तिची कहाणी- अंतिम भाग (भाग ०४)

The Story is based on womens life Comparing her Life with an Isolation Ward

( मागील भागात आपण पाहिलं, रियाची टेस्ट झाली, पण रिपोर्ट्स यायचे बाकी होते, ती रात्र तिला isolation वॉर्ड मध्ये काढावी लागली, वाचा पुढील भाग ...)


सकाळी ०६ :३० वाजले होते, एक नर्स वॉर्ड मध्ये आली हातात काही रिपोर्ट्स आणी फाईल्स होत्या, रियाच्या बेड कडे नजर टाकत तिने रियाला आवाज दिला , "मॅडम हे तुमचे रिपोर्ट आहेत, तुम्ही घरी जाऊ शकता"  क्षणभर रियाला खरंच वाटेना. "हिने नक्की माझंच नावं घेतलं ना??? " असे म्हणत हाताला हळुवार एक चिमटा काढून आपण जागे असल्याची तीने खात्री करून घेतली आणी नर्स कडून रिपोर्ट हातात घेऊन त्यावर नजर टाकली; "Negative" असं वाचल्यावर तिला खात्री पटली, सगळयांना फोन-मेसेज करून तिने रिपोर्ट बद्दल माहिती दिली, आणी संदिप ला फोन करून घ्यायला ये असं सांगत आपली बॅग आवरायला सुरवात केली .

०२ तास उलटून गेले तरी संदीप काही आला नव्हता; काल दिवसभरात एकही फोन नाही, मेसेज नाही आणी आत्तापण इतका वेळ होऊन पण याचा पत्ता नाही रियाला काही कळतच नव्हतं.  १० मिनिटे झाल्यावर गाडी आली, संदीपचं फोन वर बोलणं चालू होतं , बोलण्यावरून एखाद्या client असावा असं वाटत होतं. संदिप ने डोळ्यानेच ड्रायव्हर ला खुणावत रियाच सामान घ्यायला सांगितलं तसं ड्रायव्हर ने सामान घेतलं आणी रिया साठी दरवाजा उघडला , रिया गाडीत बसली घरच्या दिशेने गाडी सुरू झाली. संदिपचे फोनवरचे बोलणं संपत नव्हते दोन मिनिटं बायकोशी बोलायला सुद्धा त्याला वेळ नव्हता , त्याच्या वागण्यात असा अचानक झालेला बदल पाहुन रियाची चीड चीड वाढू लागली , " तुला बरं वाटतंय का?? तू काही खाल्लं का??" एवढं पण तो विचारायला विसरून गेला, शेवटी न राहवून रियानेच जरा मोठ्या आवाजात सांगितलं "गाडी कुठेतरी बाजूला घे मला ब्रेकफास्ट करायचा आहे" , तिने तिच्या सकाळच्या गोळ्या तशाच घेतल्या होत्या आणी डिस्चार्ज लवकर मिळाला म्हणुन सकाळचा ब्रेकफास्ट पण आला नव्हता.

एका स्त्रीचं आयुष्य असंच असतं का?? नेहमी दुसऱ्यांच्या कामाच्या , खाण्या-पिण्याच्या वेळा पाळणाऱ्या तिला कधीच कोणी विचारत नाही "तु दोन घास वेळेवर खाल्ले का? " याच जागी संदीप अथवा इतर कोणी असतं तर रियाने त्यांची किती काळजी घेतली असती ? नेमकं ती जेव्हा या सगळ्यातून जात असताना कोणीच तिची काळजी घेऊ नये? काळजी घेणं तर लांब राहिलं किमान ०२ काळजीचे शब्द सुद्धा कानांवर पडू नये? असे एक ना अनेक विचार तिच्या मनात येऊन गेले.

१२ वाजता शेवटी रिया घरी पोहचली दारात विहान वाट पाहत उभाच होता, आईला छान मिठी मारून गालावर एक गोड पापी घेत त्याने आईला छान वेलकम केलं आणी खेळायला पळून गेला . रियाने खोलीत सामान ठेवलं आणी आंघोळीसाठी पाणी सोडलं, बाहेर आल्यावर रूम मधील पसारा आवरताना सहज तिच्या मनांत आलं,  कालचा दिवस आणी आज पुन्हा नव्याने सुरू झालेल तेंच न संपणार चक्र याला नेमकं काय नावं द्यायचं?? पुनर्जन्म ?? की कधीही न संपणारा लॉकडाउन???

( समाप्त )

===================================
तर हि होती, तिची कहाणी; आपल्या आजुबाजूला सुद्धा अशा अनेक रिया असतील, ज्यांना खुप काही अपेक्षा नाही पण किमान काळजीचे ०२ शब्द कानावर पडावे अशी इच्छा असते, या कथामलिकेतून हाच निरोप सगळ्यांपर्यंत पोहचवायचा होता.
बघा जमतंय का ???? ??

कथा आवडल्यास आपल्या कंमेट मध्ये कळवा, like आणी शेअर करा, आपलं प्रेम पुढील लिखाणासाठी प्रेरणा देत राहील ????

© स्वप्नील घुगे

🎭 Series Post

View all