तिची पाऊलवाट भाग २८

तिची पाऊलवाट


#तिचीपाऊलवाट भाग 28
©स्वप्ना..
आई अधिरपणे बोलायला लागली,"वन्स टॉम पोहचला ना व्यवस्थित,.."मंगल टॉम तिच्या मुलाच नाव होतं ग,..मंगलने मान डोलवली,..सोनी पुढे सांगू लागली,आईने असं विचारताच आत्या हो हो म्हणाली,..आईने पुढे वडिलांना फोन दिला,..वडील म्हणाले,"ताई,जरा गडबड केली आहे ग पोरांनी तुझ्या टॉम ने आणि माझ्या सोनीनी पण आता पोरांचे वय असे आता काय करणार मला वाटतं ताई तू ये लवकर इकडे आणि तुझ्या सूनबाईला घेऊन जा,..ते ओबार्शन नको वाटतं करायला,लग्न लावून ने तिकडेच सगळं करू पैश्याची सोय मी करतो,..पण इकडे काही बोभाटा नको उग बदनामी आपल्याच घराची,.."वडिलांनी सगळं एकादमात बोलून टाकलं आणि त्यांनी कान अधीर केले,..तिकडून आवाज आला,"अरे दादा वेडा आहेस का तू,असा काही निर्णय नाही घेता येणार आपल्याला उलट मी पैसे पाठवते ते मुल पाडून टाक लहान आहे अजून सोनी आणि सुन म्हणशील तर मला नाही वाटत माझा टॉम भारतीय मुलीशी लग्न करेल,..मजा आजकाल करतेच ही पिढी एवढं मनावर नको घेऊस लवकरच तुला पैसे पाठवते,..चल ठेवते फोन,.."
त्यादिवशी कळलं मला की स्त्रीला एका चुकीच्या किती गोष्टी भोगाव्या लागतात,..वडील तर दोन दिवसात अटॅक येऊन गेले,..मी आणि आई तर सुन्न झालो होतो,.. मुल पाडाव ह्या विचारावर आम्ही दोघी आलो,..पण हे करणं सोपं नव्हतं,..असे डॉकटर शोधणं हे सगळं गुपित राहाणं आणि होणार त्रास सहन करणं,.. पण जमलं सगळं आयुष्यात स्त्रीला मजेच्याही किती वेदना मोजाव्या लागल्या ते समजलं,.. आता वडील गेले आर्थिक परिस्थिती बिघडली,..आईला शिक्षण नाही मी अर्धवट शिक्षण केलं,..तेंव्हा तुम्ही गाणं शिकायला जायच्या तर मी किती हसत होते तुम्हाला,..आणि आता माझ्या हातात तर काहीच नव्हतं,..नेमकं आईच्या गावकडच्यांनी एक ठिकाण आणलं,..खुप छान ठिकाण आहे फक्त खेड्यात राहावं लागेल म्हणाले,..मोठा व्यवसाय आहे,पण खेड्याशी निगडित आहे पण हुंडा नको फक्त पोरगी द्या करून घेतील,.. आई लगेच तयार झाली,..मुलगा दिसायला छान होता,पैसा होता आई म्हणाली,"आपण लग्नाला पैसे कुठून आणणार,.. आणि तू केलेली चूक कधी उघडकीस आली तर त्यापेक्षा दूर खेड्यात सुखी राहशील,..माझी काळजी मिटेल,.. सोनी एकदम रडायला लागली,..माझी एक चूक मला फार रसातळाला घेऊन आली ग,..मी होकार दिला,..ह्या खेड्यात आले,..घर अगदी मोठं होत राजवाड्यासारखं,दारात गाडी होती,घरगडी होते,..दागदागिने होते,..पण हळूहळू कळलं नवऱ्याला दारूच खूप वेड होतं,.. नविननवीन हौस,मौज झाली पण हळूहंळू सगळ्यांचे रंग दिसू लागले,..नवऱ्याला खुप दारूचं व्यसन होतं,.. सासूबाईला घरात स्वतःशिवाय कोणाचंच मत नको असायचं,..माझी घुसमट व्हायला लागली,..एकदोन वेळा मी भांडून स्वतःच अस्तित्व सिद्ध करायचा प्रयत्न केला पण व्यर्थ गेला,..घरातली एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीला तिची जागा मिळू देत नव्हती,..मग काय रडणं,कुढणं सुरू झालं आणि त्यात निसर्गाने आपलं काम चोख केलं,..मी गरोदर राहिले तेंव्हा तर त्याला जास्तच व्यसन जडलं होतं,.. एखादी स्त्री हाताने स्वतःच वाईट करून घेऊ शकते त्या उदाहरणातली मी होते,..तेंव्हाच मला स्वतःच्या भावनांना आवर घालता आली असती तर आज ही वेळ आलीच नसती,..नवऱ्याने दारूसाठी एक एक वस्तू विकायला सुरुवात केल्या,..ह्या पोरीच्या जन्मपर्यंत फक्त वाडा राहिला होता,.. मी पोटातल्या लेकरासाठी सगळं सहन करत होते,..हिच्या सातव्या महिन्यात सासुच पडायचं निमित्त होऊन तिला डोक्याला मार लागला ती गेली,.. मला एकटं सोडून कशी असली तरी आधाराला बरी होती,..मग मात्र मी नवऱ्याला न सांगता काही गोष्टी चोरून करू लागले,.. पुढचा विचार करून माझ्या काही दागिन्यांत हे रोडवर असलेलं घर बसस्टॅण्ड पासून जवळ हा विचार करून घेऊन टाकलं,..त्याने तर शेती,दागिने सगळं विकलं,.. मी मात्र बाळासाठी तग धरून होते,..आईलाच इथे बोलावून घेतलं,.. स्त्रीला होणाऱ्या भयंकर वेदना तेव्हा अनुभवल्या,...मनीचा जन्म झाला आणि देवान नव्या संघर्षाच जगणं माझ्या पदरात टाकलं,..मनी मतिमंद जन्माला आली,..रडली नाही आणि हसली नाही,..तिचं ते अर्थ हरवलेलं जगणं बघून मी तुटायचे,..नवरा, मला म्हणाला," नदीत सोडून दे हे असलं मुल,.. मी त्यालाच सोडलं आणि इथे राहायला आले,..तेंव्हाच टपरी सुरू केली,..काही दिवसात त्याला दारूने सम्पवलं,.. मी स्थिर होते आता आघात सहन करण्याची माझी ताकद खुप वाढली होती,..तिच्यासाठी जगत होते,..मदतीला आई आली,.. दोघी मिळून राहतो,.. कोणाकोणाला आधार देत माहीत नाही पण एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला आधार देऊन आहे,..त्यात मनीने आमच विश्व व्यापून टाकलं आहे,..पण आता मनीतली निरागसता सम्पून मनीत बाई दिसायला लागली आहे,तिलाही भावना आहेत हे जाणवत,..ती स्पर्शाला असुसते,.. आमच्या नाही कुणा पुरुषाच्या,..मग मला इतिहास डोळ्यासमोर येतो,..मन सैरभैर होतं,.. मी धडधाकट असून माझ्या एका चुकीसाठी आयुष्य धुळीला मिळालं,.. माझ्यासारख्या चांगल्या सुज्ञ मुलीला कोणी चटकन नाही स्वीकारलं,.. हिला कोण बघेल,..हिला तर ना बुद्धी,ना जाण हिला फक्त स्त्रीदेह दिलाय देवाने कशासाठी,..?पुन्हा माझी परीक्षा पाहायला,.. एवढं बोलून सोनी ढसाढसा रडली,..तेवढ्यात मामी आल्या,..तिची आई,.."अगबाई पोरींनो कधी आलात ग,..मला भजनात वेळ लागला आज,..सोनाबाईचा धीर सुटला वाटतं आज बहिणींना पाहून म्हणत त्यांनी पदर डोळ्याला लावला,.."
तेवढ्यात मोनी उठली मोठमोठ्याने आई आई करतच,.. तशी सोनी पटकन तिच्या जवळ गेली,..तिला जवळ घेतलं,..रूपाच्या सौंदर्य स्पर्धेत पोरगी पहिली येईल इतकं सुंदर रूप दिलं होतं देवानं पण बुद्धी,..त्या रूपाच संरक्षण सुद्धा करता येणार नाही इतकी कमी,..
सोनी म्हंटली ते बरोबर होतं,.. निदान स्त्रीदेह तरी नको होता,..मुलगा कसा सांभाळला असता पण ह्या देहाला कोणी वापरलं तर पुन्हा निर्मितीचा शाप आहेच की,..म्हणून तर सोनी तिला जीवापाड जपत होती...आताही सोनी तिला आमच्याकडे बोट दाखवत सांगत होती...ही मावशी मोठी चित्रकार आहे,ही मोठी गायिका आहे,..मोनी हसत आजीकडे बोट दाखवत म्हणत होती आणि ती,..आजी हसून म्हणाली," मी किर्तनकार आहे,.."मनी ने आईकडे बोट दाखवलं आणि तू,..?सोनी तिला जवळ घेत म्हणाली,"मी ह्या निरागस कोकराची आई आहे,.."तिने लगेच दोन्ही हातांनी टाळ्या वाजवल्या,..ती खरंच सुंदर होती,..
सोनीची आई म्हणाली,"आता राहा दोन दिवस,..किती कमी येता ग आमच्याकडे,..मंगलला बघून तर किती वर्ष झाले,..होती तशीच आहेस ग मंगल तू,..फार कष्टात दिवस काढले ग पण त्याच फळ मिळालं
आणि अनुला सुद्धा,.."
अनु म्हणाली,"आता तुम्ही चला आमच्यासोबत आईचा सत्तरावा वाढदिवस करायचा आहे,..तिला छान वाटेल सगळ्यांना भेटून,..सोनी तू आणि मनी पण चला,.."
सोनी म्हणाली,"अग आम्हाला नेऊन तुमच्या आंनदावर विरजण कशाला,..आम्ही मायलेकी घरीच बऱ्या,..आईला घेऊन जा,.."
अनु म्हणाली,"तू कधी दोन दिवस बाहेर पडणार त्या लेकराला बघू दे ना या गावाच्या बाहेर खुप मोठ सुंदर विश्व आहे,.."
सोनी म्हणाली,"अग आम्हाला सगळ्या गोष्टींना वेळ लागतो,..आमचा आरडा ओरडा असतो तुम्हाला उगाच वाटेल उगीच आणली ही जोडी,.."
अनु म्हणाली,"आपण तासाभरात निघतोय,..मला बाकी काही ऐकायचं नाही चला आवरा,.."
क्रमशः
©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद

🎭 Series Post

View all