवात ग्रस्त पत्नीला दिली तर संधिवातावरच्या त्यांच्या अर्धा गोळ्या बंद होतील.
त्याचप्रमाणे आजाराचा विचार न करता आपल्या जीवनात योग्य व्यायाम, आवडता छंद जोपासणे, संगित ऐकणे नेहमी आनंदात राहून सकारात्मक विचार करण्याचे सूत्र अंगी बांधले तर, निश्चितच सामान्य आयुष्य सहज जगू शकता येते.
हि कथामालिका सत्य घटनेवर आधारित लिहली आहे. ताईं बरोबर चर्चा करुन त्यांच्या बद्दल सदर माहिती त्यांच्या संमतीने कथामालिकेच्या रुपात सादर करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. लिहण्यात काही त्रूटी आढळल्यास क्षमस्व.
कथामालिका कशी वाटली कमेंट द्वारे नक्की कळवा.
समाप्त :