May 15, 2021
नारीवादी

तिची काय चूक

Read Later
तिची काय चूक

"तुझं लग्न कधी होणार? याचचं एक टेन्शन आलं आहे बघ.."

"लग्न झालं नाही तर राहू दे की.. तुमच्यासोबत राहायला तर मिळेल मला.. मला नाही जायचं नांदायला.."

"असं म्हणून चालत नाही ग.. सोबतीला एक जोडीदार हवाच.."

"लग्न केल्यानंतर नवरा चांगला असेल तर बरं नाहीतर काय उपयोग?"

"आयुष्याच्या एका क्षणी जोडीदार हा हवाच.. आम्ही किती दिवस उपयोगी पडणार तुला?? एक ना एक दिवस सोडून जाणारच.. मग त्यानंतर तुझं काय होणार? कोण असणार तुझ्यासोबत? म्हणूनच तुझ्या लग्नाची काळजी लागली आहे.."

"होय ग बाई लवकर लग्न करून जा.. तुझ्यामुळे आमचं लग्न राहिले आहे"

हे ऐकून सेजलला खूप वाईट वाटले आणि ती तिच्या खोलीत गेली.. तिच्या पाठोपाठ तिची आई पण गेली तिची समजूत काढायला..
सेजल दिसायला खूप सुंदर, गोरी, देखणी, केस काळे भोर.. अगदी एखाद्या हीरोइनला लाजवेल इतक सौंदर्य तिच्यात.. पण तिचं लग्न ठरे ना.. इतकी सुंदर मुलगी.. मग तिच्या लग्न का ठरेना?? हिच्या खूप इच्छा आकांक्षा असतील म्हणूनच ठरत नसेल की काय?? असे बऱ्याच जणांना वाटत असतील.. पण तसे काही नसून तिचा एक भूतकाळ होता.. त्यामुळे तिचे लग्न ठरत नव्हते..

सेजल साधारण अकरा-बारा वर्षाची असेल.. तेव्हा ती तिसरी-चौथीमध्ये होती.. एकदा अशीच शाळेला जात असताना काही टवाळक्या मुलांनी तिची छेड काढून तिच्यावर बलात्कार केला.. अजानते वय ते.. त्या वयामध्ये कोण कसे काहीच कल्पना नव्हती?? त्या हल्ल्याने ती पूर्णपणे घाबरून गेली होती.. त्यानंतर तिची शाळा बंद केली, म्हणजे ती शाळेला जायला सुद्धा घाबरली.. घरातून कोठे बाहेर जाईना?? त्या मुलांना शेवटी शिक्षा झाली.. पण त्या मुलीचं आयुष्य उध्वस्त झाले..

हळूहळू सेजल मोठी होऊ लागली.. जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे तिचा भूतकाळ विसरून जाऊ लागली.. आणि बाकीचे ही तिला भूतकाळ विसरण्यास मदत करू लागले.. पण एका क्षणी आता तिचं लग्नाचं वय होतं.. तेव्हा तिचा भूतकाळ तिचं लग्न ठरवू देत नव्हता.. का तर तिच्यावर बलात्कार झाला होता??

सेजल आता बत्तीस वर्षाची झाली होती.. आईवडीलांची चिंता दिवसेंदिवस वाढत होती.. एक दिवस सेजलला एक स्थळ आले.. त्या मुलाचे वय चाळीस वर्ष होते.. त्याचेही कोठे लग्न जमेना.. पण त्यांना सेजल खूप आवडली.. तशी तिच्यात खोटं काढण्यासारखे काहीच नव्हते.. बघायला आल्यानंतर पहिल्यांदा त्याच्या वडिलांनी सगळी परिस्थिती सांगून टाकली.. कारण त्यांना तिचा भूतकाळ लपवून ठेवायचा नव्हता..

सगळे प्रकरण समजल्यावर मुलगा नकार देणार हे सेजलने मनात पक्क केलं होतं.. पण थोडा वेळ विचार करून तो मुलगा म्हणाला, "त्या प्रकरणांमध्ये हिची काही चूक नव्हती.. त्या अजाणत्या वयामध्ये तिच्यावर झालेला हल्ला मी समजू शकतो.. आजकाल सर्रास समजदार मुली प्रेमाच्या नावाखाली वाट्टेल त्या थराला जातात.. त्यापेक्षा सेजल बरी.. यामध्ये तिचा काहीच दोष नाही.. मी लग्नाला तयार आहे.."

हे ऐकून सेजलला पहिल्यांदा विश्वासच बसला नाही.. पण तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले..

Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..