तिची पाऊलवाट भाग २५

तिची पाऊलवाट


#तिचीपाऊलवाट भाग 25
©स्वप्ना..
डॉक्टरच्या आईने आणि स्वतः डॉकटरने मला चांगलंच कोंडीत पकडलं होतं,.. मी जरा रडकुंडीला येत म्हंटल,..ही पैंटिंग राहू द्या मी उद्यापर्यंत दुसरी पैंटिंग करून आणून देते,..काकु म्हणाल्या,"त्यातही तसंच झालं तर,..?"
मी जरा रागाने म्हंटल," तस नाही होणार आणि झालं तर पैंटिंगचे पैसे देऊ नका मला,.."
डॉकटर म्हणाले,"मला काय वाटतं आई आता एवढा वेळ आहे का?नवीन पैंटिंग त्यातही परत हिने स्वतःलाच त्या जागी समजलं तर मग काय करणार,..त्यापेक्षा आई मी हे पैंटिंग हिलाच देऊ का,..एवढं बोलून डॉकटरांनी हातात पैंटिंग धरलं माझ्यासमोर चक्क घुढग्यावर बसले आणि सरळ म्हणाले मला,.."विल यु मॅरी मी,..?"
मंगल मध्येच ओरडली,.."वा कसलं भारी,.."अनु आताही ते सगळं आठवून लाजेने आणि हसून लाल झाली आणि म्हणाली,"भारी काय मला तर भीतीने पोटात गोळाच उठला,..समोर त्याची आई इथे पायाशी हा ही पैंटिंग घेऊन असले प्रश्न विचारतोय,..आणि आता माझंच पैंटिंग मला अश्या पद्धतीने भेट मिळतंय ते मी स्वीकारावं की नाही,..?परत तो फुलरणीचा संवाद आठवलाच,..
"कुंपणापर्यंत सरड्याची धाव,
टिटवीने धरावी का आकाशाची हाव,..
हिऱ्याच्या कंठाला सुतळीचा तोडा,.."
नाही नाही मी नाही स्वीकारू शकत हे पैंटिंग,.. इथे मी दिसते पण ही जागा माझी नाही,..एवढं बोलून मला रडायलाच आलं,..काकु पटकन जवळ आल्या,"काय झालं अनु बेटा,.. तुला नाही आवडले का डॉकटर,..?"मी म्हणाले," काकु त्यांची हुशारी, बुद्धिमत्ता ह्यात ते कुठेच कमी नाही पण त्यांची बायको होण्यासाठी मी योग्य नाही,..मी आणि माझी आई कसतरी आयुष्याशी लढत आताशी जरा प्रगतीकडे वळालो आहोत,..तुमच्या या वैभवापुढे आम्ही काहीच नाही,..आई तर कधीच हो म्हणणार नाही,..वेड्यात काढेल ती मला,..एवढं बोलून मी खूपच रडायला लागले,.."
अरविंदने यावेळेस मला अनु अशी एकेरी हाक मारली मी त्याक्षणी मोहरले,..मला म्हणाला,"मी प्रेम करतो ग तुझ्या चित्रांवर,कलेवर,..माझ्या मित्रांच्या बऱ्याच हॉस्पिटलमध्ये तुझे चित्र पाहिले,..तुझं कल्पनेपलीकडलं सुंदर व्यक्त होणं मनाला भुरळ पडून गेलं,..खुप दिवस तुझ्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास केला,..माझ्या स्वप्नातली ती तूच आहे,.. कलेमध्ये रमणारी,आंनद घेणारी आणि इतरांना देणारी,.. मी तुला बळजबरी नाही करत तू होच म्हण मला,..पण मागणी घालतोय,.. "
मी डोळे पुसत म्हणाले,"मला तुम्ही आवडता, तुमची ही मेहनत,लोकांची दुःख जाणून त्यांच्यावर मनापासून उपचार करण्याची पद्धत मला आवडते,..पण मला माझ्या आईशी बोलावं लागेल,..तिला न सांगता मला असे निर्णय घेता येणार नाहीत,.."
काकु म्हणाल्या," म्हणजे हे नातं पक्क समजतो आम्ही बरं का अनुची आई,.."हे बोलताना त्यांनी स्वयंपाक घरात डोकावलं आणि आई हसत बाहेर आली काकूंच्या गळ्यात पडत म्हणाली,"..हो विहिनबाई हे नातं पक्क समजा,.."
मी आईला तिथे बघून आवक झाले आणि ओरडलेच,..आई तू इथे कशी,..?आई हसून सांगू लागली,..अग ह्यांच्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या कॅन्टीनल आपल्या बचतगटा कडून पोळ्या येतात,..तो करार करण्यासाठी मागे गोगटे मावशी आपल्याकडे आली होती बघ,..महिनाभरापूर्वी,..मावशी आणि ह्या सख्ख्या बहिणी आहेत,.. हॉस्पिटलच पोळ्याचं काम आपल्या बचत गटाला मिळावं म्हणून मावशीशी मी बोलले होते,..ती मला मागे म्हणाली होती,"डॉकटर जोशींची आई माझी बहिण आहे,..मग मी तिला बोलवलं ती स्वतः इथे मला घेऊन आली,..आमच्या गप्पांमध्ये मी सहज बोलून गेले माझी मुलगी बऱ्याच हॉस्पिटलमध्ये पैंटिंग बनवून देते,..हे नेमकं जवाईबुवांनी ऐकलं,.."
आईने त्याला तेंव्हा जावाई म्हंटल्यावर तो एकदम खुश,..मी मात्र अजून गडबडलेलीच होते,..
आई म्हणाली,"जावाई म्हणाले मी ओळखतो तिला,.. आणि त्यांनी मलाच विचारलं लग्न करेल का ती माझ्याशी,..?आता तुझे निर्णय मी कसे देणार,...म्हणून ह्या सगळ्या गमती केल्या,..दोन दिवसांपासून मी तुझी गम्मत बघत होते ना पैंटिंग करताना,.. आणि गोगटे मावशीने सांगितला ह्यांचा डॉकटर होण्याचा प्रवास,..लहानपणीच वडील गेले त्यांचे,..कठीण परिस्थितीत शिक्षण घेऊन,आईला साथ देऊन आज ते इथपर्यंत पोहचले आहेत,.. त्यांना तर कितीही मुली मिळाल्या असत्या पण ,..त्यांना तुझ्यासारख्या स्वकष्टावर मोठ्या होत जाणाऱ्या मुलीचा शोध होता,...आईने मला जवळ घेतलं म्हणाली,"अनु मला तरी वाटतं तूझ हे पैंटिंग सत्यात उतरलं आहे,.."
मला काहीच सुचत नव्हतं,..आई,काकु माझ्याकडे बघत होत्या,..तो परत घुढघ्यावर बसून मला चित्र देत होता,आणि मी ते चित्र स्वीकार करू की नको ह्या विचारात,..मग दरवाज्यातून जिन्यातली विठ्ठल मूर्ती स्पष्ट दिसत होती,..मी मनोमन त्याला कौल मागितला आणि खरंच मूर्तीवरच फुलं ओघळल,..मी पैंटिंग स्वीकारली,..डॉकटर जोशी थँक्स म्हणून पळाले खाली,..पेशंट वाट बघत होते,..मध्ये रिसेप्शनिस्ट दोनदा सांगून गेला होता,..सासूबाईंनी मला जवळ घेतलं,..जवळच्या पर्समधल्या मोत्याच्या बांगड्या माझ्या हातात घालून मला म्हणाल्या,"चला माझ्या लेकाची जबाबदारी आता तुझी,..ह्या पेशंटचे सतत ताण असतात त्याला,..त्यामुळे थोडाफार चिडतो पण त्याला सांभाळून घे,..आज एवढे जीव वाचवायची जबाबदारी त्याची आहे,..आणि त्याच्या जीवाची काळजी घेण्याची जबाबदारी आपली,..चला विहिनबाई ठरलं तर मग,..तुम्हाला जे काही तिला घ्यायचं ते घ्या,..लग्न आम्हीच करू,..त्याबाबतीत काळजी करू नका,..इतक्या छोट्या बैठकीत लग्न ठरलं,.."
मंगल म्हणाली,"लग्नाआधी काही भेटी गाठी झाल्या की नाही मग जोडीच्या,.."
अनु म्हणाली,"अग भेटायचं ठरलं की डॉकटरला सिरीयस पेशंट यायचा पळावं लागायचं,...अगदी शांत अस त्याच आयुष्य तेंव्हाही नव्हतं आणि आताही नाही,..तरी छोट्या छोट्या भेटी खुप सुंदर होत्या,..आपण स्त्रिया असतोच समाधानी,..तो कधीकधी तर डॉकटरचं पांढरा अप्रोन काढायला पण विसरायचा,..पेशंट संपले की पळत सुटायचा भेटायला,..घरी भेटणं त्याला आवडायचं नाही,..दूर डोंगराकडे,नदीकडे मला म्हणायचा तुलाही चित्र सुचतील आणि मी देखील फ्रेश होईल,असा हेतू अस दूर येऊन भेटण्यात,.. मी चिडायचे त्याला म्हणायचे," अरे जाण्यायेण्यात वेळ जातो,..बोलणं होत नाही,."
त्यावर हसत तो बदमाश म्हणायचा,.." इथे बोलायचंय कोणाला,..फक्त डोळयात बघायचं आहे तुझ्या तुला साठवायच आहे डोळ्यात,...मग खुप ताण आला की तुझा चेहरा आठवतो,.. त्या पाठोपाठ रंग आठवतात मग वाटतं जगणं किती सुंदर आहे,..कारण त्या जगण्यात सुंदर रंग भरायला तू माझ्या आयुष्यात आहेस,.."
मला सगळं स्वप्नवत वाटायचं,..आपण जगलेलो आयुष्य आणि आता आयुष्यात आलेला हा सोनेरी टप्पा,.. मन फुलून यायचं,..त्याचसोबतचे क्षण तर असेच राहावे इथेच काळाने गोठून जावं,..अगदी प्रेमात पडलेल्या जोड्यांसारखं आमचं झालं होतं,..भेटीची ओढ,..चालताना, गाडीवर बसताना होणारे चोरटे स्पर्श,..मोरपीस फिरायचा ग अंगावर,.."मंगल मध्येच म्हणाली,"आता फिरतो का?"अनु म्हणाली,"मंगे चावटपणा जात नाही तुझा,.. अग ते वेड वय असतं ग,..सुंदर अगदी श्रावणासारखं फक्त हिरवंगार होऊन बहरणारं,..मी तेंव्हा फक्त बहरत होते."
मंगल म्हणाली,"आजीला कधी कळवलं मग तुम्ही,..?अनु म्हणाली,"तिथेच तर खरी गम्मत झाली,..आजी खुप रागावली आम्हा दोघीवर,..एकदिवस आली आणि घराच्या ओट्यावरच बसली,मला का नाही विचारलं म्हणत,..?"
तेवढ्यात डॉकटर आले मला घ्यायला,..मी हळूच जाऊन सगळं सांगितल त्याला,..तो म्हणाला"अजिबात काळजी करू नका मी बोलतो आजीशी,.." तो तिथेच आजी जवळ बसला आजीला म्हणाला,"मी हिचा वर्गमित्र मला देखील सांगितलं नाही हो हिने,.."
क्रमशः
©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद

🎭 Series Post

View all