Feb 27, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

तिची व्यथा भाग १

Read Later
तिची व्यथा भाग १

अष्टपैलू लेखक महासंग्राम
पहिली फेरी - कथामालिका

©®प्रज्ञा पवन बो-हाडे


दिंडोरी तालुक्यातील वरखेडा ह्या गावात प्रगतशील द्राक्ष बागायतदार, सहकारी सोसायटि मध्ये सचिव या पदावर कार्यरत होते. असे हरहुन्नरी व्यक्तिमत्व ज्यांच्या ठायी वसले होते ते म्हणजे श्री. साहेबराव उफाडे. एकजूट नेहमीच जीवनात पुढे जाण्यासाठी उभारी देत असते या वाक्यावर ठाम राहून अठरा माणसांच कुटूंब. साहेबरावांचे भाऊ किराणा मालाचे दुकान चालवत असे. अश्या घरंदाज घराण्यात ज्योती ताईंचा जन्म झाला. "पहिली बेटी, धनाची पेटी." असच काहीस साहेबरावांच्या आयुष्यात घडल. ज्योती ताईंच्या पावलांनी लक्ष्मीचे घरी आगमन झाले.
चार भावडांपैकी ज्योती ताई सगळ्यात मोठ्या.
ज्योती ताईंच्या बालपणातील हौस साहेबरावांनी कौतुकाने पूर्ण केली. आपल्या मुलांनी शिकून नाव कमवाव अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा.


दोन मजली मोठ घर होत. घराच्या समोरच हायस्कूल होते. ताई पाचवीत असताना पहिल्या सत्रात ताईला कमी मार्क पडल्याने शाळेतले शिक्षक ओरडले. प्रगती पुस्तकावर वडलांची सहि घेवून येण्यास सांगितले.
वडिल सहकारी सोसायटीत काम करत असताना. ताई प्रगती पुस्तक घेवून सहि करण्याकरता वडिलांना सांगतले तसे वडिल सर्वांसमोर ओरडले. घरी आल्यावर आईला घडलेला प्रकार सांगताच अश्रू अनावर झाले होते. एकीकडे शिक्षकांचे ओरडणे तर दुसरीकडे वडिल अश्या द्विधा मन:स्थितीत मन कावरेबावरे झाले होते. या परीस्थितीतून बाहेर काढण्याचे कौशल्य आईला अचूक आत्मसात असावे. तशी आईने ताईंचा अभ्यास घ्यायला सुरवात केली. ताईंच्या आई जुनी अकरावी शिकलेल्या शाळा मास्तरांची मुलगी त्यामुळे शिक्षणाच महत्व साहजिकच होते. योगायोगच म्हणावा लागेल. शाळेत गणिताच्या मास्तरांची बदली झाली. साळवे सरांनी गणित या विषयाशी गट्टी कशी जमवायची याचे सूत्र आत्मसात करुन दिले. इंग्रजी विषयाचे चव्हाण सर, हिंदी विषयाच्या बैरागी मॅडम, यांनी शिक्षणा विषयी गोडी निर्माण केली.
जादूची कांडी फिरवावी तसे ताईंच्या पाचवीचा रिजल्ट लागला. ९० टक्के मार्क पाडून ताई उत्तीर्ण झाल्या.
आनंदाचे वारे घरात वाहू लागले. कोणालाच ताईंच्या रिजल्ट वर विश्वास बसत नव्हता. पहिल्या सत्रात इतके कमी मार्क आणि आता एकदम ९० टक्के. हि सर्व आई आणि शिक्षकांची कमाल. ताईची जवळची मैत्रिण मनिषाने पाचवी पासून दहावी पर्यंत एकाच बाकावर बसण्याची साथ दिली. सातवीत असताना ताईंना देशस्त रुग्वेद वक्तृत्व स्पर्धेत बक्षिस मिळाले. ताईला नृत्य, वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्याची विशेष आवड.


गावात बारावीला घवघवीत यश संपादन केल्यावर पत्रकार किंवा शिक्षक होण्याचे स्वप्न उरी बाळगले होते. परंतु नियतीच्या मनात ताईंच्या आयुष्यात लगीनगाठ बांधण्याचा योग अवतरला. निफाडचे पण सध्या पुण्यात स्थायिक असणारे गजरज इंसेंस कंपनीचे मालक शेखर पाटिल यांचे स्थळ चालून आले.
साहेबरावांना स्थळाला नाही म्हणतात कुठेच कमतरता दिसत नव्हती. त्यांना हा अमृतयोग घडवून आणायचाच होता.
लग्नसोहळा दणक्यात पार पडला. सुखाच्या संसाराला सुरवात झाली. आकाश आणि दिशा ह्या दोन गोंडस मुलांचा जन्म झाला. दोन्ही मुल आई-वडिलांसारखी हुशार आणि संयमी निघाली. आईचा वारसा पुढे नेत ताईंनी मुलांचा जमेल तसा अभ्यास घेवून आपल राहिलेल अपूर्ण शिक्षण मुलांमार्फत पुरे केले. मुलगा इंजिनियर आहे. तर मुलगी आर्किटेक्ट शिकत आहे.


सुखाचा संसार सुरळीत चालू होता. परंतु नियतीच्या मनात निराळेच होते. मुलांच बालपण बघत असतानाच संधिवातरुपी संकटांची जणू चाहूलच लागली असावी. २००७ ची दिवाळी असावी. घरातली स्वच्छता, साफसफाई, फराळ बनवण्याची लगबग ताईच्या घरी देखील सुरु होती. सांध्यामध्ये थोड्या वेदना ताईला जाणवायला लागल्या. कामाच्या धावपळीमुळे होत असणार म्हणून ताईने पेनकिलर घेवून पुन्हा फराळ बनवायला सुरवात केली. सर्वांची आवडती कुरुम कुरुम चकली ताईने बनवल्या. रात्री झोपेत हात दुखायला लागला. हाताला भयंकर यातना होत होत्या. सांधे आखडायला लागले होते. सकाळी उठून फॅमिली डाॅक्टरांना दाखवले. त्यांची औषधे खावून २-३ दिवस बरे वाटले.

         ताईचे आयुष्य पुढे कोणत्या प्रकारे वळण घेणार आहे. ते आपण पाहूया पुढिल भागात.


क्रमश:


           


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pradnya Pavan Borhade

Home Maker

मनातल्या भावना कल्पकतेने गुंफूण कथांच्या माध्यमात मांडायला आवडते.

//